Welcome to misalpav.com

हुलकडूबी नाव

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!


ब्रुटसची खंजीर

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
अजर आहे अमर आहे ब्रुटसची खंजीर. प्रत्येक युगात करते सीजरचा घात ही. रात्र वैऱ्याची आहे जागत राहा सीजर. वेश घेऊन विश्वासाचे वावरत आहे ब्रुटस इथेच. अभिमंत्रित, अपराजित ब्रुटसची खंजीर आहे. बेसावध सीजरच्या रक्ताची तहान आहे. आज ही तळपते गगनी सीजरच्या रक्ताने माखलेली. राक्षसी विजयाची दंदुभी जणू ही वज्राहून कठोर, ब्रुटसची खंजीर ही.


मेघावळ....

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
मेघावळ.... मेघांची प्रभावळ....... मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा. मेघ अभिलाषा. मेघ निराशाही. मेघ एक दाटलेलं सूक्त. कधि करुणायुक्त कधि दुष्काळभुक्त. ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर. वारा मेघांना फितूर. आला तर धुवाधार नाही तर पिरपिर रटाळ. मेघ जीवनाचा आधार. मेघ इंद्राचा अवतार. सृजनाचा दातार. सृष्टीचा भ्रातार. पाऊस बेभान. पाऊस निष्काम. पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम. पावसात चिखल.चिखलात कमळ. शेतात भीज. बीजांकुरांची हिरवळ. बीजात सत्व. जगण्या जगविण्याचे तत्व. समृद्ध चाहूल. तरीही छुप्या दुष्काळाची हूल. अतृप्त हा प्रवास सदाही. मनांत खोलवर साचलेलं अचानक प्रवाही. निमित्ताने;.......


उंदीर मांजराचा खाऊ

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
उंदीर मांजराचा खाऊ एकदा थंडी वाजते म्हणून एका माऊने केली गाऊ तेथला उंदीर मनात म्हणाला आता गुपचूप खाऊ खाऊ खाऊ होता माऊसमोर धीर केला उंदराने हळूच गेला चालत चालत मांजरीकडे पाहीले त्याने खाऊचा वास त्याने घेतला सुटले पाणी तोंडाला खाऊ न द्यायचा कोणाला विचार त्याच्या मनातला डोळे मिटून सताड पडली अंग चोरून मनी मिटक्या मारीत खायचा खाऊ उंदराने स्वप्न पाहीले मनी होती निसरडी घराची फरशी तीवरून त्याचा पाय सरकला आवाजाने माऊ जागी झाली आयता खाऊ तिला मिळाला - पाभे