Skip to main content

लेख

माटुंग्याचे वामनकाका

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 17/09/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना, "माटुंग्याचे आजोबा" म्हणायचो. नावाप्रमाणे वामनकाका उंचीने "वामनमुर्ती"च होते.शिक्षण एव्हडं तेव्हडंच त्यामुळे उपजीवीकेचं सोपं साधन म्हणजे "आचारी" होणं.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या, कोथिंबीर, मिरची, नारळ, वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही भाज्यांमुळे त्या झोळीचं सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता. पायात चांबड्याची पट्या पट्याची चप्पल डोक्यावर "गांधी "टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.

वेड्या आठ्वणी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/09/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
अक्का, आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात. तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 10/09/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी तळ्यावर त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला, "भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं. सकाळच्याच गप्पाचा

"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 09/09/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ "वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले". वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते" प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 09/09/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !

भाली नावाचा असाच एक सडेफटिंग

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 08/09/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणं दिसतात अगदी तशीच ठोकणं त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि " ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार?