Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दत्ताच्या आरती वरचे हे विवेचन वाचताना माझी अशीच अवस्था झाली होती. अत्यंत रसाळ आणि ओघवते वर्णन आहे, आरती कडे पहाण्याचा नवा, वेगळा दृष्टीकोनही आवडला. वाचता वाचता मुळीं देह त्रिगुणाचा | सत्वरजतमाचा | त्यामध्यें सत्वाचा | उत्तम गुण ||१|| सत्वगुणें भगवद्भक्ती | रजोगुणें पुनरावृत्ती | तमोगुणें अधोगती | पावति प्राणी ||२|| त्यांतहि शुद्ध आणी सबळ | तेहि बोलिजेति सकळ | शुद्ध तेंचि जें निर्मळ | सबळ बाधक जाणावें ||३|| शुद्धसबळाचें लक्षण | सावध परिसा विचक्षण | शुद्ध तो परमार्थी जाण | सबळ तो संसारिक ||४|| तया संसारिकांची स्थिती | देहीं त्रिगुण वर्तती | येक येतां दोनी जाती | निघोनियां ||५|| द.२ स.५ हे आठवले

हरि हरि !! प्यारे लेख अत्यंत आवडला . (फक्त एक शंका/ पाठभेद : सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना >>> इथे "न" नाहीये बहुतेक ! मुनिजनांना समाधी ने नक्कीच दत्ततत्त्व समजुन घेता येईल तसे नसेल तर समाधी साधनाचा अवमानच होईल नाही का ? ) (अवांतर :असाच अजुन एक पाठभेद जिथे पुर्ण विरुध्द अर्थ येतो : मनाच्या श्लोकात > सुखाची स्वये सांडी जीवी करावी इथे काही जण दुखाची म्हणतात ... असो. )

आपण म्हणता तसं असू शकतं. पाठभेद असू शकतात. समाधीनं तत्त्व साध्य होतं पण समाधी नि ध्यान म्हणजे तत्त्व नव्हे. 'समाधी लागली' म्हणायला कुणी शिल्लक राहत नाही. 'जे व्हायचं ते होतं' असा अनुभव असतो कारण तो सांगता येत नाही. 'नेति नेति शब्द न ये अनुमाना | सुरवरमुनीजनयोगी समाधी न ये ध्याना' मध्ये अलिकडचा चरण पाहिला तर नेति नेति करत अनुमान सापडत नाही तसं निव्वळ स्वबळावर एवढे सारे लोक प्रयत्न करुन सुद्धा त्या तत्त्वाचं पूर्ण आकलन होत नाही असं म्हणायचं असावं असा अर्थ. ह्यात 'समाधी' हे सुद्धा साधनच आहे. थोडा 'अर्थवाद- स्तुति' असतो. बाकी मुळात आहेत ते शब्द. लिहीलंय कुणा अधिकारी व्यक्तीनं. त्यांना असंच म्हणायचं होतं का हे ठाऊक नाही. आपण फक्त त्यातून आपण आपल्याला हितकर अर्थ काढून (किमान विरोधी तरी नसावा असं) त्याचा वापर कसा करायचा हे ठरवायचं. 'नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स आणि फरगेट द सिस्टीम' ह्यातील रिझल्ट्स मिळाले नाहीत तर सिस्टीमचा इंच इंच ठाऊक असला तरी उपयोग होत नाही. तसंच 'साध्य होता साधनाचा ठाव' राहू नये.

प्यारे , स्पष्टीकरण आवडले ... 'नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स आणि फरगेट द सिस्टीम' हे ही पटले ... ( सध्या क्नोईग च्या स्टेपला आहे , म्हणुन जरा कनफ्युजन क्लीयर करुन घेत आहे :) ) कधीतरी प्रत्यक्ष भेटुन बोलुयात !!

दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो
आणि काय अर्थ काढतात!
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
इतक्या बाळबोध आणि मूर्ख गोष्टीचं समर्थन याला "विचारांची क्लॅरिटी" म्हणणं हा तर त्याहून मोठा विनोद!

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. ज्ञानाच्या अधिकार्‍यांसाठी कर्मकांड अथवा उपासना नाहीत त्यामुळं पुराणातल्या भाकडकथा देखील नाहीत. ह्या कथा आहेत आमच्यासारख्या सामान्यांसाठी. आपण प्रतिसाद दिलात ह्याचाच आनंद वाटला.

२१ वेळा अंगावर थुंकणार्‍या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे. गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे. असे प्यारे महाराज!

छान लिहिलीयस प्यारे. :) समजले काहीही नाही :( कदाचित समजून घेण्याइतकी बुध्दी माझी नाही. :( एखाद्या ओळीचा, श्लोकाचा भावार्थ, निरुपण सांगणार्‍यांबद्दल फार आदर वाटतो. कारण माहीत नाही. तो कदाचित संस्काराचा भाग असेल. त्यामुळेच तुला दंडवत.

उत्तम विवेचन. अवांतरः बाकी दत्ताचा उगम हा शंकराच्या 'सदाशिव' रूपातून उत्क्रांत झाला असे माझे मत आहे. हा त्रिमुखी शिव घारापुरी, वेरूळ येथे पाहावयास मिळतो. सदाशिव जरी पंचमुखी असला (सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि इषण) शंकराची ही त्रिमुखी रूपे सदाशिवाचीच आहेत असे संशोधकांचे मत आहे. अतिअवांतरः नाथसंप्रदायाचा उगम हा बौद्ध धर्मातूनच झाला असे मत कालच आमचे मित्र धन्याजीराव वाकडे यांनी बेडसे लेणी येथे व्यक्त केले. :)

महाराष्ट्र सोडून अन्यत्र दत्तोपासना कुठे आहे? उत्तर कर्नाटक सोडले तर कै दिसत नाही. उत्तरेत तर लोकांना असा कै देव असतो हेच माहिती नाही. गुजरातेत आहे का? केरळ-तमिऴनाडूमध्येही असल्याचे माहिती नै. आंध्रावाल्यांना विचारले पाहिजे. साधारण दत्तोपासनेची सुरुवात कधीपासून झाली असे म्हणता येईल? नृसिंह सरस्वतींच्या अगोदर दत्तोपासना पापिलवार नसल्याची शंका आहे.

हि आन्ध्रप्रदेश्,पिठापुर्,श्रीपाद श्रीवल्लभ्,गुजरात-गिरनार पर्वत; कर्नाटक-कुरवपुर्,गाणगापुर,महाराष्ट्र-औदुम्बर्,नरसोबाची वाडी,ई मला माहीत असलेली स्थाने आहेत बाकी जाणकार माहीती देतिलच.

धन्यवाद. कुरवपुर अन पिठापूर ठाऊक नव्हते, बाकीचे माहिती होते. (नरसोबाच्या वाडीचा फ्यान (मुख्यतः पेढा अन बासुंदी)) बॅटमॅन.

माझ्या वाचना नुसार्,दत्त उपासना ही महाराष्ट्रात ही माहुर गड येथे सुरु झाली,नन्तर श्रीपाद्श्रीवल्लभ्,हा पहिला अवतार्,पिठापुर आन्ध्र प्रदेशात्,नंतर न्रुसिंह सरस्वती परत महाराष्ट्रात कारन्जा ईथे झाले श्रीपाद्श्रीवल्लभांचा काळ साधारणता,ई स १३०० च्या आसपासच्या काळातील आहे,बाकी जाणकार ईतिहास अभ्यासक भर घालतीलच.

प्यारे१, विनन्तीला मान देवुन धागा काढल्या बद्दल धन्यवाद्,अत्यन्त उत्क्रुष्ठ विवेचन.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्कृष्ठं विवेचन. दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ इतका समर्पित भक्तीभाव माझ्याकडे नाही.. पण तरीही लेख आवडला. (अवांतर : त्या काळातही कुणालाही,,कुणाचीही, काहीही कारण नसताना परीक्षा घ्यायची परवानगी होती असं दिसतय)

