सोनुलं
कायं झालं कसं झालं
नाई काईचं कयलं,
उभ्या पिकाचं वावरं
यकायकी उलंगलं १
आता लोकं डोयापुळे
होतं चांदनं खेयतं,
यकायकी कुठूनं हा
आला अंधार पयतं २
रेती थापटूनं खोपे
किती पायावरं केले,
पायं काळतां भाईरं
सारे खचूनचं गेले ३
मनातले मांडे सारे
मनातचं रायले ,
पोटरकी धांडे नाई
ते नाईचं निसयले ४
झाळं पळलं वार्यातं
आता कुठची सावली,
गेला उळूनं सोनुला
रडं रडली माऊली ५
मिसळपाव