Skip to main content

कविता

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 29/05/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली

एक केवळ बाप तो

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/05/2015 22:30 या दिवशी प्रकाशित केले.

एक केवळ बाप तो


तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

वरूणराजाचे आगमन

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी बुधवार, 27/05/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
वरूणराजाचे आगमन ऐश आरामात जगती माणसे, निसर्गाची विल्हेवाट लावून. पाऊस पडला नाही म्हणून, शेतकरी घेतो जीवन संपवून. वाचवा सर्वांचा शेतकरी राजा, घ्या हे मनावर कोरून. पिकवतो धान्य आपल्यासाठी तो, स्वतः काबाडकष्ट करून.  वरूणराजाचे आगमन होणार, म्हणून मन प्रसन्न आहे. कसा बरसेल कोणावर ? हेच एक प्रश्न चिन्ह आहे. यल्लप्पा सटवाजी कोकणे २६ मे २०१५ ९८९२५६७२६४

भोगदासी........

लेखक एक एकटा एकटाच यांनी मंगळवार, 26/05/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
घडयाळ्याचे काटे मध्यरात्रीकडे कलत असताना जेव्हा सारे शहर निद्रेच्या अधीन होत असते हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये तेव्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते ओठांवर लाली,केसांत मोगर्‍याच्या माळा सर्वांगावर मंद अत्तर दरवळत असते वरकरणी लावलेल्या पावडरच्या थरांमागे नशिबाने गंजलेला चेहरा लपवत असते. रात्री घराकडे परतणारी जोडपी डोळ्यांत साठवूण नकळत मग तीही मनातून सुखावत असते त्याच्या बाहुत विश्वासाने विसावलेल्या तिच्याजागी गुपचुप स्वतःची छबी नेऊन ठेवत असते थंड वार्‍यासोबत वहावत आलेल्या त्याच्या आठवणीने हलकेच मग आतून शहारत असते त्याच्यासोबत रचलेला भातुकलीचा संसार आता दररात्री एका नव्या नवर्‍यासं

'कविता' म्हणजे काय वेगळे

लेखक विदेश यांनी मंगळवार, 26/05/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
खोल दरीतले वाहते पाणी उंच डोंगरावर पक्षी प्राणी कानावर घोंघावणारे वादळ नितळ दिसणारा सागरतळ फांदीवर हळूच फूल डुलणारे वाऱ्यावरून पान तरंगणारे नभात चांदणी चमचमणारी सागरात बोट हेलकावणारी झाडावरून खार तुरुतरुणारी रोपट्यावर कळी मोहावणारी सशाचा डोळा लुकलुकणारा वाळूतला शिंपला चमकणारा कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे एका झुरळाचे सहस्र डोळे शब्दात रंगवणे हेच सगळे "कविता" म्हणजे काय वेगळे ..! .

अजुनी दूर किनारे

लेखक अर्व यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे जेथे मैफीली सुरांच्या होत्या कधी काळी सजली तिथे आता जखमांची मांदीयाळी भिजलेला श्रावणगंध वाहती अजूनी वारे ... संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे ... वाटेतल्या फुलांनो रोखा श्वास तुमचे विपरीत अर्थ आहेत तुमच्या स्पंदनांचे क्षण शेवटाचा उशाशी तरीही गंध का रे? संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे कवी :  निशांत तेंडोलकर ..
काव्यरस