Welcome to misalpav.com

जेथोनि सुरुवात होते..

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
तर तेव्हा समजा शाळेत वगैरे जावं लागत असलं आणि अभ्यास वगैरे असला तरीही आम्हाला अगदीच काही कंदीलाच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण दुर्दैवाने त्या गावात आधीच लाईट आली होती..! त्यामुळे "आम्ही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते. तर जन्मदाते म्हणाले की,''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. उगा पांदीवगळीतनं खेकडी हुडकत फिरण्याबगर हितं बसून तरी दुसरं काय करनार हैस तू ?'' सवाल बिनतोड होता. आणि माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं.


ध्रांगध्रा - ८

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
गावाच्या अगदी सीमेवर खंदक असावा तसा एक छोटासा नाला ,ओढा दिसतोय. वात तिथे संपतेय. आणि तो ओढा ओलांडल्यावर नवीन वाट दिसतेय.ओढ्याच्या काठाशी वाट संपतेय तिथे महेश उभा आहे.. दिसला बाबा एकदाचा. मी झपझप पावले उचलत महेशपर्यंत पोहोचतो. मागील दुवा ध्रांगध्रा - ७ http://misalpav.com/node/49747 बरं झालं बाबा. इथे थांबलास.तुला थाम्ब थांब म्हणत होतो. पण तू आपला बुंगाट." महेश दिसल्यामुळे माझी काळजी कमी झाली पण मघाची नाराजी पुन्हा वर आली. " तू हाक मारलीस? मला काहीच ऐकू आले नाही! उलट मलाच काळजी वाटत होती की तू त्या धुक्यात वाट चुकतोस की काय म्हणून. मी निघालो पण आपण बरोबर यायला पाहिजे होतं." महेशचं एक आहे.


कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } आधीचे भाग : कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १ कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २


धावपटू- शतशब्दकथा

लेखक: निओ | प्रसिद्ध:
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी. बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते. अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले. दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता.


लक्ष्मणपूर, एक पडाव........३

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १ https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २ चार बाग रेल्वे स्टेशन चार बाग रेल्वे स्टेशन आपली रथयात्रा शहरातील प्रमुख आणी प्रसिद्ध ठिकाणी जात असताना "उल्टे हाथ, सीधे हाथ " जाणार्‍या रस्त्यांकडे लक्ष ठेवा कारण या शहरात जागोजागी


ध्रांगध्रा - ७

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
रस्त्यावरचे टिमटिमणारे दिवे रात्रीच्या प्रवासात घाट उतरताना दिव्यांचे पुंजके दिसतात तशा दिसणार्‍या छोट्या वाड्या वस्त्या.... असं काहीच नाही. चित्रकलेच्या वर्गात रंगकाम करताना अगोदर कागदाला रंगाचा वॉश देतात ना तसा तपकिरी काळपट धूरकट रंगाचा वॉश दिल्यासारखं. क्षितीजाच्या खालचं जग त्या धुरकट तपकिरी रंगाच्या वॉश ने झाकून टाकलंय. मागील दुवा ध्रांगध्रा - ६ http://misalpav.com/node/49739 क्षितीजापासून अगदी डोंगरापर्यंत. मुंबई नाशीक पुण्याचं ठीक आहे. तिथे कारखान्यांच्या धूराचे प्रदूषण असते.हे इथे कसलं प्रदूषण?