Skip to main content

कविता

पण आई म्हणते की..............

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 30/08/2015 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते तुझे नशीले डोळे त्या तुझ्या नखरेल अदा वर हसताना गालावर पडणारी खळी " हाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्या ओढीने बरसणारा तो........ अन त्याच्यासवे धुंद भिजणारी तु....... तुझी ओलती शहारणारी काया पाहुन आता त्या पावसाचीही हालत थोडीशी " टाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्यासाठी रात्रभर जागणारा तो..... अन चांदण्यांच्या दुलईत शांत निजणारी तु..... झोपेत

एकांत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 29/08/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते हे फूल, वा काय त्याचे नाव? विचारतो ना सांगतो तो स्वतः शी बोलतो! कळी आज लाजते फूल उद्याला हासते पाहतो! ना बोलतो, तो स्वतः शी हासतो! रंग हिचा केशरी गर्द तिचा सोनेरी स्पर्शतो ना तोडतो तो स्वतःशी रंगतो! ...... ..... फूल त्याच्या अंतरीचे किती कसे कळलावे? डोलते ना थांबते वाऱ्यातून हुरहुरते!
काव्यरस

आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय !!!!

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 27/08/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय अन आठवणीच्या मेघांनी आभाळ पुन्हा दाटतय थोडे रुसवे थोडे भांडण थोडी समजूत आणि खूप सारे प्रेम पुन्हा मनात साठवावं असे वाटतय, खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय जुने झालाय प्रेम थोडे आणि आपण हि जुनेच झालोय आता एकमेकांच्या मनातले पक्के ओळखू लागलोय आता कोणत्या वाक्यावर तो वैतागणार तिला आहे नक्की ठावूक आणि त्याला आता जमू लागलय सावरणे तिला, जेव्हा ती होते अगदी भावूक तरीसुद्धा, पुन्हा एकदा नव्याने भेटावे असे वाटतय खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय जुने ते सोने म्हणतोच कि आपण वेळ जाईल तसे दृढ होते नाते अस मानतोच कि आपण वर्षामागून वर्

नियती

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/08/2015 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मागते काहीं रखरखाट तप्त कुठेसा त्या रस्त्यावरती ओला तो थेंब शुष्क रुधिराचा भिरभिरति नकळत डोळे शोधी आधार छताचा ते खांब चारच होते ना मागमुस भिंतीचा सुकलेल्या ओष्ठांना हलके स्पर्श तप्त अश्रुंचा थांबले गालांवर मोती ओघळला श्वास कोरडासा त्या श्वासांमधले अंतर मोजण्यापल्याड असते मी फ़क्त मोजतो श्वास अन्तरही फसवे असते जगणे बुभुक्षिताचे भूक संपता संपत नाही ते स्वप्न शोषिती माझे शोधती सत्य आभासी ते दिवे दूर जाताना सावली सोडते साथ बांधू पाहतो नशिबा पाठीवर बांधुनी हात ते दिवस कोडगे होते रात्री लाजिरवाण्या स्वप्नांचे इमले इतुके विश्वास बाटगा होता ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगं
काव्यरस

निरोप

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 23/08/2015 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या दोन चरणांवरती हलका झुकला माथा 'सुखी रहा'च्या शब्दांपाशी निरोप अडला साधा! अनुबंधांची कि जन्मांतरीची अशीच असते रेषा परतो, अथवा जावो दिगंता चिवट असते आशा. वाटला तितका सोपा नव्हता वृद्ध अनोळखी धागा जुन्यापान्या झाडांचाच खोल असतो ठिकाणा!

आठवन

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 22/08/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुरु होऊदे अबोल गोष्टी पुन्हा येऊदे जुना शहारा हळू चोरट्या नजरे मागुन पुन्हा करावा कुणी पहारा पुन्हा येऊदे रात्र बिलोरी स्वप्नाला जी साद घालते पुन्हा वाटूदे शणास मजला कुणी पाहूनी मला भाळते पुन्हा हाथ या हाथि यावा पुन्हा साथीने रात्र सरावी कुणी मिटोनि हळूच डोळे मुक्या मिठिची आस धरावि

सुखी जग

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 22/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!
काव्यरस

मन

लेखक शीतल जोशी यांनी शुक्रवार, 21/08/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले किती शोधले तरी, न एक डोळा दिसले मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता मन कणखर किती , सावटाची दाटे भीती सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता मन प

अनाहत

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/08/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत