सुखाचा शोध
"सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती इच्छा करून चालत नाही ,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची समजूत करून चालत नाही."
मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं.
एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो.
"जीवनात ही घडी अशीच राहू दे.
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"
हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो.
मिसळपाव
ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणार्या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे
नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू.