Skip to main content

कविता

जगावेगळे... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/06/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
जगावेगळे मागणे मागतो मी तुझी याद नाही विसर मागतो मी स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी किती आजवर मीच केलीत पापे नको श्वास आता, अभय मागतो मी इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे जमावे मला वाकणे.., मागतो मी नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची 'हरामीपणा' थोडका मागतो मी जगाला कळेना विनंत्या मनाच्या विषाचाच जहरीपणा मागतो मी कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! विशाल..
काव्यरस

ती आणि मी

लेखक गरजू पाटिल. यांनी मंगळवार, 09/06/2015 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
(हे अगदी असं असायचं, म्हणून तसंच कवितेत लिहायचा प्रयत्न केलाय. ह्या सप्त्यातलं माझं भविष्य वाचलेलं असून देखील) तिच्या नी माझ्या एकच वाटा, फरक इतकाच... मी जायचा त्या वाटेने आणि ती यायची... आमच्या दिशा वेगळ्या होत्या. तिचे नी माझे थांबे ही एकच, फरक इतकाच...

प्रेम

लेखक Hrushikesh Marathe यांनी शनिवार, 06/06/2015 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा हात माझ्या हाती, शब्द फिके अशा एकांती, प्रतिबिंब तुझे घेऊन झाली सांज गुलाबी क्षितिजावरती... किनारा असा फेसाळलेला, आसमंत सारा गंधाळलेला, बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा तुझ्याच डोळ्यांत सामावलेला... होई अचानक तुझा स्पर्श वेडा, हर्षीलाच जाई जीव हा बापडा, चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की बने राजवर्खी हा ऋतू कोरडा... किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी, हिंडो कुठेही, विसावा किनारी, असला दुरावा जरा काळ तरीही, प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी... - हृषीकेश

तुझं प्रेम

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 05/06/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं प्रेम कित्येक मैलाचा प्रवास केल्यावर मिळालेला विसावा म्हणजे तुझं प्रेम अथांग सागर पोहून पार केल्यानंतर मिळालेला किनारा म्हणजे तुझं प्रेम आयुष्याच्या खडतर प्रवासात लाभलेलं सुख म्हणजे तुझं प्रेम अपार कष्टानंतर सुखाची ओंजळ भरून मिळालेलं फळ म्हणजे तुझं प्रेम सुखादुखाच्या असह्य वेदनेनंतर क्षमलेली कळ म्हणजे तुझं प्रेम मायेचा ओलावा.. ममतेचा पाझर जीवनभराचा गारवा म्हणजे तू प्रेम - गणेश पावले लेखन संपादित केलेले आहे --------------------

मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

लेखक Hrushikesh Marathe यांनी बुधवार, 03/06/2015 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं, तुझं हसणं, तुझं दिसणं, सारं काही नवीनच, तरीही या नव्याचा मला ध्यास जडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम तु म्हणावे चल निघुया अन् मी म्हणावे थांब, दिवसभर चालू आपले हे खेळ वेडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! दिवस असला सोबत तरीही,रात्र स्वप्नांची कधीना सरे रात्रंदिवस संवाद आपुले, तरीही पडती हे क्षण अपुरे, क्षण सोबतचे आठवी मन, अन् रमे त्यातचं वेडे..! या नात्याची ओळख न उलगडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! हृषीकेश

मित्रवेडा

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 02/06/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स. थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स. डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं अन तंद्री भंग होता होत नाही पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.

पिंपळ

लेखक पथिक यांनी सोमवार, 01/06/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा! एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/05/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल पूर्वीचे आज महानगर झाले पहिल्या पेक्षा जास्त खतरनाक झाले. भरल्या पोटी वाघ करत नव्हता शिकार. बेधुंध कार आज कधीही घेते प्राण. तेंव्हा दरवळत होता सुगंध मलयज गिरीचा. पेट्रोलच्या वासाने आज कासावीस होतो प्राण. कांव कांव कावळ्यांचे घरटे उंच मीनारांवर अंगणातली चिवताई कुठे हरवली आज.
काव्यरस