Skip to main content

कविता

व्यायामी ओव्या

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 27/06/2015 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

मनमोर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले, लाघवी मेघदूत, खिडकीबाहेर रंगलेला..... बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा...! नेमक्या त्याच वेळी, तुझ्या निद्रीस्त चेहर्‍याला व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा....! ..... ..... हे सगळं अनुभवण्यासाठी... अवघे दोनच डोळे .... ? अं ह... आता ते दोन्ही डोळेसुद्धा मिटले आणि... आणि फुलवला पिसारा मनमोराचा....! .... ... सगळ्या अंगांगाला फुटलेत लक्ष लक्ष डोळे ... आणि सुरू जाहला, एक अलौकिक सोहळा........! विशाल पूर्वप्रकाशित :मनमोर...
काव्यरस

गुलझार

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय गुलझार, समजायला लागल तेव्हा तु जी 'माचिस' पेटवलीस ती आजतागयात चालूच आहे. 'आसमा के पार शायद और कोई आसमा होगा' अस म्हणत जेव्हा स्वप्न पुरी करण्या साठी पुण्यात आलो तेव्हा सुद्धा तू सोबत होतास. घर सोडल्यावर "छोड आये हम वो गलीया" च महत्व जाणवल तेच तू सोबत होता. रात्री बेरात्री जेव्हा पुण्यात 'एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता है' म्हणत घरोंदा शोधत भटकत होतो तेव्हा तू सोबत होता. 'सपने मे मिलती है' अस म्हणत फक्त स्वप्नात मिळणारी कुडी जेव्हा प्रत्यक्षात भेटली, तेव्हा 'पहली बार मोहब्बत कि है' असा म्हणत दोघात एक ICE -cream खाताना तुझी सोबत होती. 'हुजूर

नंगा नाचेन मी एक दिवस

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 26/06/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत

पैंजणे

लेखक सटक यांनी शुक्रवार, 26/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे ! उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे ! आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे ! पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !
काव्यरस

फैज अहमद फैज च्या एका कवितेचा अनुवाद

लेखक पथिक यांनी गुरुवार, 25/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
गझलसम्राट सुरेश भटांनी ज्यांना आपलं दैवत म्हटलं आहे त्या फैज अहमद फैज यांची खासियत म्हणजे त्यांच्या शायरीतला अद्भुतरम्य (romantic) आणि क्रांतिकारी (revolutionary) आशयांचा अतिशय सुंदर मिलाफ. त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे.

आंगणवाडी ते ....

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/06/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

जातीयेसच तर जा...!!!

लेखक वटवट यांनी गुरुवार, 25/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ.. बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग.. अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार.. अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार .. उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा.. विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा.. अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने.. कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे.. हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे..

पाऊस

लेखक सटक यांनी बुधवार, 24/06/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे ! निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !! सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे ! अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !! जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे ! लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !! बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे ! धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !! या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे ! जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/06/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले