Skip to main content

कविता

हिरवाई..!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 24/07/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
https://fbcdn-photos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-0/11011683_874883005931320_1886834214894539045_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=e150fb00433e127ce5eb77b63cd14a3d&oe=56498752&__gda__=1448309304_9470a65a2ebf713595aaffabdcccfc60 पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले! रंगा
काव्यरस

पुन्हा पाऊस

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?

समाधी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 23/07/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप चोरटा एक कटाक्ष मध्यान्ही काळोखात पेंगले निवांत नेत्र मायाळू मंद सूरात गारढोण श्वासस्पर्श युगे धरला अबोला अजागळ अजस्र देह आतून अथांग ओला स्पर्शून गंगामाई घाबरे परत फिरे दुधाळ स्तनामधुनि पाझरती नीलहिरे चुनखड़ी गा त्याचा अनंत उच्छवास सालीना मिळतो आहे लोबानी मुखवास ------------- . nrsimha >> ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप >> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत

.....ही मनाची अंतरे...

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 22/07/2015 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
काव्यरस

पाऊस

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 22/07/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या.

सरिंवर सरी आल्या ग...

लेखक मितान यांनी बुधवार, 22/07/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो. तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली.

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 16/07/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

हवा एक पाऊस..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी मंगळवार, 14/07/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
हवा एक पाऊस मला गाफिल पाहुन अवचित बरसणारा... लटक्या रागावर माझ्या लडिवाळ हसणारा... हवा एक पाऊस ओळखीच्या खुणांवर उगीचच रेंगाळणारा... ओल्या वाटांवरल्या पाउलखुणा जपणारा... हवा एक पाऊस बेधुंद उत्कट सरींनी मला वेढणारा... घेऊनी मिठीत मजला अलवार शहारणारा... हवा एक पाऊस दूर माळरानात रातराणीस छेडणारा... मालवून चांदण्या सार्‍या रात्र नशावणारा........... हवा एक पाऊस फक्त माझ्या अन माझ्यासाठीचा झरणारा पसरलेल्या आभाळातुन ओंजळीत विसावणारा.........

वर्तुळ

लेखक शब्दवेडी यांनी मंगळवार, 14/07/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न … चू. भू. दे. घे. प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित वर्तुळ वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही आयुष्य व्यापून टाकेल इतका कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही …. अपुरेपणाच्या विस्तृत्वाला कोणतीच रेषा छेदत नसते कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते …. वर्तुळाच्या गोलाईचा कोणताच एक आकार नाही मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं कोणतच एक सूत्र नाही …. गुरफटलेल्या आकृत्यांना खरंतर स्वत:ची नावंच नसतात आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. - शब्दवेडी