Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो. कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो. पूर्ण आरती : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ (पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली) आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो. ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्‍या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे. मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती. ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया. हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच) दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्‍या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात. अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते. तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्‍या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच) हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात. मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात? माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर! स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो. भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते. अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं. आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं. माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते. हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली! त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्‍याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!) नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना| जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो. 'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव, 'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि' ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो)) जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही. पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत| आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात. ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे. थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं. हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्‍या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! ) अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान|| तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे. असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे =)) म्हणजे देव मोठा करायचा तर तेसुद्धा माणसानंच करायचं म्हण की. आव आणायचा भक्तीचा पण करायची ईश्वरनिंदा हे कै खर्‍या भक्ताला शोभत नाही. दत्तभक्तांना चालत असेल तर माहिती नाही बॉ.

>>चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे नायतर काय !! बरं का म्हैसबाई, तुम्ही एकदा काय लिहायचं ते ठरवाच!! एका धाग्यावर देव सगळीकडे असतो म्हणता इकडे दोन देवांमध्ये भेदभाव? बाकी दत्तमहाराजांप्रमाणे खंडेरायाबद्दल कोणी पुस्तके लिहीली आहेत का हा प्रश्न विचारुन आपण पुन्हा एकदा आपल्या आयडीला जागल्या आहात हेवेसांनल.

=)) अहो म्हैसतै तुम्हाला जसा दत्त दैवत आहे असं वाटतंय तसा बाकीच्यांना खंडोबा हे दैवत का वाटू नये? खंडोबावर पण ग्रंथ आहेत. महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा. मग सगळे रेफरन्स मिळतील. बाकी माझं जाऊदे, मी देव वैग्रे काही मानत नै. पण दुसर्‍या देवांवर टिका करतांना आपण आपलेही भान सोडत आहोत हे जरा ध्यानात ठेवा म्हणजे झालं.

प्यारे , batman माझ्या प्रतिसादामध्ये मी कोणाचा वैयक्तिक उल्लेख केला नहिये. पिलियन रायडर ने batman चा नाव त्यांच्या प्रतिसादात घातल्यामुळे साहजिक रोख batman कडे गेला

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे
मी काय म्हणतेय ते तुला समजतंय का? पुस्तके वाचल्याने दत्त अस्तित्वाचा अनुभव येतो असा म्हणलाय मि… आधी नित काय लिहिलंय ते वाच अन मग खरड .
महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा
हि फक्त माहिती अहे. एखादी गोष्ट सांगावी तशी …. त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला? अहो सगळ्या महाराष्ट्राच काय ? माझाही कुलदैवत पालीचा खंडोबा आहे . आणि खंडोबाची बहिण मानली गेलेली इंजाबाई कुलदेवी आहे . वर्षानुवर्षे आम्ही सुधा खंडोबाची भक्ती केलीये ……. आमच्या देव्हार्यात खंडोबाचे टाक आहेत . केवळ लहानपणापासून हे आपला कुलदैवत आहे हे मनावर ठसाव्ल्यामुळे ……. आणि संपूर्ण महाराष्ट्राचीही हीच धारणा असेल तुम्ही नीट बघितलं तर खंडोबाच्या बाबतीत नुसतीच कर्मकांड , जत्रा उरूस वगेरे आहेत. महाराष्ट्राच कुलदैवत असला भक्ती अशी नहिच.

म्हशे, तुला माहिती नाही म्हणून खंडोबाची प्रचीती कुणाला येत नाही असे धडधडीत खोटे विधान कसे करू धजावलीस? सांप्रदायिक झापड सोडून अन्य देवतेकडे बघायची कुवत नसेल तर फायदा काय? खंडोबाचे भक्त तुला ठाऊक नसतील म्हणून काय झालं? अशी मुक्ताफळे उधळण्याचा अधिकार तुला कोणी दिला?

असं कसं ? देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही असे विधान विज्ञानवादी करतात ते चालतं आणि म्हशीचं बोलणं नाही चालत ! दिस इज नोत फेअर... आयटेल्यु संपादित

मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद संपादित केला त्यांसः फेअर आणि ब्रौन यांमधील मजेने केलेली कोटी समजली नसेल तर संपादित करणे हे उत्तर नव्हे.

@त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला?>>> =)) मला...मला झालाय

खंडो"बा

चा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा! समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

हो पण त्यावेळेस म्हणे दत्त महाराज खंडोबाला भेटायला आले होते.. सहज ! त्यांनी कमंडलूतील पाणी फेकले. त्या थेंबांचे भुंगे झाले आणि पुढचं घडलं. आमच्या आगामी दत्त वर्सेस्स खंडॉबा या पुस्तकात सर्व दिले आहे. आगाऊ मागणी खरडीत करावी,.

हो. जेजुरीच्या खंडोबाची, वेरूळच्या कैलासनाथाची, भुलेश्वरच्या महादेवाची पण अशीच काहीशी गोष्ट आहे. =))

व्हाया मुलखेड मार्गे ;) आहे ते! इसमें कौनसी बडी बात हो गयी जी? अजी गॉड तो गॉड होते है जी! और वैसे भी मिपा पे अवांतर तो यु एस पी है ना जी? -विनय पाठक मोड चलो दिल्ली!

थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही" असे विधान तुम्ही करता आहात असा सरळसरळ आरोप मारकुटे तुमच्यावर करताहेत.. तुम्हाला हे मान्य आहे का? बॅटमन.. उत्तर द्या... हो किंवा नाही .. प्यारे.. तुम्ही थांबा.. तुम्हाला मी नंतर वेळ देणार आहे. बॅटमन तुम्ही उत्तर द्या.. वाचकांचा कौल बघूया.. "दत्तकथांना भाकड म्हणावे की नाही" १ टक्का "माहीत नाही" असं म्हणताहेत ९९ टक्के "हे थांबवा" असं म्हणताहेत.. ब्रेकनंतर मी थेट प्यारे यांच्याकडे जाणार आहे.. तोपर्यंत ..

स्कोर सेटलींग म्हणायचं हा नवा पलायनवाद आहे! कथा बोगस आहे कारण वर्णन केलेल्या गोष्टी वास्तविक नाहीत. आणि कथेचा अर्थ काहीही काढा; हे कन्क्लूजन :
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
बेसलेस आहे कारण कुणाच्या घरी कुणी येत नाही. मुळात दत्त असं कुणी नाहीच तर येणार कोण? लेखात शेवटी तर भलताच यू टर्न मारला आहे:
जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
शांतता आरती पूर्वी होतीच! आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे. ________________________ याव्यतिरिक्त लेखकानं प्रतिसादात पूर्वप्रकाशित लेखाचा संदर्भ दिलायं ते लेखन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लेखावरची सहजची ही कमेंट :
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
सगळं सांगून जाते त्यामुळे या लेखालाही लागू आहे! (संपादित)

तुम्ही थकाल पण काही उप्योग होणार नाई. जाऊ द्या बसा निवांत मजा पहात... माणसानं स्वतःला सुधारावं दुसर्‍याला सुधरण्याच्या भानगडीत पडू नै ! काही उपेग होत नै... लै आले गेले... कुनी सुधरलं नाई... हे नाही तर ते चालूच आहे घ्या मळा थोडी मारा फक्की आन मजा घ्या

आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे.> जन्मण्यापूर्वीची आणि मेल्यानंतरची अवस्था एकच आहे. तस्मात जगणं व्यर्थ आहे! :D

आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल, आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!! हे काय आहे? आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?

हे काय आहे?
लॉर्ड ऑफ द रिंग्ज नामक प्रकार ठाऊक असेलच. त्यातल्या त्या सॉरॉननिर्मित रिंगवरचे एल्व्हिश लिपीतले आणि मॉर्डॉरच्या ब्लॅक स्पीच मधले इन्स्क्रिप्शन आहे. त्याचा अर्थ "One ring to rule them all, one ring to find them, one ring to unite them all and in the darkness bind them" असा होतो.
आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?
स्वतःसाठी म्हणा खरे तर ;)