अतिशय सुन्दर लेख . धन्यवाद प्यारे जी ! दत्तजन्माच्या कथेबाबत काही विक्रुत लोक उपहासात्मक व हेटाळणी करताना आढळतात .मूळात नारदाने चिथावनी देवुन अनुसया सर्वात मोठी पतिव्रता असल्याचे सानितले ,त्यामुळे शिव ,विश्णू आणि ब्रह्मा या देवतान्च्या बायका अनुसयेचा द्वेश /मत्सर करतिल आणि देवाना अनुसयेची सत्त्वपरीक्षा घ्यायला पाठवतील ,या कथेतच गोची आहे .कारण स्वर्गीय देवताना प्रुथ्वीवरिल माणसान्चा मत्सर वाटण्याचे काहिच कारण नाही . देव-देवतावर मानवी भावना आरोपित करुन पुराणात अशा अनेक प्रक्षिप्त कथा घुसडण्यात आलेल्या आहेत .त्यान्चे सन्शोधन करुन तत्त्वबोधात्मक /रूपकात्मक कथासार सान्गणे महत्त्वाचे आहे.अन्यथा अशा कथा म्हणजे धर्मबुडव्यान्साठी माकडाच्या हाती आयते कोलित देण्यासारखेच ठरते. आपल्या लेखातुन अप्रेक्षित असे धर्मप्रबोधन साध्य होइल अशी अपेक्षा !

अगदी कीर्तनकारांसारखं रसाळ विवेचन! लेख मस्त जमला आहे. या मालिकेत आणखी जरूर लिहा!

छान मांडलय. आपल्याला ते रूपक बिपक समजत नाहि. आय टेक इट अ‍ॅज इट इज :) अवांतरः अर्वाचीन काळात दत्त संप्रदायाला पुनर्प्रस्थापीत करण्याचं कार्य टेंबे स्वामींनी केलं. पीठापूर वगैरे स्थानं त्यांनीच प्रकाशात आणली... व तसं करताना त्यांनी ऐतिहासीक दस्तावेजांचा आश्रय घेतला नाहि... तपःश्चर्या हाच अघ्यास व प्रचिती हाच निकाल. दत्तोपासनेचा काळाच्या उदरात ट्रेस घेण्यात कोणास इंटरेस्ट असेल त्याने खुशाल ऐतिहासीक साधनांचा धांडोळा घ्यावा. ज्याला दत्ताशी मतलब आहे त्याने साक्षात दत्ताला किंवा अधिकारी गुरुला साकडं घालावं हे उत्तम. अति अवांतरः मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्‍या अत्याधिकारी गुरुंच्या मागे जाताना मात्र सर्वांनी सावधगिरी बाळगावी.

मनाने मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंटोल करणार्‍यांना तर अजुन ते भाकड आहेत हेच कळलं नाहिए. सबब, कायद्याच्या कचाट्यापासुन ते सध्यातरी फार लांब आहेत. मराठीत त्यांना काय म्हणतात माहित नाहित... इंग्रजीत त्यांना एक विशिष्ट शब्द आहे आणि त्यावर काहि दिवसांपूर्वी धन्याने एक उत्तम धागा काढला होता.

पण मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्‍या महाभागांना आपला भंपकपणा दिसुनच येत नाहि... तर कबुल काय करणार. त्यांचा सगळा भार असंबद्ध बोलण्यावर आणि स्वप्रतिमा पूजनावर... आणि पुन्हा एकदा काँग्रॅच्युलेशन्स... हे स्वप्रतिमापूजन देखील अंधश्रद्धेच्या कायद्याखाली येत नाहि.

अश्या भोळसट कथांवर विसंबणार्‍या तश्याच तद्दन भक्ताला कुणी काल्पनिक दत्त वाचवेल या व्यर्थ श्रद्धेतून जी निर्माण होते त्याला स्वप्रतिमा म्हणतात! मला खरंच आश्चर्य वाटतं किती बाळबोध विचारसरणी असू शकते याचं आणि झुंडीपुढे दाभोलकरांसारख्या व्यक्तिचे प्रयत्न कसे निरुपाय होऊ शकतात याचं. या भंपक कल्पनांपायीच धार्मिक आणि जातीय भेदापासून भारताला कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही आणि देशाच्या विकासात ही धार्मिक अनेकात्मकता (जी अश्या भरमसाठ देवांच्या निव्वळ कल्पनेवर आणि भोळसट लोकांच्या बाळबोध विश्वासावर टिकून आहे) सदैव बाधक ठरणार आहे.

