Skip to main content

कविता

असा मी तसा मी

लेखक Rajvardhan यांनी बुधवार, 15/04/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
असा मी तसा मी कधी असेन निर्मळ ब्रम्ह्कमळ तर कधी गलिच्छ बोतरा नदीकिनारी विसर्जित निर्माल्य मी वा गौरीपुजनासाठी वाहिलेला फ़ुलोरा मी नववधूने गृह्प्रवेश करताना ओलंडलेले माप मी वा शॄंगारच्या परमोच्च क्षणांचा सर्वेसर्वा मी असा मी तसा मी अळवावरुन घसरणारा दवबिंदू मी वा गवतातून हेलकावे घेणारे पर्णओहोळही मी काटेरी झूडपातील आंबट बोर मी वा काटेरी बाळसदार फ़ुलणारा एक सायाळ मी असा मी तसा मी तहानल्याची तृष्णा मी जीविताचा प्राणवायू मी देहाला शिरशीरी आणणारी एक मधाळ झूळूक मी वा वाऱ्याचे झंझावते नृत्य वादळ मी जिथे आभाळही ठेंगण होत ते क्षितीज मी असा मी तसा मी वर्षा ऋतुत न्हाऊन निघालेला पहाड मी पश्चिमेला

दूर

लेखक योगेश भालेकर यांनी मंगळवार, 14/04/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा तुझ्या आठवणीना मनामध्ये पूर येतो, न जाणे कसा मी माझ्यापासूनही खूप दूर होतो, फक्त वाहत वाहत जातो मी, स्वतःच्या असण्यापलीकडे, तुझ्या नसण्यापर्यत, वेचत राहतो क्षण तुझे, भिरभिरत राहतो इकडे तिकडे, आठवणीचा पाउस असेपर्यत, जेव्हा तुझ्या मिठीत असता जीव कासावीस भरपूर होतो, तुझ्या निसटत्या हाताला पाहताना भरून उर येतो, फक्त शोधत राहयचे तुला मी, कुठे अनोळ्खी चेहर्यामध्ये, स्वतःला तुझी ओळ्ख पटेपर्यत, बेचेन होणं कधी कधी, एकटं वाटून स्वतःला स्वतःमध्ये, तुझ्या असण्यापासून तुझ्या नसण्यापर्यत, मग पुन्हा, जेव्हा तुझ्या आठवणीना मनामध्ये पूर येतो, न जाणे कसा मी माझ्यापासूनही खूप दूर होतो,

सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व

लेखक अश्विनि कोल्हे यांनी मंगळवार, 14/04/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत बर्याच कविंनी, आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर अनन्य साधारण कविता रचल्या आहेत पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय? कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय? अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता आणि समजू द्या या जगाला सासुच्याही मनातल्या यातना. आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय पण कधी तिलाही सुनेने छळले असेल याची कल्पना तरी कोणी केलीय? प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते तिलादेखील भावना असतात,मन असते तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय. तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात. संसा

पुरुशाचे अस्तित्व...!

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 13/04/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या. कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला. या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो, तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते. कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.

स्मायली जीवन माझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली...

काळरात्र....!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 11/04/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून पहात होतो मी तिला लोक सांगायचे कि ती वेडी आहे खायला काळ आणि भुईला भार अशी एक बिन अकलेची घोडी आहे मेंदूने असहकार पुकारला असला तरी शरिराने आपल कर्तव्य बजावलं होतं तिच्या निरागस मनाला न जुमानता तिला ज्वानीच्या बाजारात आणलं होतं एका ओल्या काळरात्री गावाच्या वेशीवर ती भांबावलेली सैरभैर रडवेली दिसली मला पहाताच " आई गर्दीत हरवली" निरागसपणे सांगुन दात विचकून हसली अश्याच संधीच्या शोधात मी देखील होतो म्हटलं मनात की शिकार आयतीच गवसली क्षणातच तिच्या गोबर्‍या गालावर वळ उमटले मुस्काट दाबून तिला झुडूपांत फरफटवली पाऊस आता बेभान कोसळत होता मला अडवायला जिवाचे रान करत होता त्याच्या राज्यातले हे
काव्यरस

शिवराय बोलले आज

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 10/04/2015 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
काव्याचा ब्लॉग दुवा हा || शिवराय बोलले आज || वेळ आहे का थोडा चार शब्द सांगायचेत राहवत नाही म्हणून काही जबाब मागायचेत आधी आभार मानतो मोठं केलत मला पण खरंच सांगतो तुम्ही खोटं केलत मला अवघ्या तुमच्या जीवनात व्यापून टाकलत मला मनात सोडून सगळीकडे छापून टाकलत मला नाव माझं घेतलत सण माझे केलेत माझे छावे म्हणून राडे सुद्धा केलेत एवढ्यावर थांबला नाहीत मला देवासोबत बसवलत वाईट वाटतंय म्हणताना पण तुम्ही मला फसवलत माझे विचार घेतले नाहीत माझे आचार घेतले नाहीत चरित्र माझं ओरबाडलत पण त्याचे सार घेतले नाहीत नुसते प्रताप आठवू नका
काव्यरस

रस्ता...

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 08/04/2015 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना मी कधी फार अडखळलोच नाही, किंवा अडचणी काय असतात हे पाहायला, रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही… त्यांच जगणं तर मी रोजच पाहायचो, जगणे ही लढाई आहे हे रोजच अनुभवायचो, पण लढाईत त्यांची कुमक करायला मी कधी धजावलोच नाही, कदाचित हरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… चटणी बरोबर पण जेवता येत हे मला माहीतच नव्हतं, कधी कधी भुकेची आग शमवायला त्यांना पाणी देखील पुरेसं होत, पण जेवणात मीठ कमी म्हणून टाकून द्यायला मी कधी वरमलोच नाही, कदाचित उपासमारीच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… त्यांच्यासाठी डोक्याचा वापर फक्त ओझी वाहून न्यायलाच होता, त्यात

मराठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/04/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं.

नाटक वाटू नये

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 07/04/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये