Welcome to misalpav.com

पांढरं फरवालं स्वेटर

लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:
पांढरं फरवालं स्वेटर --------------------------- खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी ! रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं . नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली . तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत . मोकळा , मोठा रस्ता . त्यात शेजाराला नदी. पाण्याने आणि गार वाऱ्याने थंडी तिथे अगदीच जोमात आलेली . रस्त्यावरचे दिवेही काही बंद काही चालू .


ध्रांगध्रा - ११

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
काही का असेना शिवासाठी काम झालंय हे महत्वाचं. मंदीर आहे हे निश्चित झाले. आणि तिथे कस्म जायचं ते समजलंय . या क्षणी आम्हाला या पेक्षा कसलीच माहिती नको आहे. त्या माणसाला तिथेच सोडून आम्ही उजवी कडची वाट धरतो मागील दुवा ध्रांगध्रा-१० http://misalpav.com/node/49772 "बघ काम झालं आपलं. आता थोडाच वेळ. ते देऊळ पाहू." देऊळ कुठे आहे ते समजल्यामुळे महेश खुशीत आलाय. " गंमत आहे ना... या गावची. सकाळपासून भेटलेल्या सगळ्या माणसांचे चेहरे अगदी एकसारखे. हुबेहुब. कसलं भारी ना" शिवा खुशीत आल्यामुळे माझ्याही डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झालंय. " त्याचं काय असेल....


डोन्ट वरी, बी हंपी..!! भाग-१

लेखक: नागनिका | प्रसिद्ध:
मिपाकरांनी आत्तापर्यंत हंपी बद्दल इथे बर्याच वेळा वाचले असेल. त्यामुळे लिहावे कि नको असे मनात द्वंद्व चालू होते. परंतु दक्षिण भारताच्या सामाजिक व राजकीय वैभवाचा सुवर्ण इतिहास सांगणाऱ्या हंपी नगरीबद्दल कितीही वाचले, ऐकले तरीही कमीच !! काही ठिकाणे अशी असतात कि तिथे जाण्यासाठी खूप मोठा पुण्यसंचय असावा लागते. हंपी त्यातीलच एक! बहुदा आमचा तेवढा संचय झाला होता म्हणूनच तिकडे जाण्याचा योग आला. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकुटुंब हंपी दर्शन झाले. ६ दिवसांची सहल होती. त्यातील ३ दिवस हम्पीसाठी होते (हंपी साठी तीनच दिवस दिले याचा खूप पश्चाताप होत आहे).


चांदण्यांच्या सहवासात

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
वाटते जरा रमावे चांदण्यांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे चांदण्यांच्या सहवासात हात तुझा हातात घ्यावा चांदण्यांच्या सहवासात हलकेच विसावे मिठीत तुझ्या चांदण्यांच्या सहवासात स्पर्शानेच बोलावे चांदण्यांच्या सहवासात श्वासात मिसळावा श्वास चांदण्यांच्या सहवासात तारे सारे निरखावे चांदण्यांच्या सहवासात स्वप्ने असंख्य पहावी चांदण्यांच्या सहवासात गाणे नवे म्हणावे चांदण्यांच्या सहवासात लाटा त्या मोजव्या चांदण्यांच्या सहवासात गोष्टी किती कराव्या चांदण्यांच्या सहवासात सुरताल असा जुळवा चांदण्यांच्या सहवासात मेहफिल अशी सजावी चांदण्यांच्या सहवासात स्मृती जपून ठेवावी चांदण्यांच्या सहवासात


ध्रांगध्रा - १०

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
कुठल्याच घरात काही हालचाल दिसत नाहीये. थोडे पुढे आलोय. समोर एक माणूस , एक बाई आणि त्यांचा हात धरून चालत जाणारे एक लहान मूल पुढे जाताना दिसतय.चला निदान कोणीतरी दिसलं तरी. चला यांना विचारूया. आम्ही भरभर चालत त्या कुटुंबाला गाठतो. नमस्कार दादा..... मागील दुवा ध्रांगध्रा - ९ http://misalpav.com/node/49763 नमस्कार दादा... आम्हाला मंदीरात जायचंय. कसं जायचं हो? मी मागूनच प्रश्न विचारला. त्या तिघांनीही माना वळवल्या. आम्ही दचकतो. त्या पुरुषाचा , त्याच्या बायकोचा आणि त्या लहान मुलीचा तिघांचेही चेहरे हुबेहूब . अगदी साच्यातून काढावेत तसे. आणि त्याही पेक्षा ते सगळेच झेलेआण्णा आजोबांसारखे दिसताहेत.


मैत्री

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू. मैत्री होती ढगाची उंच उंच डोंगराशी आंगचटीला आला खोड्या करू लागला म्हणून ...... टोचून टोचून डोंगर बोलला भांडण झाल जोरात म्हणून रडू आल ढगाला धार लागली डोळ्याला कट्टी घेऊन डोंगराशी वसुधेच्या कुशीत घुसला आसवांनी पुसलेले अश्रू बघून मनाशीच हसला मीत्राशीवाय करमेना आई जवळ मन रमेना लवकरच येतो म्हणून डोंगराला भेटायला गेला भेट झाली मीत्रांची दोघा पण खुश झाले अधंळी कोशीबिरीचा खेळ पुन्हा खेळू लागले आंधार पडला धरणीवर गार वारा सुटला पुन्हा भांडण होईल म्हणून बळी वाट बघत बसला १६-१२-२०


सरकार

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज. आता तुम्ही म्हणाल की बरं मग? तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे. आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही. अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील. किंवा करू करू म्हणता येईल. शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..! रोज रोज एकटेच कसे बसणार..! बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही.


सोनं

लेखक: सरिता बांदेकर | प्रसिद्ध:
सोनं “अरे ए बबन्या,काय खबर मिळाली की नाही?” डुगऱ्यादादाचं डोकं गरम झालं होतं. सालं चार महिने झाले एक पण मोहिम यशस्वी नाही झाली.या लॅाकडाऊनमुळे एक तर ट्रॅफीक बंद.लोक फिरायला बाहेर पडत नाहीत त्यामुळे लूट बंद.लग्नकार्य बंद त्यामुळे बायका नटून थटून मिरवत नाहीत.रोकडा पण नाही आणि सोनं चांदी पण नाही.त्यात बार बंद मग हातभट्टीच्या पहिल्या धारेच्या कडक मालाला उठाव नाही. सालं जगायचं तरी कसं. डुगऱ्यादादा कपाळ बडवत बसला होता.बबन्या धावत धावत आला.त्याला धाप लागली होती. “ए बबन्या कुठून एव्हढा भूत बघितल्यासारखा पळत आलायस?”डुगऱ्यादादाने विचारलं. “दादा त्ये पक्क


*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

लेखक: srahul | प्रसिद्ध:
*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले.


एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
एक होता कार्व्हर लेखिका :वीणा गवाणकर १ साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात.