Skip to main content

कविता

प्रेमाचे हाय कू (?)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/03/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कळ्यांची कत्तल झाली प्रेमाच्या दिनी. कमलिनीच्या प्रेमात बंदिवान भृंग* नाहक प्राण गेला. (*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)

निष्पर्ण

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 28/02/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले, जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले… आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल, कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल, पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही, का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही, वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे, साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे, मी ज्यांची साथ केली ते मला सोडून

अवेळी असे मेघ दाटून येता.....

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 28/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळी असे मेघ दाटून येता जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे. जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे..... कितीदा पडावे, कितीदा वहावे धडे अनुभवांचे किती साठवावे. किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा किती चातकाने मना समजवावे .... पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... अवेळी असे मेघ दाटून येता मनाच्या नभाला जरा आवरावे....

नये

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 28/02/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
इतके गप्पिष्ट असू नये, माझ्यापाशी बसू नये हातामध्ये हात घेउनी , नशीब माझे पाहू नये इतके वेल्हाळ असू नये, माझ्यादारी येऊ नये नजरेमध्ये नजर मिसळून, ठाव माझा घेऊ नये इतके जिवलग असू नये, माझ्याठायी वसू नये श्वासामध्ये श्वास रोधून, अंत माझा पाहू नये इतके मैत्र असू नये, माझ्याइथे उरू नये आज आहे, उद्या नाही, नाते माझे जोखू नये !

वख्तने किया क्या हसीं सितम

लेखक शरद यांनी शनिवार, 28/02/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
वख्तने किया क्या हसीं सितम भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे.

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/02/2015 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला "चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला .. आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला .. एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला .. हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला लेउनीया साज आली कामिनी थाटात ती तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

हवं तरी काय!

लेखक राशी यांनी मंगळवार, 24/02/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
काय पाहिजे सुचत नाही.. सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही.. जिवनातले काही अटळ पैलु का टळत नाही? ईच्छा असते तसं घडत नाही स्वप्नात घड्ते पण... पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही? ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही? म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????

घराचे व्हर्चुअल व्हर्जन!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 24/02/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
घराला, आईची मुळाक्षरे बापाच्या शिरोरेखा आज्जीची जोडाक्षरे आजोबांचे अनुस्वार! घराला, बहिणींची चन्द्रबिंदी भावड्याचा काना चुलत्यांचे रफार सावत्रांचे विसर्ग ! घराला, मुलाबाळांचे स्वल्पविराम भाच्यांचे अर्धविराम नवर्यांचे प्रश्न, अन बायकांच्या मात्रा! घराच्या पुस्तकाला आता आठवणींचे कव्हर! हार्डबाउंड पुस्तकाचे मग व्हर्चुअल व्हर्जन!
काव्यरस

प्रेमाचिया वाटे

लेखक किरण कुमार यांनी मंगळवार, 24/02/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
काढूनिया वेळ, घालूनिया मेळ खावयाची भेळ, सारस बागेची !! घेवूनिया गाडी, करु मजा थोडी असेल जरी जाडी, मैत्रिण आपूली !! कोण असे शत्रू, कशासाठी भित्रू पाळलेले कुत्रू, मैत्रिणीचा भाऊ !! सौदा करु सस्ता, सिंहगड रस्ता खावूनिया खस्ता, झुडूपाआड !! किती प्रेम मोठे, खर्चालाच तोटे आपटूनी डोके, आवरते घ्यावे !! घेवूनिया कात्री, बदलावी मैत्री दोन पॅक रात्री, घेवूनिया !! प्रेमाचिया वाटे, टोचतात काटे तरी जोश दाटे, उठल्यावरी !!

रुसलेले शब्द

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द माझ्यावर रुसलेत... बहुतेक कोप-यात लपलेत. शोधून त्यांना दामले; मीच फ़ुरगटुन बसले! वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... वाट पाहून थकले; ते अजुनही लपले. लिहायची होती एक शायरी... निदान एक इटकुली नज्म तरी.. बहुतेक त्यांना वाटल... हिला जमणार कुठल? त्यांच ही बरोबरच आहे; नज्म-शायरी... अपना बस कुठे? नाद मी सोडून दिला... शब्दांनी परत हात दिला!