Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आता तुम्ही पण असल्यां प्रतिसादांना उत्तरे द्यायला लागला का ? मारा फाट्यावर !! इतक्या दिवसांनी तुम्ही लिहिते झालात याचा आनंद आहे .. लौकर लौकर येउ द्या

तसं सगळंच अनावश्यक आहे.
चुक भुल झाल्यास क्षमा करा. या भागाबद्दल बोलायच तर हा भाग अनावश्यक वाटला.
पण ही अनावश्यक जिलबी असं म्हणण्यामागचा उद्देश विस्कटून सांगितल्यास बरं होईल.
आधिच यावेळचा असह्य उन्हाळा, त्यात संस्थळावर नॉस्टेल्जियाचे आलेले उदंड पिक... हे असं असायच, ते तसं असायचे. तेव्हा अमुक केलं अन मग नंतर तमुक घडलंचा नुसता भडीमार... "त्या" काळातलं यांव अन "त्या" काळातलं त्यांव, कोणी मामाच्या गावात, कोणी शाळा कॉलेजात, कोणी स्टेशनात, कोणी बोटीवर म्हणून कोणी तरी वाड्याचा अट्टहास धरतय की काय असा प्रश्न लेख वाचुन निर्माण व्हावा.. इतका विदाउट हॅपनिंग. काही मोजके लोक सिध्दहस्तच असतात, म्हणुनच काय लिहले यापेक्षा लेखकाने दिलेला "टच" वाचकाचे मन जिंकुन घेत असतो. तसही हा भाग वाचताना गवीटच तर मिसींग नाहीच मुळी. पण साला इथे तुमचे धागे "गवीटच" साठी वाचायला येतं कोण... कारण तुम्हाला तुमच्या लिखाणातुन टच न्हवे तर पंच करायची सवय आहे. पण या लेखात नॉकौट मात्र या उदंड झालेल्या नॉस्टेल्जियाने केलय, अन हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. एक ते दोन वाक्ये सोडली तर गवी-पंच टोटल मिसींग आहे. ही कदाचीत माझी भावनिक चुकही असेल... पण तरीही लिखाण औपचारीकच वाटले, जणू चवदार वाटेल अशी सुरेख पण तोच साचा, तोच पदार्थ, अन तेच कंटेंट असणारी अनावश्यक जिलबी.

लेखकाने काय लिहावे हे आता वाचकांना विचारून लिहावे लागते हे माहिती नव्हते. पुढील लेख लिहिताना आधी वाचकांची परवानगी काढावी लागेल तर..!

ती सिवाजींची प्रेमळ तक्रार आहे मालक. पण मुळात हे नॉस्टॅल्जिक लेखन नाही तर केळकर नावाच्या कथानायकाचं लिखाण आहे असा माझा समज आहे, केळकरची स्टोरी समजण्यासाठी ब्राऊ नि त्याबरोबरची सगळी 'प्रकर्णे' वाचावीत असा अनाहूत सल्ला देण्याचे धाडस मी पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति करतो.

तुमचे मत मान्य. पण काय लिहावे व काय वाचावे याचे प्रत्येकाचे अधिकार ठरलेले आहेत व तरी एखादी तक्रार (प्रेमळ) जरी असली तर ती त्या लेखकाला व्यनि करुन किंवा खरड करुन कळवता येतेच की. हा जिलेबी इत्यादी काय प्रकार आहे हे समजले पण त्यानंतर आलेला खुल्लासा काही पटला नाही (वर मामाचे गाव याचा उल्लेख केला गेला आहे, त्यामुळेच लिहतो आहे असे नसले तरी त्यामुळे याकडे लक्ष वेधले गेले हे मात्र खरं).

त्यापेक्षा लेखन कसे असावे हे गवि आणि इतरांनाही कळावे, म्हणून सिवाजी-द-बॉस (अका) ... (अका) ... वगैरे यांनी निदान एक तरी लेख लिहावा असा अनाहूत सल्ला देण्याचे धाडस मी, पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति करत आहे.

मी, पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति
हे
मी पामर, मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति
असे वाचावे. स्वसंपादनाची सोय नसल्याचा परिणाम हो, बाकी काही नाही.

मी फक्त त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट व्हावं म्हणून विचारलं. असं ते का म्हणताहेत असा माझा प्रश्न मुळीच नाही. मला त्याची कल्पना आहे. बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. सिवाजी द बॉस यांनी केवळ या कथेचे यापूर्वीचे सर्व भागच नव्हे तर माझे सर्वच लिखाण अगदी पूर्वी आणि पूर्वीपासूनच वाचले आहे हे स्पष्ट झालं. स्वतः ते देखील एक मुळात उत्कृष्ट लेखक आहेत आणि बराच काळ लेखन केलेलं नाही. तेव्हा त्यांनी वेळ काढून अवश्य लिहातं व्हावं अशी माझीही विनंती आहे. धन्यवाद.