पण आश्चर्य नाहि वाटलं, कुठलिही परिभाषा तयार करण्याचा अधिकार आहे ना न्यायमूर्तींना. तसंही मन जर मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंट्रोल करु शकतं तर त्याच्यापुढे कुणि दाभोळकर किस झाड कि पत्ती. आणि मग कंट्रोल करणारं मन पुढे जाऊन राष्ट्रोद्धाराच्या गप्पा मारेल तर ते त्याच्या भ्रमीत अवस्थेला शोभेसंच आहे. असो. आता सरकारने एक कायदा पास केला पाहिजे... लोकांनी साकाळी उठल्या बरोबर "मन मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंट्रोल करतय" असा मंत्र म्हणावा... म्हणजे पट्कन राष्ट्रीय ऐक्य साधल्या जाईल... या मंत्रप्रभावाने अखील मानवजात वैज्ञानीक दृष्टीकोनाची बनेल, दाभोळकर तर या मंत्रामागचा वैज्ञानीक दृष्टीकोन बघुन स्वर्गातुन आनंदाश्रू गाळतील... आणि असं नाहि झालं तरी भारत देश भोंगळ, मुर्खांचा बाजार आहे अशी न्यायधिशाची मखलाशी करता येईलच कि... सर्वज्ञ आहे ना न्यायधीश...

डॉ. दाभोलकरांचे काही विचार इथे द्यायचा मोह आवरत नाही.
घरीदारी आजूबाजूच्या वातावरणातून संस्कार घेतच सर्व व्यक्ती वाढतात. हे संस्कार बुद्धीशी सुसंगत असतात असे नाही. बहुधा नसतातच. माणसाला आधार हरघडी लागतो. हा आधार शोधताना विचारापेक्षा त्याचे संस्कार त्याच्यावर मात करतात. अडचणीच्या वेळी स्वतःच्या जीवनाचा आधारच त्या संस्कारात त्या आधारे केलेल्या कर्मकांडात तो शोधतो, मिळवतो, हे सारे सोडून देणे त्या प्रसंगी त्याच्या बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष व्यवहारात वळतेच असे नाही. चळवळीतील शहाणपणाचा आणि माणुसकीचा भाग येतो तो याच ठिकाणी. आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.

मला वाटतंय दाभोलकरांच्या चळवळीचं नाव : 'अंधश्रद्धा' निर्मूलन समिती असं होतं. ह्यातल्या ह्या 'अंधश्रद्धा' ह्या शब्दावर ह्याच मिसळपाव वर अनेक वेळा अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. अंध श्रद्धा ह्या विषयाची नेमकी व्याप्ती काय, तिचा उपयोग कुठं नि आणखी बर्‍याच गोष्टी इथं येतात. त्यांना स्वतःलाही श्रद्धा मुळासकट उखडून फेकायच्या असत्या तर 'श्रद्धा निर्मूलन समिती' असं नाव उपलब्ध असणारच की! अंधश्रद्धा का म्हटलं असावं? बाकी दाभोलकरांना विज्ञानातलं सुद्धा सगळंच्या सगळं कळत असेल असा खुद्द त्यांचाही दावा नसावा. अध्यात्मातल्या बर्‍याच विषयांची, संकल्पनांची माहिती दाभोलकरांना स्वत:ला असेल का ह्याबाबत मला शंका आहे. भीक नको पण कुत्रा आवर च्या चालीवर अध्यात्म नकोच पण कर्मकांडं आवर असा विषय असू शकतो. कथेबद्दल उहापोह होऊ शकतो असं सुरुवातीलाच म्हणताना दत्त जन्माची अशी अशी कथा सांगितली जाते इतकंच म्हटलेलं आहे. त्यापुढं जाऊन आपल्या हितासाठी श्रेयस्कर असेल त्या अनुषंगानं कथेकडं पाहणं उचित ठरतं. अनेकदा रुपककथांना कर्मठ परंपरांचं स्वरुप आलेलं दिसतं असं लेखातच म्हटलेलं असताना त्या कथेबाबत आणखी स्पष्ट काय लिहावं असा प्रश्न मज पामरास पडलेला आहे. दत्त येऊन मला वाचवेल किंवा मी धावा करुन दत्तानं मला वाचवावं असं एक तरी वाक्य लेखामध्ये दाखवून द्यावं. आधारासाठी देवाचा उपयोग करताना त्याचं संकटमोचक हे रुप सर्वसामान्याना भावतं, आवडतं त्याचा काही अंशी उपयोग देखील होतो मात्र देव म्हणजे 'संकटातून जामीन मिळवून देणारा वकील नव्हे' हे कृपया लक्षात घ्यावं.

