Welcome to misalpav.com

विनिपेग डायरीज

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो.


वेळणेश्वर राईड

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
माझा लेक (वय वर्षे 10) याने त्याच्या बाबांसह आमच्या घरापासून वेळणेश्वर पर्यंत सायकल राईड केली. दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने परत घरी आले. त्याने केलेले हे प्रवासाचे वर्णन. वेळणेश्वर राईड दिनांक १० जानेवारी २०२२ आम्ही वेळणेश्वरला सायकलने जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करायला सुरवात केली. आम्ही १५ तारखेला ठरवलं कि उद्या वेळणेश्वरला जाऊया. मग आम्ही अगोदर सायकल रिपेअर करून घेतल्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. सकाळी ५:१५ ला उठलो व तयारी केली. आई आणि आजोबा गाडीने येणार होते व मी आणि बाबा सायकलने. आम्ही सकाळी ६:१५ ला निघालो.


वजनकाटावाला

लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:
वजनकाटावाला --------------------- तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन. पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती. त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता . त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे . चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या . तो तसाच राहिला .


ध्रांगध्रा - १५

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
डोक्यात जाळ पेटावा तशी आग आग होतेय. मी डोके उशीवर स्थिर टेकवायचा प्रयत्न करतो. ..... मेरी गो राउंडच्या पळण्यात खाली खाली जाताना जसं वाटते तसं काहीसं खाली खाली जातोय. खाली ..... आणखी खाली...... आणखी खाली. पृथ्वीला तळ नसल्यासारखे वाटतय. खाली...... खाली.... डोळ्यापुढची उजेडाची जाणीव नाहिशी होतेय. डोळ्या समोर अंधार पसरतोय. सुखद गारवा देणारा अंधार.... मागील दुवा ध्रांगध्रा - १४ http://misalpav.com/node/49793 कसलेसे आवाज येतात. कोणीतरी बोलतय. मी हळू हळू डोळे उघडतो. पांढरं स्वच्छ छत. आपल्या घरात कुठे आहे असे छत? " तो जागा होतोय" आईचा आवाज मी ओळखतो. पांढरा अ‍ॅप्रन ! डॉक्टर ? .....


ध्रांगध्रा- १४

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
गावातली घरं आता मागे पडलीत. अंधार त्यामुळे अधीकच गडद वाटतोय. आकाशात चंद्र... त्याचाच काय तो उजेड. आता आम्ही गावाबाहेरच्या खंदका जवळ आलोय. वाट खंदकाच्या पायर्‍यांपर्यंत पोहोचते.महेशने पायर्‍या उतरायला सुरवातपण केलीये. मी कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे कोंबतो.झीप लावतो. आणि महेशच्या पाठोपाठ खंदकाच्या पाण्यात पाऊल टाकतो मागील दुवा ध्रांगध्रा - १३ http://misalpav.com/node/49786 खंदक पार केला की पलीकडे पोहोचू.पाण्यातून आम्ही धावतोय. पाणी जवळजवळ कमरे इतके आहे. कमरेइत्तक्या पाण्यातून धावणं अशक्य असतं .


गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका येथे वाचा सहलीचा पाचवा दिवस. आज सोमनाथसाठी प्रवास सुरु करायचा होता. द्वारका ते सोमनाथ प्रवास चार तासांचा (२३०किमी) असला तरी वाटेत काही ठिकाणे बघायची असल्याने हा प्रवास सात-आठ तासांचा होणार होता. सकाळी सात वाजताच चहा पाहिजे म्हणून कॅन्टीनवाल्याला रात्रीच सांगून ठेवले होते. साडेसहालाच सर्व जण तयार होऊन सामानही गाडीत रवाना झाले होते. चहा झाला. हॉटेलचे बिल चुकते करून साडेसातला प्रवास सुरु झाला. आज पहिला थांबा होता 'पोरबंदर'. रस्ता अतिशय चांगला असून सकाळच्या वेळी रहदारीही जास्त नव्हती.


प्रतिभावंतांच्या तऱ्हा !

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात. या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या किश्शांची संख्याही भरपूर असते. अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल !


कविता

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
कामधेनूच्या कासेचे दूध म्हणजे कविता डंखानंतर मिळे तो मध म्हणजे कविता कल्पवृक्षाच्या छायेचे छत्र म्हणजे कविता अनाहत गुंजणारा मंत्र म्हणजे कविता किनार्‍याला जोखणारी लाट म्हणजे कविता अज्ञेयाला भिडणारी वाट म्हणजे कविता दहा दिशांनी घेरती अपरात्री पाश तिचे दिवसाच्या धगीमधे पार वितळे कविता