काय तुम्ही पैसा ताई.. तुम्हालाबी कळना का आता की कुणाला मनावर घ्यायचं न कुणाला फाट्यावर मारायचं.. गविंच्या लेखनाला.. तेही ब्राऊच्या सिरिझला "जिलबी" म्हणणार्‍या माणसाचं मुळात कुणी काही मनावर घेऊच कसं शकतं!

तिथे दिवसाही अंधार होता. आता हा अर्नी आतपर्यंत सोबत करतो की काय असं वाटायला लागलं.
=)) =))
आत गेल्यावर जो काही गुप्पकन अंधार झाला म्हणता. बसायचं कुठे तेही कळेना.
=)) =))
आता आपण बाहेर आलो की मालकीण उभी असणार चेक करायला या विचाराने आतच गोळा आला आणि दहा मिनिटांचं काम पाच मिनिटांत संपलं. संडासात नळ नव्हता. समोरच्या टाकीतून तीनचार वेळा डबा भरुन ओतणं भाग होतं.
खपलो =))

शेवटच्या एकाच वाक्यात कथन करणार्‍याचं मतपरिवर्तन झालेलं दाखवून पुढील दिशेचाही अंदाज दिलात. पुभाप्र.

पुण्यातले दिवस आठवले, याच टाईपची सुरुवात होती. अंधारलेल्या खोल्या, हिरवट थंडपणा, ढेकुण, काळपट चादरी, रंग उडालेल्या भिंती, अन् त्या पंधरा बाय बारामध्ये चार-पाचजण

सदाशिव पेठ का रे..?? मी डेक्कन. बाकी हेच आणि असेच वर्णन करेन आमच्या रूमचे. फक्त आम्ही १० बाय १० मध्ये ३ जण होतो. भरीस भर म्हणून आठवड्यातून दोन दिवस त्याच मजल्यावरती एक लहान मुलांचे क्लिनीक असायचे. :-))

Sequel आला... आता सगळे आधीचे पार्ट परत वाचून घेतो म्हणजे चांगली लिंक लागेल....

एकदा अशा वाड्यात कॉट बेसीसवर गेलो होतो. मालकीण बाईना गावावरुन अर्जंट बोलावण आल आहे असे सांगून एका दिवसात कल्टी मारली होती.पैशे द्यायचे होते म्हणुन वाचलो. नाहीतर एका महिन्याचा बांबू!

मस्त ओ …. पुण्यातल्या कॉट बेसिसच्या दिवसांची आठवण करून दिलीत. एकेक नमुने आठवले! :)

परवाच चर्चा करत होतो की गविंचं लिखाण हल्ली खूपच कमी झालंय पण तेव्हढ्यात ही मेजवानी आलीच.

या केळ्याच्या स्टोरीशी बरंच रिलेट करतोय मी :) पुभाप्र, लई वाट बघायला लावू नका..