दत्त येऊन मला वाचवेल किंवा मी धावा करुन दत्तानं मला वाचवावं असं एक तरी वाक्य लेखामध्ये दाखवून द्यावं.
आणि पुढचं वाक्य लगेच :
आधारासाठी देवाचा उपयोग करताना त्याचं संकटमोचक हे रुप सर्वसामान्याना भावतं, आवडतं त्याचा काही अंशी उपयोग देखील होतो ...
तत्पूर्वी म्हटलंय :
कथेबद्दल उहापोह होऊ शकतो
एकदा कथेचा फोलपणा लक्षात आला की दत्त कुठे उरतो? प्रश्न व्यक्तिगत असता तर गोष्ट वेगळी आहे पण निधर्मी देश निर्मितीत असल्या भाकड कथा पिढी-दर-पिढी पुढे संक्रमित होतात आणि धर्माधिष्ठित राजकारणाची तीच तर मेख आहे.

दाभोलकर ज्या दृष्टीकोनातुन या प्रॉब्लेमकडे बघतात तो योग्यच आहे. आणि तो दृष्टीकोन केवळ धार्मीक बाबतीत नाहि तर मानवी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत लागु पडतो. मग ते आहार असो वा शिक्षण, भाषा असो वा मेडीकल थेरपी, परराष्ट्र संबंध असो वा लग्नसंबंध. आपल्या पदरी जे काहि पडलय त्याची वस्तुनिष्ठ शहानिशा करण्याचा विवेक जर दाखवला नाहि तर संस्कार हे भारवाही ओझे बनुन राहातात. अडचणीच्यावेळी संस्कारात जीवनाचा आधार शोधणे हा अ‍ॅटिट्युड फार कॉमन आहे व त्याला कारण माणसाचा आळस आहे. किंबहुना, कमितकमी कष्टात, कमीतकमी रिस्क घेऊन आपलं काम झालं पाहिजे, हा अप्पोलपोट्टेपणा या सर्वांच्या मुळाशी आहे आणि ति माणासाची हौस आहे... हे सत्य स्विकारण्याऐवजी आपण अंधश्रद्धेच्या नावाने कितीही बोटं मोडली तरी समस्या सुटणार नाहि. सो कॉल्ड धार्मीक अंधश्रद्धा अस्तंगत पावुन इतर अंधश्रद्धा उभ्या राहतील, इतकच. (अंधश्रद्धा या शब्दातच मूलभूत चुका आहेत, असो). प्रस्तुत चर्चा दत्तप्रभूंच्या जन्मकथेच्या भाकडपणाविषयी सुरु झाली बहुतेक. कुणाला त्यात भाकडपणा दिसेल तर कुणाला रूपकं दिसतील. कुणाला त्यात दत्तप्रभूंची लीला दिसेल तर कुणाला तो विश्वात्मक शक्तीच्या अविष्काराचं विलोभनीय रूप वाटेल. आता आपलाच दृष्टीकोन तो योग्य आणि इतरांचे विचार म्हणजे कचरा असा अ‍ॅटिट्युड असणारे त्याला नावे ठेवतीलच. आणि त्याला कारण त्यांच्या मनात स्वतःविषयीचा गोंधळ आहे. हा गोंधळ त्यांना सर्वसमावेशक विचार करुच देत नाहि. आपल्या मनात असा कुठलाच गोंधळ नाहि हि देखील एक अंधश्रद्धाच... आणि हे सत्य स्विकारण्याचं धाडस ते दाखवणार नाहित.

