Welcome to misalpav.com

ध्रांगध्रा - ६

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
महेशला इतक्यावर्षात कितीतरी वेळा शेकहॅंड केला असेल. पण त्याचा स्पर्ष असा कधीच जाणवला नव्हता. त्याच्या हाताचा आधार घेऊन मी उठतो. या वेळेस स्पर्ष मघासारखा नाही. हा स्पर्ष नेहमीसारखाच आहे. शक्य आहे मघाशी चक्कर येत होती. त्यामुळे तसे वाटले असेल. आम्ही उभे राहिलो. समोर एक विलक्षण देखावा दिसतोय. मागील दुवा ध्रांगध्रा - ५ http://misalpav.com/node/49735 पायवाट जिथे वळतेय त्या बाजुने अक्षरशः मोठी परात असावी तसा तांबुस पांढरा पूर्ण चंद्र वर येतोय.डोंगराचा कोपरा , थोडीशी वळणारी वाट आणि त्या मागे पूर्ण गोलाकार चंद्रबिंब. एखाद्या पोस्तरवर सोभेल असं दृष्य.


सिंधूताई सपकाळ

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
अनाथांची एक माय आता राहिली नाय जाता सिंधू सपकाळ गहिवरला खूप काळ असंख्य अन्याय साहिले अपमानांचे धग दाहिले मग मागे नाही पाहिले उपेक्षितांना आयुष्य वाहिले जग वंदू वा नि नींदू होते निराधार जे हिंडू झाली करुणा-सिंधू अनाथाची मान बिंदू एके दिसी दारावर कोण? ना चिट्ठी नाही फोन लिन -दीन ते डोळे दोन पती पापाचे फिटे ना लोन ज्याने केले निराधार उन्मत्त होता जो भ्रतार त्याचाही केला उद्धार विकलांगा दिला आधार झाली जितेपणीच आख्यायिका राखेतून उठता समाज नायिका कीर्ती झाली गुणगान गायिका गौरवू त्या अनाथ आधारदायिका


ध्रांगध्रा - ५

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
अंधार होत चाललाय. त्याही अवस्थेत मी वर पहातो. सुर्याला एका काळ्या मातकट ढगाने झाकून टाकलंय. उजेड संपत चाललाय. जाणवण्यासारख्या दोनच गोष्टी. माझ्या मनगटावरची घट्ट होत जाणारी महेशची "पकड" आणि अंधार...... मागील दुवा ध्रांगध्रा - ४ http://misalpav.com/node/49734 आ......ह. कुणीतरी टाळूवर थेट हातोडीने हाणलं असावं असं दुखतय डोकं. मी डोक्याला मागे हात लावतो. बोटाला काहितरी ओलसर चिकट लागतं. अरे बापरे. हे काय....... रक्त! माझे डोके दगडावर आपटलं. मागच्या बाजूला खोक पडली आहे. आजूबाजूला अंधारच दिसतोय. माझ्या बाजूला कसलंसं मुटकुळं पडलंय....... ते काय आहे ..कळायला मार्ग नाही. आसपास बराच अंधार आहे.


ध्रांगध्रा - ४

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
जिंदगी का क्या पता .. राहे किस ओर मुडेंगी. हाल हो ... बेहाल हो ....चलना अपना काम है... मागील दुवा ध्रांगध्रा-३ http://misalpav.com/node/49727 गाणे गुणगुणायला सुरवात कोणी केली ते सांगता येणं कठीण आहे. पण आम्ही दोघेही तेच गाणं गुणगुणतोय. इतका वेळ ती चढणीची वाटणारी वाट आता तितकीशी चढणीची वाटत नाहिय्ये.डोंगरात चालताना ती गोष्टीत असते तशी दाट झाडी तशीही नव्हतीच तुरळक एखादे झाड दिसायचे तेही आता नव्हते. पायाखाली येऊन घसरायला होणारे गवत आता जवळजवळ नाहिसे झालंय. पायवात निसरडी नाही पण मुरुमाड धुळीची झालीये.. पण आम्हाला आता डोक्यावरचे ऊनही जाणवत नाहिये.


पचनसंस्थेतील वायूनिर्मिती

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. …………………………………………………………………………………. अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात.