Skip to main content

कविता

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

मालगाड़ी

लेखक Vimodak यांनी शुक्रवार, 01/05/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आय नाय, बाप हाय. आगीवाले डोळे त्याचे, अन जबान चाबुक हाय. निघतो रोज सकाळपारी धूर सोडत इंजनवाणी, जणू पटरी पायाखाली. ठरली ठेसनं ठरलं काम, येगळी माणसं येगळा दाम. येतो झिजून रातपारी धूर सोडत इंजनवाणी, वेडीवाकडी पटरी घेउन पायाखाली. पाठ लाऊन भिताडाला घाम पाजीत बसतो अन, 'काय केलस दिसभर?' जणू इचारतो सोताला.. 'काय नाय' जवाब मातूर माझा हाय. आगिवाले डोळे ओकतो, चाबुकवाली जबान ठोकतो, हातालाभी लई जोर, हाणतो मात्र आंगचोर. विडी-चूल पेटवून आत, रोजच्यावाणी डाळ-भात, खाऊन पडतो गपगार.. पाहत राहतो उदयापार. 'काय करणार?'

कविता - हापूस

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 01/05/2015 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात.

आईशप्पथ.........!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 30/04/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
अपरं नाक उडवून, गालाचा फुगा फुगवून वर फुकाचा राग धरून, जेव्हा तु माझ्यावर रुसुन बसतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... मला काही सुचत नाही, काय कराव उमगत नाही. वर भोकाड पसरून, माझ्यावर इमोशनल अत्याचार करतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... काही केल्या बोलत नाहीस, विनवण्या करुनही हसत नाहीस स्वतः अबोल राहुन, भांडयांची मात्र आदळाआपट करतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... "चालता हो!!!,मला तुझं थोबाडही बघायचे नाही" अशी माजोरडी धमकी मला माझ्याच तोंडावर देतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... नाही लावली कधी चार बोटं त

सावधान! मगरमच्छी अश्रू

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 29/04/2015 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही. आयुष्यभर बगळ्याने मासे सारे फस्त केले . घेऊनी वेश मगराचा. ढाळतो अश्रू आता. एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला: भुलूनी मगर अश्रुना जीव गेला मत्स्याचा. अर्पिली गांधी "चित्रफुले" ढाळूनी अश्रू मगरीने. सावधान! मत्स्य पुत्रानों घेउनी वेश साधूचा रावण हरतो सीतेला. जाणीव ठेवा इतिहासाची भुलू नका मगर अश्रुना.
काव्यरस

हं ! ते तुला कधी जमणारच नाही

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/04/2015 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे मुळ कविता : तू ये... अरे द्यायचेच असेल तर दे आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधी जमणारच नाही तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती अरे गायचेच असेल तर गा ते स्वर बंदिशी मिलनाचे... हं ! ते तुला कधी जमणारच नाही हळव्या कोपर्‍याचे ..
काव्यरस

रात्रप्रवासी

लेखक Vimodak यांनी बुधवार, 29/04/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारे वेचू तूझियासाठी, म्हणून निघालो रात्रप्रवासि... सूर्याला माघारी ठेवून, मंद वाहत्या चंद्रपाशी... गळ टाकुनी, अगाध-आकाशी, याचक बनूनी, अनंत-अधाशि... तुटले तारे वेचत फिरलो, ध्रुव ताऱ्यासाठी मी झुरलो. 'ध्रुव' बांधण्या वेशी तुझिया, क्षण क्षण माझे, विकत राहिलो. माथी चढवून अखंड देणे, 'तारा' बनूनी देत राहिलो... तुटत राहिलो.. मिटत राहिलो...

अंथरुण (कामात बिझी असणाऱ्या मित्रांना)

लेखक Vimodak यांनी सोमवार, 27/04/2015 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलीस दूर कधी, मला कळले नाही, आणि, आज तुझे कान, माझ्या हाकेबाहेर. मी यायचो घरी, घामेज़ून दिवस भरून, कोमेजून... आणि, सगळा शिण टाकुन पदरात तुझ्या, शांतपणे झोपायचो. ऑफ़ीसमध्ये, तूझं नाव पुसल्या फळ्यावर, कोरडे ग्राफ चढत जात, आणि, ओले लागत उतरणीला. दिवस कमवायचो, गमवून दिवस. दोन दिवस तुझे माझे, हक्काचे, काढायचे होते... तारे-तारे निवडून सारे, ढग दूर सारायचे होते. पण त्याआधीच, स्पर्शाच्या परिघातच दूर झालो आपण, नजरेच्या टप्प्यातच, दृष्टीआड़ झालो आपण. तुझं पत्र मिळालं, 'काळजी घे' या दोन शब्दांत, दोन वर्षा

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

लेखक संजुदा यांनी रविवार, 26/04/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नेता व्हायचंय एका रात्रीत ? पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर नेते तयार होत असत. आता जमाना बदललाय. जीवन गतिमान झालंय. डिजिटल युग आलंय. आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत. तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे. नेता व्हायचंय एका रात्रीत ? दाखवून टाक झलक चौकाचौकात लाव पोरा शुभेच्छांचे फलक घरादारात गल्लीबोळात जरी नसेल तुला स्थान फलकावरती लिहून टाक युवकांचे आशास्थान वडील नेहमीच ओरडत असतात दाखव काही तरी कर्तृत्व हरकत काय रे लिहायला शहराचं खंबीर नेतृत्व ? वाढेल वलय नेतृत्वाचे मिळेल तिथे खाता खाता होऊन जाशील बेट्या एक दिवस
काव्यरस

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 26/04/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला