शुभेच्छा
सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकरचा आज वाढदिवस !
यानिमित्याने आपण सर्व जण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात !
क्रिकेट मधील जे काही विक्रम अजून शिल्लक राहिले असतील ते त्याच्या कडून पुर्ण होतील यात शंका नाही.
( सगळ्यात जास्त शुन्यावर बाद होण्याचा विक्रम अजुन बाकी आहे ना?
एक व्य नि..!
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :)
आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही.
'कबीर बानी'
पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे. 'कबीर बानी - म्युझिक फॉर सोल' असे या अल्बमचे नाव असून अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे प्रकाशन पुण्यात केले जाणार आहे.
या अल्बमविषयी राहूल देशपांडे यांनी सांगितले की, निर्गुणी भजने ही खास भारतीय परंपरा. कबीर आणि त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या रचना त्यात मोडतात.
थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'
थोरांची ओळख
जालिंदर जलालाबादी :
या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे.
जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला.
त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.
नववर्षाच्या शुभेच्छा!!
सर्व मि.पा.करा॑ना गुढीपाडव्याच्या मनापासुन शुभेच्छा!!
जयेश माधव
गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !
प्रिय दोस्त लोक आणि परिवार ,
"सप्रे"म नमस्कार विनंती विशेष !
उद्या बहुतेक सर्वांना सुट्टी असेल म्हणून आजच आगाऊ शुभेच्छा !
आपणा सर्वांना हे शालिवाहन शके १९३१ चे नूतन वर्ष सुख समृध्दी , आरोग्य आणि भरभराटीचे जावो !
सोबतच्या शुभेच्छा पत्रामधे शालिवाहन शके १९२८ आहे ते १९३१ असे वाचावे कारण वेळेअभावी यावर्षी काही नवीन लिहू शकलो नाहि !
गैरसोयीबध्दल क्षमस्व !
आपला विनम्र ,
उदय गंगाधर सप्रे,ठाणे.

मिसळपाव