अश्या काल्पनिक स्टोर्यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम.
संक्षी, देव किंवा दत्त किंवा त्यासम गोष्टी ही एक गुंगी आहे हे मला वैयक्तिकरित्या मान्य आहे. पण दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है.. असं मानणं हे बहुतांश लोकांना गरजेचं आहे हेही खरंच आहे.
या गुंगीतून मनुष्य जागा होणं अत्यंत अवघड.. आणि बहुतेक वेळा अनावश्यक. कारण जागं झालं तरी शेवटी अंतहीन अज्ञाताचं भिंताड आहेच.. त्यामुळेच या गुंगीला विरोध करु नये असं माझं म्हणणं आहे. जाऊ दे.
याचं कारण असं की :
"ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे"
असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ?
तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे..
म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो.
मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण?
आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही.
शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही. काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो..
श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स..
तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे.
काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे.
ता.क. प्यारे.. तू आजपासून मिपाचा बुवा नं. १ (मॅक्डोवेल नं. १ च्या चालीत वाचावे.)
दो इट हार्ड्ली मॅटर्स...
"आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही."
-- ऑस्सम
___/\___
गवि प्रतिसाद आवडला. सगळं पटलं नाही तरी तुम्हाला आमच्याकडून आमचंच खरं माना म्हणून सक्ती अथवा बंदी नाहीच्च. भ्रम नक्की काय ह्या भ्रमात आपण सगळेच आहोत. ;)
सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासारविचारे, संतसंगे||
समर्थ रामदास म्हणतात, प्यारे नाही. आता ते कोण विचारलंत तर मग बोलूयाच नको. उपयोग नाही.
सगुणाच्या> दत्ताच्या, अवताराच्या आलंबनानं निर्गुण निराकाराचाच अनुभव घ्यायचाय.
सार म्हणजे शाश्वत काय नि अशाश्वत काय ह्याचा शोध संतांच्या 'संगानं' घ्यायचाय.
ज्याला कशाचंच काही माहिती नाही त्याला हे आलंबन आवश्यक असतं. ड्रायव्हिंग शिकताना ए बी सी शिकतो का? तसंच. पण ड्रायव्हींग शिकल्यावर नाही गरज त्याची. तशीच वाढ होणं अपेक्षित असलं तरी आधी ए बी सी नको का?
तसंच माणसाच्या बुद्धीला असलेल्या मर्यादांमुळं तर्क तोकडे पडतात हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा.
बाकी आपण आम्हास बुवा म्हणताय खरं पण आत्मुस बुवांची एन ओ सी आणलीये का? ;)
तुमच्या प्रतिसादातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुनरुधृत करतो :
माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते
आणि हा पुढचा भाग देखिल अत्यंत योग्य आहे
...त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
पण इतक्या भोंगळपणाला अजूनही माना डोलावणारे (किमान इथले तरी) असंख्य सदस्य विचार कधी करणार? म्हणजे "मार्ग खूप लांबचा आहे" याचा अर्थ 'आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?
या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही. तुमचं लिखाण काय, प्यारेचं काय आणि दाभोलकरांचं काय सगळ्यांच्या लिखाणातून जे मला घेण्यासारखं वाटतं तेवढं मी घेते. या जगात संपूर्ण टाकाऊ अशी कोणतीच गोष्ट नसते. बाकी सर्वांनाच _/\_
अगदी कीर्तनकारांसारखं रसाळ विवेचन! लेख मस्त जमला आहे. या मालिकेत आणखी जरूर लिहा!
आणि त्या अनुषंगानं दाभोलकरांच्या विचारातला तुम्हाला मुळात अधोरेखित करायचा भाग हा होता :
त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
पण इतक्या उघड गोष्टीला :
आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?
इथली एक जवाबदार व्यक्ती म्हणून स्वतःचं मत व्यक्त करायची वेळ आली तेंव्हा तुम्ही हमालाची भूमिका घेतलीये. कसा होणार बदल?
@ पैजारबुवा, मस्तच.
@ श्रुति: प्रयत्न करेन.
@ वल्ली, बॅटमॅनः आभारी आहे.
@ अनिरुद्ध प : आपल्या पाठपुराव्यामुळे लिहीलं. आभारी आहे.
@ संजयजी : प्रतिसादाबद्दल आभार
@ आदूबाळ, मनीषा : आभार
@ मंदार कात्रे : कथेमध्ये 'नग्न म्हणजे न अग्न'- न शिजवलेलं असं अन्न हवं' अशी मागणी केली असा देखील एक प्रवाद आहे. त्यामुळं अनसूयेनं दूध दिलं वगैरे. कथा मान्य कराव्यात श्रद्धापूर्वक. त्यातून आपल्याला श्रेयस्कर मांडावं.
@अर्धवटराव.
>>>तपःश्चर्या हाच अघ्यास व प्रचिती हाच निकाल.
+१११
मंथुनि नवनीता तैसे घे अनंता| वाया व्यर्थ कथा सांडिमार्गु||
आंब्याच्या बागेत झाडं किती, कलम कुठलं, पान पिवळं का, खत कुठलं वापरता, झाड उंच का हे पहावं का हाताला लागलेल्या आंब्याची गोडी चाखावी हे ज्यानं त्यानं ठरवावं.
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे नि वाचकांचे आभार!
लेख चांगला आहे. मी स्वतः व्यक्तिशः अश्रद्ध व नास्तिक असलो तरी श्रद्धेची मानसिक गरज बहुसंख्यांना आहे हे मला मान्य आहेच. त्यामुळे, एक निरागस आणि निरुपद्रवी श्रद्धा या स्वरुपात हे ठीक आहे.
पण नग्न = न + अग्न = म्हणजे न शिजवलेले- या व्युत्पत्तीबद्दल शंका आहे. कोणी संस्कृत तज्ज्ञ खुलासा करतील काय?
लेख आवडला ...
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! हे भारीच ...
स्वभावातला माजोरडेपणा कुणा समोर नतमस्तक होऊ देत नाही.. कुणीही तारणहार नाही हा विचार "दत्त दत्त ऐसे लागले ध्यान" पर्यंत जाउ देत नाही.. अध्यात्म समजुन घेण्याइतका संयम आणि प्रगल्भता नाही.. त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात.. हेवा वाटतो.. आमच्या विचारसरणी मधुन ही शांतता लाभायला मला तरी बराच वेळ आहे.. अजुनही वैचारिक संघर्षच चालु आहे.. पण ही शांतता मनाला लाभावी अशी तु माझ्यासाठी प्रार्थना कर..!
तुझे लेखन ओघवते आहे.. मला त्यातल काही कळत नसलं तरी वाचायला छान वाटलं..
>>त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात.
देवावर श्रद्धा असेल प्यारेकाकांची, पण ते शांत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे बरं !! ;)
:( ( बिकाकाका कमी बोलून किंवा काहीच्च न बोलता बरंच बोलतात ब्वा!)
'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो!
मी तरी काय करणार नि तुम्ही तरी. नाही का? ;)
>>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो!
प्यारेकाका, तुमची संतवाणी सोडून आमच्यासारख्या सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगाल काय?
लेखामधले विवेचन सुरेख आहे. जन्ममरणाचा फेरा वगैरेवर ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी चांगले मार्गदर्शक आहे. नसला तरी वाचायला छान आहे.
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
या कडव्यामधील भाषाशैली वेगळी वाटते, तसेच त्यातला अर्थ आधीच्या आणि नंतरच्या कडव्यांशी सुसंगत प्रवाहात (फ्लोमध्ये) वाटत नाही. कदाचित हे कडवे संत एकनाथांनी लिहिले नसून अन्य कोणी जोडले असावे असे वाटते.
सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हि पौराणिक गोष्ट लिहिणार्यांनी इथे सुधा स्त्री ला बदनाम करायचा chnace सोडला नाहीये . म्हणे ३ देवींना मत्सर वाटला म्हणून . कितीही मत्सर वाटला तरी कुठलीच स्त्री आपल्या पतीला दुसर्या नग्न स्त्री च्या पुढे उभा राहा म्हणणार नहि. ………… असो .
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.
हेच सत्य अनुसयेला तिला माहित नवत
अनुसया कितीही मोठी पतिव्रता असली तरी आपल्या आईचा हे अज्ञान बघून दत्तात्रेयांना दुख झालं आणि ते आपल्या आईचे गुरु झालेत .
श्रीपाद श्रीवल्लभ , न्रुसिह सरस्वती हे तर अगदी अलीकडच्या काळातले अवतार आहेत. प्रत्येक युगामध्ये भगवान दत्तात्रय अवतार घेवून लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतायेत . रामायण मध्ये एक उल्लेख आहे . दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले. पुढे राम अवतारामध्ये वनवासात असताना राम जेव्हा अत्री आश्रमात अले. तेव्हा आपल्या सुनेला बघून अनुसयेला खूप आनंद झाला आणि ते दागिने तिले सीतेला दिले. रावण पळवून नेत असताना सीतेने जे दागिने खाली फेकले ते हेच दागिने होते.
दत्त उपासना हि हजारो वर्षांपासून चालू अहे..
अवतार उदंड होती , आणिक मागुती जाती
तैसी नोहे हि दत्त मूर्ती , कल्पांती अंत असेना !!
अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे
अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे
आणि दत्तात्रेयांनी लग्न केलं नाही म्हणून काय झालं? शेवटच्या लग्नापर्यंत पीएनजी ते दागिने पुन्हापुन्हा घडवून नववधूंना सजवत राहाणार आहेत!
_________________________________________
मायला, एकदा स्टोर्या सुरु झाल्या की त्यांना अंत नाही!
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.
असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय? सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला >>>>कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
कथेबरोबरच वाचकांनी हा परिच्छेद देखील वाचावा ही नम्र विनंती!
प्रतिक्रिया
@ तुम्ही लिहा फाहू फक्कड काहीतरी
अश्या काल्पनिक स्टोर्यातून
अबाबाबाबा
यु अटेण्ड सॅल्व्हेशन डुड !!!
@ गवि
___/\___
@ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण
मी तो हमाल भारवाही
या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही?
:)
@ तुमच्या प्रतिसादातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुनरुधृत करतो :
@ पैजारबुवा, मस्तच.
धन्साशिर्वाद, प्यारे...
प्यारेबुवा सातारकर वा आफळे इ
आवडले !
खुप छान आणी अप्रतिम लेख.
येवढ्या मोठ्या गोष्टी समजून
+१
पुना पुना वाचायचं...
वा प्यारेबुवा, छान लिहिताय.
सुंदर लेख
मस्त !
छान लिहिले आहे.
सुंदर
स्वभावातला माजोरडेपणा कुणा
>>त्यामुळे तुझ्या सारख्या
मी तुझं कौतुक केलं होतं रे
___/\___ प्रयत्न करतोय रे!
(No subject)
( बिकाकाका कमी बोलून किंवा
(No subject)
>>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण
का छळतोस रे प्यारे काकांना
सुपर्ब !!
आवडले...अजुन दोन एक वेळा
तिसरे कडवे
दत्तगुरूंचे २४ गुरू
अभ्या, अक्षया, श्रीवेद,
(No subject)
ह. भ. प. (ओरिजिनल लाँगफॉर्म
सुरेख लिहिले आहे. अतिशय आवडले
+१
+१
खुप छान विवेचन ! धन्यवाद
दत्त दत्त
सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट
रावण पळवून नेत असताना सीतेने जे दागिने खाली फेकले ते हेच दागिने
एक प्रश्न
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह
मुघले आझम मधले गाणे
Pagination