Skip to main content

कविता

रसज्ञ नरभक्षक

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शुक्रवार, 20/03/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
कां उगीच घाबरतोय आम्ही? कां उगीच गळा काढून रडतोय? कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय? तो नरभक्षक चटावलाय आपला क्रुस आपल्याच खांद्यावरून वाहणार्‍या महात्म्यांच्या रक्ताला तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी खांदे मजबूत लागतात ख्रिस्तासारखे गांधीबाबासारखे दाभोलकरांसारखे पानसरेंसारखे आजन्म व्रतस्थ जनसेवेतून बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन अशा निर्धारी आचारातून ऋशींनाही लाजवेल अशा निर्मोही चारित्र्यातून मजबूत होतात असे खांदे आमची जनसेवा सोयीची आणि सवडीची थोडेसे दमल्यावर कुणी लालूच दाखवल्यावर कुणी धमकावल्यावर क्रुस टाकून पळून जाणारे भेकड आम्ही आमचे रक्त चालत नाही त्याला भुकेला तरी चवीचा रस

स्मशान शांततेची शिकवण

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शुक्रवार, 20/03/2015 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
अरे, वर्गात कितीरेही गडबड सगळे शांत बसा बघू प्रश्न विचारु नका उत्तरे शोधू नका चर्चा करु नका सगळे पास होणार आहात तुम्ही आपो‌आप परिक्षेशिवाय पुढच्या वर्गात जाणार आहात काय म्हणता?
काव्यरस

नक्षीची दुसरी बाजू..

लेखक सूड यांनी बुधवार, 18/03/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षीची दुसरी बाजू. महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात.

..नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 17/03/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
डेरेदार वृक्षांची ह्या पडे गर्द छाया.. नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया.. बुजगावणेही डोळे मिटुनि निवांत पाखरांच्या संगतीत उभारले शांत दूर पास नाही कोणी दोघांस पहाया.. रोमरोम मोहरते तनु माझी बाई.. मोहरली आहे जशी गर्द आमराई.. कोकिळही गातो आहे मन रिझवाया.. तुमच्या तनुला येता शेताचा सुवास.. मनातले पाखरु अन होते कासावीस.. मन उतावीळ झाले पिंजर्यात जाया... सावलीत सावली ही एकरुप झाली. दुपारीच चांदण्यांची बरसात झाली. शेतसुगंधाने झाली तृप्त माझी काया.. ----- योगेश

आज अवसेची रात आहे..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 16/03/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता...... ज्यांचे नवरे कुणालाही न कळवता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे....... आणि केवळ त्यांच्या मरणाची खबर नाही या एका आशेवर त्यांची वाट पहाणार्‍या त्यांच्या बायकांना समर्पित..... गेला दिस वेशीपार ना चांदण्याला जाग आहे सख्या ये बिगीने घरा आज अवसेची रात आहे.................. भोवतालच्या सावल्या गेल्या परतुनी घरा मागे उरली एकटी मीच माझ्या संगतीला भिवलेल्या माझ्या मना तुझ्या आठवांची साथ आहे सख्या ये बिगीने घरा आज अवसेची रात आहे.................. वारा सुटला मोकाट नावे साद मला घाली तुला पाहता ना घरे वैरी अंगचटीस लागी घडु नये काही भलते अघोरी त्याचा चाळा आहे सख्या ये बिगीने घ

कविता- मेसेज...

लेखक प्रितम तोरवने यांनी सोमवार, 16/03/2015 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
मेसेज किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही, मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा , तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा , जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone , तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone. काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझे सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना ……. -कवि -प्रितम दादाजी तोरवणे

भजन - भक्तीचा डिज्जे (विडंबन - फेविकॉल से)

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 16/03/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काव्याची मूळ प्रेरणा ही डीज्जे बिज्जे विषय चालू केले, तर त्यावर एक भजन कम गाणं सुचलंय. बघा कसं वाटतं. चाल तीच; चिपकाले फेविकॉलसे वाली. हसत घ्या. संदर्भ लागण्यासाठी मूळ ओळी कंसात दिल्या आहेत. रस्त्यावर ज्या त्या बघा मंडप उभारले (अंगडाईया...) रुपात देणगीच्या किती पैसे काढले (उह आह...) आता आला तो दिवस (मै तो चलू...) फेडू सारे हो नवस (की मच जाए...) भक्तांच्या भेटीला बाप्पा बघा आले (होश वाले भी...) आले आले रे.....
काव्यरस

भ्रष्ट झाला कोळसा

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 16/03/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सद्य परिस्थिती आणि अर्थातच श्रीगुरुजी यांचा लेख स्पर्श 'हाता'चा विखारी भ्रष्ट झाला कोळसा फ़ेकता तो कृष्ण पैसा शुभ्र झाला कोळसा भूक अन आक्रोश सारा मूक गर्भी दडपला वंचितांच्या वेदनेने अश्म झाला कोळसा संपली ती युगप्रतीक्षा खोदुनी वर काढला पाहुनी प्रेते सभोती भस्म झाला कोळसा क्रांतीच्या का वल्गना करिती फुकाचे धनिक हे पोचता त्यांच्या खिशातच थंड झाला कोळसा आजवरी मनमोहनाला आदराने वंदिले काजळी त्याच्याही हाता, खिन्न झाला कोळसा जाळण्या होळी खलांची फिरुनी जमवा लाकडे पेटण्याच्या सोहळ्याला सज्ज झाला को

गर्भपातल्या रानी .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 16/03/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया

लयास गेले कधीच ते -

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/03/2015 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
लयास गेले कधीच ते रामराज्य ह्या भूमीवरचे आता इथल्या रामातही काही उरला नाही राम .. रावण पैदा झाले इथे सीताही जिकडे तिकडे वानरसेना बहुत जाहली म्हणती न कुणि राम राम .. संकटात जरि असते सीता मदतीला कुणि धावत नाही आता इथल्या सीतेलाही शोधत नाही कुठला राम .. महिमा कलीयुगाचा ऐसा मिळून राहती रावण राम सीता रडते धाय मोकलुन झाले सगळे नमक हराम .. .