आपल्या पदरी जे काहि पडलय त्याची वस्तुनिष्ठ शहानिशा करण्याचा विवेक जर दाखवला नाहि तर संस्कार हे भारवाही ओझे बनुन राहातात.
आणि वस्तुनिष्ठता काय? तर म्हणे :
अडचणीच्यावेळी संस्कारात जीवनाचा आधार शोधणे हा अ‍ॅटिट्युड फार कॉमन आहे व त्याला कारण माणसाचा आळस आहे.
शेवटी तर कमाल आहे :
प्रस्तुत चर्चा दत्तप्रभूंच्या जन्मकथेच्या भाकडपणाविषयी सुरु झाली बहुतेक
म्हणजे चर्चा कुठे चालू झाली आणि आपण काय प्रतिसाद देतो याचं भान नाही. त्यामुळे लेख तरी नीट वाचला की नाही शंका आहे. लेखात हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे (आणि माझ्या सर्व प्रतिसादंचा रोख त्यावर आहे):
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
आता याचा वस्तुनिष्ठ उहापोह असंभव आहे. मग काय मानसिक गोंधळाला पारावर नाही :
कुणाला त्यात भाकडपणा दिसेल तर कुणाला रूपकं दिसतील. कुणाला त्यात दत्तप्रभूंची लीला दिसेल तर कुणाला तो विश्वात्मक शक्तीच्या अविष्काराचं विलोभनीय रूप वाटेल
मस्त! बसा बघत!!

आपला गोंधळ चव्हाट्यावर मांडायची संधी साधल्याबद्दल पुन्हा एकदा काँग्रेच्युलेशन्स. मनाबाहेर पडुन मनाला नाकारणारं मन न्यायधिशाची भुमीका वठवायची खुमखुमी किती केवीलवाण्या पद्धतीने सादर करते आहे. हि त्या मनाची हौस आहे... इलाज नाहि.

>>>>(अंधश्रद्धा या शब्दातच मूलभूत चुका आहेत, असो). अगदी अगदी! मुळात 'पहिल्या पावलावर' कुठलीही श्रद्धा अंधच असते. कारण तो एखाद्या वस्तूवर अथवा व्यक्तीवर अथवा तिच्या सांगण्यावर, कृतीवर ठेवलेला आंधळा विश्वास असतो. ते करताना हळूहळू पावलं टाकत टाकत आपल्याला त्याचे परिणाम दिसू लागतात नि तो विश्वास बळकट होऊ लागतो. काही काळानं त्या परिणामांचा परिणाम म्हणून विश्वासाचं रुपांतरण श्रद्धेमध्ये होतं. श्रद्धेची उपयोजिता 'दुसर्‍याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं ही आहे. ह्याउलट जिला दाभोलकर अंधश्रद्धा म्हणतात ती मुळात 'विकृत श्रद्धा' आहे. तिची उपयोजिता काहीतरी हेतू ठेवून 'दुसर्‍याला अथवा स्वतःला त्रास देऊन, नुकसान करुन, पीडा देऊन' इप्सित साध्य करणं अथवा तसे प्रयत्न करणे' ही आहे. (मुख्य फरक स्व/परपीडा, नुकसान होणं आणि न होणं आहे असं माझं मत आहे) एखाद्यानं सांगणं की रोज २५ सूर्यनमस्कार घातलेस तर तुझं आरोग्य सुधारेल. त्याच्या शब्दावर सुरुवातीला आंधळा विश्वास ठेवून तसं केल्यानं नक्कीच आरोग्य सुधारेल. (बहुसंख्यांच्या बाबत हा विचार आहे. वैद्यकीय सल्ला आवश्यक. ;) ) ज्यानं सांगितलं त्यानं सूर्यनमस्कार घातले नसतील तरी परिणाम होईलच. ही त्या माणसाप्रती श्रद्धा आहे. मात्र तुझं आरोग्य सुधारण्यासाठी उपाय सांगण्याऐवजी दुसर्‍या व्यक्तीनं काही केलंय म्हणून तुझं आरोग्य सुधारत नाहीये तर तू अमुक तमुक कर म्हणून प्रवृत्त करणं नि ती कृती समोरच्यानं करणं ही विकृत श्रद्धा आहे. अर्थात हे अत्यंत सामान्य पातळीवरचं उदाहरण होय.

'दुसर्‍याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं ही आहे.
आणि ध्येय काय? तर
ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे
अश्या काल्पनिक स्टोर्‍यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम. अश्या व्यक्तिगत भ्रमाला पाठींबा मिळावा म्हणून असली भाकड पोस्ट आणि त्यातून `तुम्ही ही आरतीला लागा' ही शिकवण. या उप्पर भलावण काय तर `दुसर्‍याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं'!

कशाला संक्षी या भाकड लोकांवर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करताय ह्यांना राहुन्द्या ह्यांच्या विश्वात तुम्ही लिहा फाहू फक्कड काहीतरी वाट बघतोय