अखिल विश्वात एक शक्ती भरून राहिली आहे, मग तिला निसर्ग, प्रकृती, चेतना, प्राण, देव, ईश्वर काहीही म्हणा; इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे या शक्तीला दिलेले सगुणस्वरूप ही निव्वळ मानवाची कल्पना आणि निर्मिती आहे. मानवाने आपल्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी, मानसिक स्थैर्यासाठी अनेक संकल्पना आणि रचनांची निर्मिती केली. त्यातल्या काही ऐहिक तर काही तात्त्विक. घरे ,रस्ते, वीज, पाणी, संगणक, अणुविज्ञान, टेलिफोन, स्तोत्रे, आरत्या, माहात्म्ये, चरित्रे, मंत्र, तंत्र, तर्क,न्याय हे सर्व मानवनिर्मित आहे. (जरी यातली काही वेदांगे आहेत आणि वेद अपौरुषेय मानले तरी). आता यातल्या काहींच्या अतिरेकाचे काही हानिकारक परिणाम झाले, साइड-ईफेक्ट्स झाले, हेही मान्य व्हावे. जसे, पर्यावरणाची हानी, ग्लोबल वॉर्मिंग, अणुयुद्धे, नरसंहार, आत्यंतिक सुखलोलुपतेमुळे शारीरिक आणि मानसिक सौख्याचा विनाश वगैरे. याचे एक कारण सुचते, ते असे की ही सर्व मानवनिर्मित संसाधने (अथवा साधने म्हणू) कशी वापरायची तेही मानवानेच ठरवले. (दुसरे कोण ठरवणार? मानवनिर्मित ईश्वर तर 'मानवनिर्मित अणुबाँब मानवावरच टाक', अशी आज्ञा करीत नसणार? आता 'ईश्वरानेच तशी बुद्धी मानवाला दिली' असे म्हटले तर वादच खुंटला.) या साधनांचा योग्य वापर करण्यात मानवाची बुद्धी कमी पडली/पडते, म्हणून हे श्रद्धेचे, अंधश्रद्धेचे, भोंदू बाबांचे, जपतप-अनुष्ठानाचे, निष्क्रियतेचे, जबाबदारी झटकण्याचे प्रश्न निर्माण होतात. समजा आरंभी देवाने ही सृष्टी निर्माण केली असे मानले तरी पुढची जबाबदारी मानवावरच आहे. "....पुरोवाच प्रजापति:, अनेन प्रसविष्यध्वम, एष वोsस्त्विष्टकामधुक" असे त्यानेच म्हणून ठेवले आहे. अगदी कर्मफल आणि पुनर्जन्म मानला तरी या जन्मात आपली बुद्धी वापरून योग्य आचरण करण्याची जबाबदारी केवळ मानवाची आहे. ती देवावर ढकलून उपयोगाचे नाही. चित्त एकाग्र आणि विकाररहित राखू शकल्यास अधिक सूक्ष्म आकलन होऊ शकते, निर्णयक्षमता वाढते हे आपण अनुभवतो. त्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. पण ही अधिकची आकलनशक्ती, ज्ञान का मिळवायचे, हे मानवाने ठरवायचे आहे. आजपर्यंत मानव प्रत्येक गोष्ट त्याच्या आदिम प्रेरणेनुसार केवळ स्वान्तसुखाय करीत आलेला आहे. देव पाहिजे, कशासाठी तर मानवाच्या सुखासाठी. पर्यावरण जपले पाहिजे, मानवाच्या हितासाठी. गाय उपयुक्त पशू आहे,कारण ती आपल्यासाठी दूध देते (तिच्या वासरांसाठी नव्हे). अशा तर्‍हेने हे विश्व मानवकेंद्रित आहे असे धरूनच मानव वागतो. सर्व सृष्टी जणू मानवाने स्वतःसाठी वेठीला धरली आहे. त्यात 'देव' ही कल्पनासुद्धा आलीच.

प्रतिसाद आवडला. मात्र आपण म्हणता तसं हा एक सर्वंकष मानवजातीचा जबाबदारीचा भाग झाला. मात्र साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळ्या जगाशी घेणंदेणं नसतंच. आपल्या रुटीनमध्ये आवश्यक घ टकांचा विचार करुन त्या अनु षंगानं जर आपण आ धीच श्रद्धापूर्वक एखादी उपासना करत असू तर अशा प्रकारच्या विचाराचा उपयोग व्हावा असं मत आहे. आजदेखील (किंबहुना हल्ली जास्त) अनेकानेक लोक सगुणोपासनेमध्ये आपली मनःशांती शोधतात. दत्त जयंती साजरी होते हे वास्तव आहे. जर ती तशी होत असेल तर एखाद्या देवळात जाऊन 'बंद करा हे सगळं, दत्त वगैरे काही नाहीये, उगाच वेळ काढताय कशाला' म्हणून उपयोग नाही ना? श्रद्धा आहे तर तिचा फोकस अशा पद्धतीनं ठेवल्यास जास्त उपयोग होईल असं सांगणं जास्त समावेशक नाही का? बाकी वर लेखात म्हटल्याप्रमाणं समीकरण सोडवण्यासाठीचा क्ष नंतर विसर्जीत करावा नि गोडबोलेंना दिलेल्या प्रतिसादात रिझल्ट मिळाल्यावर सिस्टीम देखील सोडून द्यावी ह्याकडं कुणाचं लक्ष गेलं नाहीये का? असो!

रिज़ल्ट काय हवा ह्याविषयीच तर भ्रांती आहे. अख्खी गीता स्थितधी: होण्यासाठी उपाय सांगते. किंबहुना तेच लक्ष्य आहे असेही सांगते. कारण बुद्धी स्थिर झाली की कर्माकर्माचा विवेक होऊ शकतो. पण आपण तर कर्म काय असावे हे आपल्या तुटपुंज्या आणि अस्थिर बुद्धीच्या साहाय्याने आधीच ठरवू पहातो आणि तदनुसार कृती व्हावी म्हणून प्रार्थना/जप/अनुष्ठान.......इ. करतो. लक्ष्य कोणते असावे हे जाणण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तर ते योग्य ठरेल. पण आपण इतके दुटप्पी की लक्ष्य अपूर्ण अशा मानवी बुद्धीने (आधी) ठरवतो आणि ते गाठण्यासाठी देवाची मदत मागतो. आणि रिज़ल्ट मिळाल्यावर सिस्टिम सोडून द्यावी असे नाही. कारण रिज़ल्ट तात्पुरता असू शकतो त्यामुळे सिस्टिमला रोज घासूनपुसून लख्ख ठेवणे जरूरीचे असते. ऐहिक यश हवे असेल तर ते कितीही मिळाले तरी कमी पडते. 'हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते'. सिस्टिम सोडली म्हणजे शिस्त मोडली. अमुक एक गोष्ट मिळाली,आता समाधान झाले, असे असते का? शाश्वत समाधानाचा मार्ग वेगळा आहे, तो या (अनुष्ठानादि) अंगांनी बहुधा सापडत नाही. मुंगी होऊन मुंगीच्या मार्गाने किंवा पक्षी होऊन आकाशमार्गाने फळाप्रत जावे हे काही एका टप्प्यापर्यंत ठीक. मुद्दलात जे दिसते तेच आणि तिथेच फळ असते का, की तिथे पोचल्यावर भ्रमनिरास होणार असतो? आपण ठरवलेल्या आणि अंदाजलेल्या फळाप्रत पोचण्यात इतकी शक्ती खर्च होते की पुन्हा मागे वळून दुसरा मार्गही अनुसरता येत नाही. हे असे होते याचे कारण आपण फळ ठरवलेले असते. आपण साध्यावर लक्ष्य केंद्रित करतो, साधनावर नाही. म्हणून साधनशुचिता(सुद्धा) महत्त्वाची.

रिझल्ट काय ? आत्यंतिक शांती, तृप्ती, समाधान नि आनंद. कुठल्याही व्यक्ती, वस्तू अथवा परिस्थिती असण्या अथवा नसण्यानं न बदलणारा आनंद. स्वत: स्वतःशी प्रामाणिक राहून तो शोधायचा. शोधायचं कुणाकडं? त्याचेही क्रायटेरिया ठरलेत. आहे. सगळं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये (ग्रंथ) आहे. आपलं लक्ष नसतं. स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे? आहे की! त्याच्याकडेच जावं? तो नसेल तर तसं बनण्याचा प्रयत्न करता करता वाट सापडते. भक्त कोण? यो मद्भक्त स मे प्रियः - कोण? अनपेक्ष, शुचि दक्ष, उद-आसीन, गतव्यथा, सर्वारम्भ परित्यागी. जो हर्षाच्या, शोकाच्या लाटेत वाहत नाही, ज्याच्या कांक्षा नसतात. शुभ अशुभाच्या संकल्पना स्वच्छ आहेत तो. मार्ग वेगळे असले तर साधन सुद्धा सांभाळावं लागतंच. फरगेट सिस्टीम म्हणताना रिझल्ट मिळाल्यावर ती सोडायचीये. आधी नाही. नंतर देखील सोडायची, मोडायची नाहीच.