Skip to main content

कविता

अव्यक्त

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 04/08/2015 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा तरी रे आले होते, खूण ओळखीची शोधत होते, नाहीच झाली पण भेट आपली, मी उम्बर्यातच थिजले होते. किती जपून आणले शब्द होते, तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते, मौनात वेदना डोळ्यांत विझल्या, शब्द कधीच रे निसटले होते. किती अंतर चालून आले होते, आता कुठे बघ विसावले होते, दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते, मूर्त रूप मी त्याला देत होते, कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला, ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.

सोडल्य दह्यात मिश्या ( करून दाखवले )

लेखक पाटीलअमित यांनी शनिवार, 01/08/2015 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
prequel 1 मुल प्रेना मोकलाया दाहि दिश्या तसेच हे आव्हान ============================================== prequel 2 पण ह्या लेखाचा जबाबदार आहे समाज ,तो समाज जो कंपू बाजी करतो तो समाज जबाबदार .एक माणूस मिपाबालक म्हणून परवेश करतो एका नवीन घरात ,पण मिळते काय तर धिक्कार तिरस्कार वाटले होते लहान मुलाला समजून घेतील वडीलधारे पण इथे मिळाले पार बायको सारखे उणे दुने काढणारे असो ====================================== निस्त्ले केसं ते मला खून वीत आहे स्वह

कट्टा........!!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 30/07/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टा............. मित्रांच्या मैफिलीत होता तो ही रंगलेला हास्यविनोद अन टाळ्यांनी होता तो ही सजलेला तेथे जमणार्‍या सार्‍या अवलियांची तो "जान" होता येणार्‍या जाणार्‍यामध्ये त्याला कौतुकाचा "मान" होता टिंगल-टवाळी, शेरो-शायरी किस्स्यांचा तेथे बाजार होता राग, द्वेष, मत्सर, अविश्वासाला तेथे किंचितही थारा नव्हता हरएक पिकनीक ही त्यालाच विचारुन ठरवलेली प्रत्येक पार्टीची कुणकुण सर्वप्रथम त्यालाच कळलेली एरियामधली नवी आयटम ह्यानेच पहिली हेरलेली गुजरणारी हरएक बाला वहिनी नाहीतर भाभी ठरलेली आजवर जे कुणा सांगितले नाही ते इथे बोलायची मुभा होती सोल्युशन मिळायची गॆरेंटी नाही पण टेंशनगुलची हमी होती अश्या

बहर

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/07/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस गारवा संध्याकाळ निवांतपणा गुलजार-बिलजार सगळं आहे . . . . कागद मात्र....कधीचा कोरा काही शब्द एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स तडफड थोडीशी भिती जमणार आहे की नाही? पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा छ्या... तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?
काव्यरस

नुसतेच शब्द ओठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/07/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क र
काव्यरस

स्वतंत्र

लेखक पथिक यांनी सोमवार, 27/07/2015 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत मुंगीपासून-देव माश्यापर्यंत सगळेच बद्ध - कुणी भौतिक तर कुणी निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या आपापल्या कक्षेत. एकटा माणूसच या सगळ्याला अपवाद - आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून ऊन-सावल्यांतून भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा हेच आहे त्याचं ओझं हीच आहे त्याची व्यथा हाच आहे त्याचा गौरव हीच आहे त्याची महत्ता
काव्यरस

सगळेच सुरळीत चालले आहे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 27/07/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात यंदा सगळेच सुरळीत चालले आहे..... देशाच्या उज्जवल भवितव्याची सर्वांना खात्री पटली आहे..... सर्वत्र पुरेसा पाऊस पडतोय... एल नीनो चा प्रभाव अजिबात जाणवत नाहीये. कुठेच दुष्काळाचे सावट नाही. विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत नाहीये. कर्णाटकाच्या शुगरबेल्टचा शेतकरी उभ्या उसाला आग लावत त्यात स्वतःची होळी पेटवत नाहीये, त्यांचा ऊस वेळीच उचलला कारखान्यांनी... मराठवाड्यात जायकवाडी तुडुंब भरले आहे, टैंकरची गरजच भासत नाहीये कुठेही. मोसंबीडाळिंबाच्या बागा अजिबात सुकल्या नाहीत. जनावरे छावणीत गेली नाही बिल्कुल. उस उत्पादकांना मनाजोगता भाव भेटतोय. धानाची दुबार पेरणी करायची गरज नाही. उत्तरेच्या राज्यांत

शुष्क

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 26/07/2015 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी
काव्यरस

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

शीर्षक सुचले नाही

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 25/07/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद आता मी पळतो..........