Skip to main content

कविता

एक कप चहा - भाग २ !!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 19/02/2013 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहा - भाग २ !! धरेला मोहरून टाकणारं पावसाचं पाणी , चिंब भिजलेल्या मातीचा तो गोड सुगंध , आकाशाला इंद्रधनूची माळ घालून डोकावणारा भास्कर , मग कापूस पिंजून ठेवल्यासारखे शुभ्र ढग ... असंच बनतं विश्व ..... बहरलेला ऋतू आणि आलं घातलेला ....एक कप चहा !! अनमोल रत्नांना सामावलेला अथांग समुद्र , फक्त मनात साठवता येतील अशी पक्षांची गोड गाणी , कृत्रिम जगालाही मागे टाकणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य , दिव्यांचा झगमगाट असून सुद्धा भुरळ घालणारा मंद चंद्र प्रकाश ..... असंच असतं सुख .... क्षण क्षण निसटलेला आणि तृप्त करणारा ...एक कप चहा !! सुख आणि दु:ख डोळ्यात पाणी आणतात खरे , राव असो

तरंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 18/02/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी .............................अज्ञात
काव्यरस

एक कप चहा ...!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 18/02/2013 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
निखळ आनंद देणारं स्वच्छ पाणी , गालांवर हसू आणणारा साखरेचा गोडवा , आल्हाददायक रंगांची उधळण करणारी गंधित चहा पूड , आणि या सगळ्यांना सामावणारे पांढरेशुभ्र दूध ...... ..........असंच बनतं सगळं .... ......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक कप चहा !! पावसात भिजताना झालेली नजरानजर . उसाचा ट्रक मधे आल्यावर झालेली हुरहूर , इंद्रधनुष्य सामावलेले तुझे डोळे , आणि पांढऱ्याशुभ्र ढगात हरवलेले आकाश ..... अशी झाली ती पहिली भेट ..... ...भिजलेली टपरी आणि तिथे ....

स्वतंत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 17/02/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी सजवित जावे वृत्तांचा ना हव्यास मज वाटे कविता झाली असतो रचनेचा भास मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
काव्यरस

दारवा....

लेखक पक पक पक यांनी शनिवार, 16/02/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय , तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही, तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो.
काव्यरस

माझी बायको..

लेखक स्मिता चौगुले यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक..

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/02/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालदिवा” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं

उत्सव

लेखक जयवी यांनी गुरुवार, 14/02/2013 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळता दिसते जेव्हा संसाराची चौकट हसरी नकळत होते कशी अचानक पापण्यांची या झालर भिजरी आठवणी नव नवलाईच्या लख्ख काही अन्‌ काही पुसटशा काही गाफिल, सावध काही चुकार अन्‌ लडीवाळ जराशा कधी उतावीळ, कधी अनावर शांत डोह कधी उगाच डचमळ आवरतांना सावरतांना सैरावैरा उठते मोहळ आठवात त्या भिजतांना मग काळ जरासा थांबून जातो तुझ्यासवे या जगण्याचा मग उत्सव होतो... उत्सव होतो. जयश्री अंबासकर
काव्यरस

शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 14/02/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता अगदी नेहमीसारखेच आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो अगदी नेहमीसारखेच कोणी किती गहरे असावे? किती अलंकार शोधावे उपमांसाठी किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे? दरवेळेस मी इरेला येतो तुला कागदावर उतरवायला सरसावतो लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो नेहमीसारखेच . . आता पुन्हा मी भांबावलेला पुन्हा नि:शब्द ना
काव्यरस

प्रेमात धड-पडायचंय

लेखक यसवायजी यांनी गुरुवार, 14/02/2013 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. love भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा.., 'ते' लै भारी असतय म्हणं..