अशा ठिकाणी राहण्याचा स्वानुभव नसला तरी मित्र-भौ इ.च्या रूमवर जाताना अशा रूम्स लै पाहिल्यात. खत्रूड अन तर्‍हेवाईक घरमालक हा यांचा मसावि म्हटला पाहिजे. बाकी रूमची कंडिशनसुद्धा काही वेगळी नाही. अगदी असेच! पण मत्कुणसंहाराचा मात्र दांडगा अनुभग गाठीशी आहे. कॉन्सण्ट्रेशन क्यांपात माणसे मारल्याच्या थाटात ढेकूण मारत असू. ढेकणांशी आमच्या हाष्टेल लाईफमधल्या बहुत आठवणी जोडलेल्या आहेत.आठवल्या तशा शेअर करतो. -हॉष्टेलतर्फे ढेकणाचे म्हणून फवारले जाणारे औषध-विशिष्ट वास यायचा त्याला, थोडासा आवडायचादेखील. पण ते फवारल्यावर रूममध्ये बसणे अशक्य व्हायचे आणि काही तास रूम बंद ठेवण्याची आज्ञा होत असे. मग तोपर्यंत कुठेतरी बाहेर उंडारणे आले. काही दिवसांनी दुप्पट जोमाने ढेकणांची पैदास व्हायची, काऽही फरक पडत नसे. -ढेकूण लै झाले की कॉटा रूमबाहेर आणायच्या. त्या आधी सगळी अंथरुणे-पांघरुणे झाद झाड झाडायची, तिथून काही ढेकूण बाहेर पडायचे. हे प्रीप्रोसेसिंग झाले, की मग कॉटांवर पेपर अंथरायचे-शक्यतोवर पुणे टाईम्सची रद्दी. शिवाय काही पेपर असे गुंडाळून त्यांची चूड करायची. मग ती पेटवायची. आणि सगळे पेपर जाळायचे. कॉरिडॉर बंदिस्त असला तर अगदी कुणाची चिता वगैरे जळत असल्यागत दृश्य दिसायचे. मध्येच मग कोपर्‍याकापर्‍यातले ढेकूण पळताना दिसायचे. त्यांची पांढरी अंडी फुटायची, त्याचा आवाज व्हायचा कधीमधी. एखादवेळेस कॉटच्या जास्तच जवळ गेल्यास काही ढेकूण अंगावरही चढायचे. चूड नीट पेटावी म्हणून ठीकठिकाणी थोडे मेण पाडले जायचे, मग मधूनमधून चूड अशी भस्कन पेटायची. हे झाले ड्राय क्लीनिंग. काहीवेळेस गरमागरम पाणी ओतूनही चांगले रिझल्ट्स मिळायचे. पण हेही काहीवेळेस तितके लागू पडायचे नाही. कारण खोली कितीही झाडली तरी साले ते दर्‍याखोर्‍यांत लपलेले ढेकूण साले दाद देत नसत. मग अशावेळी एकच उपाय- ऑल ऑट सुलतानढवा. मला एकदा रात्री लै पिडलं होतं नालायकांनी, ३-४ ला अंगांग खाजवत चरफडत जागा झालो. मग म्हटले %^&%$ना आज काय तो इंगा दाखवलाच पाहिजे. झालं मग, कॉट वर सांगितल्याप्रमाणे खोलीबाहेर आणली. आणि यावेळेस कर्कटक घेऊन कोपर्‍यातले समस्त ढेकूण, त्यांची अंडी, सगळा बाजार उठवला. नंतर परत कॉट जाळून शुद्ध केली आणि कॉट निर्मत्कुण केल्याच्या महदानंदात सुखाने झोपी गेलो. त्यानंतर मात्र कधीही ढेकणांनी फारसे कधी पिडले नाही. एखादा ढेकूण अधूनमधून सरहद्द ओलांडून यायचा तितकेच. -ढेकणांचे वैशिष्ट्य म्हंजे चिमटीत धडपणी सापडत नाहीत. दाबले तरी लगेच मरत नाहीत. दोन बोटांच्या मध्ये शिग्रेटीगत धरले तर कुठे पळून जातील काही ग्यारंटी नाही. पण साले मोठे चिवट असतात खरे. एकदा एक रक्त पिऊन टम्म फुगलेला ढेकूण पाहिला, आणि त्याला मारण्याची मनुष्यसुलभ इच्छा मनात जागृत झाली. रूमचे कुलूप त्यावर आदळले. रक्त सांडले, पण ढेकूणबुवा आरामात तसेच पुढे चालले होते. संताप अनिवार झाला आणि हॅकसॉ ब्लेडने सरळ त्याला आडवे कापले. तरीही बेटा ३-४ सेमी चालून मगच शांत झाला. -माझा एक मित्र आम्रिकेत पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला होता. तिकडे त्याचे काही दाक्षिणात्य मित्र होते, त्यांच्या रूममध्ये लै ढेकूण होते. इतके की शेवटी त्या रूममध्ये बसून बसून त्याच्या थ्रू ढेकूण मित्राच्या रूममध्ये पसरले. त्यांनी सगळ्या फर्निचरची वाट लावली, शेवटी सगळे फेकून द्यावे लागले. ढेकणांचा हा दबदबा सातासमुद्रापारही कायम असल्याचे पाहून डोळे पाणावले. (ढेकूण-उल्लेख पाहून गहिवरलेला) बॅटमॅन.

आगागागागागा.... डिट्टो असाच प्रकार आमच्याकडे पण होता. आम्ही असाच ढेकूणसंहार करायचो. उन्हाळ्यात भोवताली पाण्याची लक्ष्मणरेखा चारीबाजूंनी आखून झोपणे. पाणी वाळले की मधूनच ढेकूण यायचे मग त्यांना जाळणे, रॉकेल फवारणे इ,इ, बरेच प्रयोग चालायचे. भिंती सगळ्या काजळलेल्या असायच्या. >>>ढेकणांचे वैशिष्ट्य म्हंजे चिमटीत धडपणी सापडत नाहीत. दाबले तरी लगेच मरत नाहीत. दोन बोटांच्या मध्ये शिग्रेटीगत धरले तर कुठे पळून जातील काही ग्यारंटी नाही. पण साले मोठे चिवट असतात खरे. एकदा एक रक्त पिऊन टम्म फुगलेला ढेकूण पाहिला, आणि त्याला मारण्याची मनुष्यसुलभ इच्छा मनात जागृत झाली. रूमचे कुलूप त्यावर आदळले. रक्त सांडले, पण ढेकूणबुवा आरामात तसेच पुढे चालले होते. संताप अनिवार झाला आणि हॅकसॉ ब्लेडने सरळ त्याला आडवे कापले. तरीही बेटा ३-४ सेमी चालून मगच शांत झाला. विपरीत परिस्थितीत जगण्याच्या ऊर्मी माणसानं ढेकणाकडून घ्याव्यात. ;)