Welcome to misalpav.com

( श्रीवल्ली )

लेखक: चौथा कोनाडा | प्रसिद्ध:
२०२१ चा डिसेंबर उजाडला आणि तिसऱ्या आठवड्यात पुष्पा: द राईझ तेलगू भाषेत प्रदर्शित झाला अन पहिल्याच दिवशी जगभरातू १७४ कोटींचा दणदणीत गल्ला जमवला ! सामी, श्रीवल्ली सारखी सुपरहिट गाणी गल्लीबोळात, बस रिक्षात, कॉम्पुटर मोबाईल, टीव्ही ओटीटी इ वर जोरजोरात वाजू लागली. याच्या तामिळ, मल्याळम, हिंदी कन्नड आवृत्याही हिट झाल्या ! सगळी कडून सामी, श्रीवल्ली चे प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले. याचे शॉर्ट्स, रील्स, स्टेट्स व्हिडिओं करायच्या नादी तमाम चाहती जनता लागली !


गुजरात सहल २०२१_भाग ५- सासन गीर

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
आधीचा भाग खालील लिंकवर वाचता येईल. गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण) आज सहलीचा सहावा दिवस. सकाळी सोमनाथमधील दोन ठिकाणे पाहून गीरच्या दिशेने प्रवास सुरु झाला . रस्त्याच्या बाजूने आमराई दिसत होती. केशर आंब्यांच्या बागा आहेत असे समजले. अकरा वाजता भोजदे, सासन गीर येथील आमचे बुकिंग असलेल्या 'गीर विहार रिसॉर्ट'ला पोहोचलो. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. मोठा परिसर, सुंदर बगीचा, स्विमिंग पूल, अद्ययावत कॉटेज, उत्कृष्ठ जेवण. शिवाय जंगल सफारीसाठी आपल्याला 'सिंह सदन' ला जावे लागते ते ठिकाण येथून फक्त दहा मिनिटावर आहे.


सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.


ध्रांगध्रा - १७

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
काय? काय सांगायचंय तुला? आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्‍यावरची भिती लपत नाही.
मागील दुवा ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814 " काय म्हणतोस ! कसला चेहेरा?" खरंतर महेशनं हे मला विचारलं असतं तर मी पण हेच सांगितलं असतं.


झटपट जळगावी भरीत

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे. शेवटी हे एकच राहिले होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो. १ साहित्य : १.पावशेर जळगावी वांगे २.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली) ३.एक वाटी कच्चे शेंगादाणे ४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे ५.एक वाटी चिरलेला ओला कांदा ६.५-६ हिरव्या मिरच्या ७.७-८


कोकण प्रवास: प्रकाशचित्रे

लेखक: श्रीगणेशा | प्रसिद्ध:
२० ते २२ नोव्हेंबर
कोकण पाहायचे दूरच, पण साधं "येवा कोकण आपलाच असा" हेही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. डिसेंबरची पर्यटनगर्दी अजून दूर होती. त्यामुळे चार-पाच दिवस हाताशी ठेऊन, खूप नियोजन न करता निवांत फिरण्याचं नियोजन होतं. नेहमीप्रमाणे कोणी तयार होणार नाही हे माहीत असूनही सगळ्यांना सोबत यायचा आग्रह करून झाला होता. अशा मोहिमांसाठी आवश्यक मानसीक तयारी, नवीन हवामानात रुळण्याची प्रक्रिया (acclimatization) बेस कॅम्पवर, अर्थातच सासुरवाडीत, पूर्ण झाली होती. कदाचित मनात आलं तर कोकणातच स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती.


अमानुषता आणि माणुसकी

लेखक: मार्गी | प्रसिद्ध:
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे. आपल्यापैकी बरेचसे जण खूप प्रोटेक्टेड जगात राहतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. किंबहुना अनेकदा जाणूनबुजून आपण ह्या गोष्टी नजरेआड करत असतो. परंतु हे पुस्तक वाचताना ख-या आणि बीभत्स जगाचं दर्शन घडतं.


"त्या" सिनेमातून आपोआप दिसणारा "तो" काळ

लेखक: मन | प्रसिद्ध:
"हम आपके है कौन" म्हणजे "नदीया के पार" चा remake हे अनेकांना माहीतच असेल इथं. तो बघताना काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या. त्यांची इथं नोंद,यादी करतोय. हम आपके है कौन १९९४चा. त्याचे बडजात्या निर्माते (राजश्री प्रॉडक्शन). हा बॉक्स ऑफिसवर सुपर्डुपर हिट असला तरी मुळात ह्याच राजश्री प्रॉडक्शनच्याच १९७०च्या काळात आलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. तो मूळ सिनेमाही भारतभर गाजला. विशेषत: उत्तर भारतात किंवा इतरत्रही ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा,जाणीवांशी जोडून घेणारं पब्लिक जिथं आहे, अशा ठिकाणी. टीनेजरी,नवतरुण दिसणारा "सचिन" त्यात आहे (म्हणजे सध्याचे टि व्ही वरचे "महागुरु").


ध्रांगध्रा - १६

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
मी तोंड उघडून जोराने " आ....." म्हणतो. अरेच्चा!!!!!!!! आला की माझा आवाज. मला माझंच हसू येतं म्हणजे मी मनातल्या मनात हाका मारतोय तर ! ते कसं ऐकू जाणार. त्या हसण्यानं मला जरा बरं वाटतं.... माणूस कितीही रागात , तणावात असला तरी थोड्याशा हसण्याने किती फरक पडतो नाही!.....
मागील दुवा ध्रांगध्रा - १५ http://misalpav.com/node/49796 माझा आवाज ऐकून आई आत येते. पाठोपाठ बाबाही. "काय रे काय झाले?". आई उशी शेजारच्या नॅपकीनने माझ्या कपाळावरचा घाम टिपते. तरी बरं त्या हसण्यामुळे मी थोडा तरी रिलॅक्स झालो होतो. " घे पाणी पी" आई माझ्या हातात पाण्याचा ग्लास देते. " काही होतंय का?


New Edge Entrepreneurs !

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
New Edge Entrepreneurs ! चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते. या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते.