Welcome to misalpav.com

अद्भुताचे निळे पाणी

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
मराठीच्या अंगणात अठ्ठेचाळीस स्तंभांचा स्वर-व्यंजनी महाल माझ्या माय कवितेचा नभापार पोचतसे त्याची बेलाग ही उंची रेलचेल महालात जे न देखे रवि त्याची महालात जाण्यासाठी जिना जपल्या शब्दांचा आणि उतरण्या साठी सोपान हा गहनाचा चुनेगच्ची सौधावर नवरस पुष्करणी पितो मन:पूत तेथे अद्भुताचे निळे पाणी परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे


एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 4 (600 किमी) 19 डिसेंबर 2021

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
तिघांनी तीन फोन वर गजर लावून ठेवले होते. 11 ला पोहोचून 12 वाजता साधारण आम्ही झोपलो. 2 वाजता गजराच्या आधीच जाग आली. आवरून, कपडे बदलून, परत सगळी तयारी करून निघालो. खाली पार्किंग मध्ये आलो तर आमच्या सोडून फक्त 3 अजून सायकल होत्या. बाकी सगळे जण आधीच गेले होते. आपल्याला उशीर झालाय की काय या जाणिवेने पोटात गोळा आला. त्यात फक्त 2 तासाच्या झोपेवर अजून 300 किमी अंतर कापायचं होतं. जाणवून जरा दडपण आलं. पण थोडाच वेळ. एकदा सायकलवर बसलो आणि सुसाट सुरू झालो. पुन्हा एकदा तो मोठा पूल पार करून अंकलेश्वर वरून हायवे ला वळलो. साधारण तासभर झाला असेल चालवून एक मोठा फ्लायओव्हर आला.


"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

लेखक: फारएन्ड | प्रसिद्ध:
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..." १९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या.


खंडेरायानं करणी केली

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
यळकोट यळकोट जय मल्हार बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ व्हती मेंढरं खंडीभर चराया नेली डोंगरावर हिरवा पाला रानोमाळं भवती गार गार वारं आलं भरूनी आभाळं काळ्या ढगांच झालं भार पळात आलं धरणीवर चकमक दावली विजेनं कल्लोळ उठला त्या ठाणं चमत्कार दावला देवानं वर रोखूनी धरलं त्यानं बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥ एका दिशीची कहाणी तहान लागली मेंढरास्नी नेली देवानं गिरणेवरी प्यायला लागली पाणी नदीला आला पूर भरपूर जिकडे तिकडे हाहाकार केला छातीचा बंधार पाणी अडवती मल्हार बाणाईच्या मेंढरासा


{आरती कोव्हिडची}

लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8 ________________________________________________________________________ आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस । विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥ पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी। चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी । आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*। ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥ लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*। मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या। घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या। निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती


एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची (600 किमी) दिवस पहिला 18 डिसेंबर 2021

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
400 ची BRM फारच उत्कृष्ट रित्या पार पडली होती. कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. नाही म्हटलं तरी माझ्या पायाला मागच्या वेळी झालेली जखम सुखत चालली होती. पण जवळपास 24 तास पाय बुटात बंद असल्याने आणि घामाने जखम चिघळली थोडी. पायातला मोजा जखमेला थोडा चिकटला नि तो ओढून काढताना खपली निघाली. घरी येऊन परत डॉ कडे जाणं आलं. आता 600 चे वेध लागले. 11 डिसेंबरला सुरू झालेली 400, 12 तारखेला संपली. 18 ला लगेच पुढची 600 लागलेली. एवढ्या लगेच पुढची करायची का? तर एकमताने हो अस उत्तर आलं. यासाठी 2 रूट डोळ्यासमोर होते. PCMC क्लब ची पुणे - सोलापूर - तुळजापूर नि परत पुणे असा एक ऑप्शन होता.


लिहिणं

लेखक: श्रीगणेशा | प्रसिद्ध:
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.


करा बाई करा ग देवीची आरती

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती आणा बाई आणा ग देवीला कुंकू लवा बाई लावा ग देवीच्या कपाळा भरा भाई भरा ग देवीचा मळवट नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी घाला बाई घाला ग देवीला नथनी घाला बाई देवीला मंगळसुत्र घाला बाई घाला देवीला कमरपट्टा घाला बाई घाला ग देवीला तोडे चाल बदलून ए निरांजन दिवा ताटात आणा हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा करा देवीची आरती भक्त सारे ओवाळती पहिली चाल करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती - पाभे २९/१२/२०२१


पाळणा झुलू दे

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग किती द्वाड तो धावतो घरात आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग काय काय मागतो खायला प्यायला लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे - पाषाणभेद २९/१२/२०२१


लक्ष्मणपूर, एक पडाव.....

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्‍या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता. गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".