Skip to main content

कविता

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/03/2013 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्म

कुठेतरी दुरवर

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 11/03/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुरवर जायचं आहे सावलीची सुद्धा आशा नाही पाय नेतील तिथवर चालायचं थांबतील तिथे थांबायचं......... वाटेत अनोळखी भेटतील जे जीवलग बनुन जातील पण जीवलग भेटून सुद्धा कधी अनोळखी बनुन राहतील......... रस्त्याच्या कडेला कधी विसावा म्हणून पडायचं पुन्हा ऊन वारा सोसत मात्र एकट्यान घडायचं.......... कुठेतरी दुरवर जाऊन एखाद्या वळणावर माग वळून पाहायचं कितीही दुरवर आलो तरीही तुझ्या मनात मात्र कायम राहायचं..... यशवंत

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

काव्यरस

अळी मिळी गुपचिळी

लेखक जयवी यांनी शनिवार, 09/03/2013 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
pain “सगळं होतंय ना मनासारखं मग झालंय काय चेहेरा पाडायला ?” प्रश्न तेच पुन्हा पुन्हा... “सुख बोचतंय..... दुसरं काय...” उत्तरंही तीच.... त्यांचीच पण बोलणार नाही मी...!! का सगळं बोलून दाखवायचं... का सगळं उघडून दाखवायचं... मीच माझं कुलूप उघडायचं, आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं. मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार मीच ती गोळा करायची माझ्यासाठी.......
काव्यरस

सुदीन

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 07/03/2013 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
वेध घेत कल्लोळांचे जाहलो मलीन नाथा होऊ दे माथा चरणी तव लीन पोत कोवळ्या शब्दांचे वाहुनी कुलीन तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन चैन सुखी घडलो पडलो चाल दिशाहीन चाललो अथक पण झालो ध्येयाविण दीन शिणले गजबजलेले मन देह आता क्षीण तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन माघारी फिरते पाउल म्हणे ओळखीन दिसते ना कोणी तेथे पात्र ना जमीन अंधार्‍या गर्तेतुन ह्या किरण जागवीन तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन निळ्या अंबरी तार्‍यांचे चांदणे विभोर विरघळले अवघे कातळ नाहि शेष घोर अनुभूती आहे-नाही मीच देहहीन हेच गीत आहे राया हाच तो सुदीन ......................अज्ञात

-पाऊस -

लेखक फिझा यांनी गुरुवार, 07/03/2013 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
-पाऊस - हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत आता फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! गावात खांब आलाय विजेचा अजून काम राहिलंय थोडं , लावेन मग दिवा शंभर चा लकाकेल मस्त माझं झोपडं , देव आहे माझ्या पाठीशी कसं होईल काही वेडंवाकडं, ....तोरण म्हणून बांधीन ऊस .....उद्या पडेलच की पाऊस !!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून
काव्यरस

...बेभान...

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 06/03/2013 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मिठीत विरघळू दे, कोमल तुझी ही शुभ्र काया रात्रही मग होऊ दे स्तब्ध, चंद्रही नको अन् पुढे सराया चढती लय श्वासांची, सांगते सर्व बिनदिक्कत ओठ थरारती अलवार तुझे, तुझ्याशीच बंड करत रातराणी आज फुलुन, आली तिच्या ऐन भरात की तुझाच हा मत्त गंध, जीवघेणा उतरे ऊरात हा हवेत कुंदपणा, कुठुनसा आज आला त्यात कहर ही बट, चुकार खुणावते मला आज नको मला, भान कुठल्याच जगाचे तु ही नको सांगूस अन्, आज कुठे थांबायचे पापण्यांची चलबिचल, का होतसे सये तुझ्या मी न परका तुला, स्पर्श जरी हा पहिला चल...चल सखे, या सर्वांच्या पलिकडे काय कोठे नको पुसूस, शब्द पडतील तोकडे मी तुझा अन् तु माझी, ईतकेच काय जाण तू हलकेच ये कवेत
काव्यरस