Skip to main content

लेख

प्रति(मा)भा उरी धरूनी तू काव्य करीत रहावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 22/08/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
"हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कवीला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?" काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो, "अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती." हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करून मला म्हणाला

बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/08/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते. मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल!

मंदाची बाईआज्जी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 21/08/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं. म्हणाली, "माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता.

द्दावं,द्दावं आणि द्दावं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 19/08/2008 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
"हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे" माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार. मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक ऐकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती कायसांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमवि

नफिसा यादव

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
नफिसा यादव राजसच्या शाळेला दिवाळीची सुट्टि.. आणि त्यात शनीवार असल्यामुळे नवरोबाही घरात्..तसा दर शनीवारी मला त्याचा फार हेवा वाटतो पण आज जरा जास्तच वाटत होता. त्यात त्याची शेषशाही मुद्रा.. आणि चिरंजीवांची मस्ती.. त्यांच्या भोवती घुटमळणार्‍या मला टुकटुक करुन वाकुल्या दाखवत होती. ऑफिसल दांडि मारावी अस मनात शंभरदा येताना आवरा-आवर करणारी मी.. घरात सगळेच सैलावलेले.. माझी ही जरा अळम-टळमच चाललेली.. तस फारस काम नव्हत थांबाव का घरी.. म्हणता म्हणता माझी तयारी झालिही..चला आता थांबून चालणार नाही माझ मलाच सांगत समजावत बेटूचा पापा घेऊन निघाले.. तोवर बहाद्दुर दारात हजर झाला..

चायनीज खाद्यंती

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 18/08/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर 'मँडारिन' की 'नानकिंग' अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत.

सैनिक हो! तुमच्या साठी....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/08/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.