Skip to main content

कविता

पाळ्णा

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 11/04/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा सण पहिला । गुढी उभारुन साजरा केला । नविन वार्षास प्रारंभ झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ दुसरा सण व्यासपौर्णिमा । सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा । त्रीजगती नाही उपमा । ये श्री दत्ता ये ये ॥ तिसरा सण पंचमी आली । नागराजाची पुजा ही केली । झोका खेळाया जमल्या मुली । ये श्री दत्ता ये ये ॥ चौथा सण रक्षाबंधन । भाऊरायाला राखी बांधीन । आई बाबांना प्रथम वंदन । ये श्री दत्ता ये ये ॥ पाचवा सण गोपाळ काला गोप्गोपींचा मेळा जमला हांडी फोडण्या त्वरे निघाला ये श्री दत्ता ये ये ॥ सहावा सण श्रावण पोळा । बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा । शेतकरीदादाला आनंद झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ सातवा सण गणे

बाजारभाव (४-११-२००९)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 10/04/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा महगाईचा विषय होता साधा आणि सोपा काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले बारा रु.पाव किलो वांगी व कारले फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ भडकलेले होते हरभरे आणि वाल साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला तेलाचा डबा पण किती महाग झाला दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर विचारायलाच नको चीज आणि बटर सगळीकडेच भडकली अशी ही महागाई

एकटा

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 08/04/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा , नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा, पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट , पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ, कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.
काव्यरस

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2013 19:29 या दिवशी प्रकाशित केले.

मगर

प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी 'मगर' हा अश्रु ही ढाळीत होता.

मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

संमोहरमल

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 07/04/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी .....................अज्ञात
काव्यरस

॥ पगाराचा दिवस॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/04/2013 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल अगदी बर होत हातात पगार मिळत होता किती मिळाला पगार तिथल्या तिथ कळत होता पगाराचा दिवस तो सर्वांनाच प्यारा होता हातात पगार घेण्याचा आनंदच न्यारा होता पगाराच्या दिवशी दांडीबहाद्दर पण यायचे पगाराच्या रांगेमध्ये पुढे ऊभे रहायचे बायको पण विचारायची झाला का हो पगार? आणला आहे घरी की खेळलात सर्व जुगार मुलांना खाऊ आणायची हौस तुमची फिटली स्वतःसाठी मात्र आणली असेल बाटली आता मात्र तसे नाही ईसीएसने पगार जातो आपापल्या बँकेत खात्यावरती जमा होतो कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही

नवा जिल्बिवाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 07/04/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या?
काव्यरस

दोन माता

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 06/04/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
माती आणि माता दोघिहि समान, माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या, माती देई दऱ्या ,डोंगरा आकार, माता देई पुत्र,कन्या संस्कार , माती आणि माता यास समान द्या मान , दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
काव्यरस

तू, मी अन…..!!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 05/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू, मी अन…..!!! तप्त निखारे आणि वाऱ्याची झुळूक , रेतीमध्ये लिहिलेली धूळ त्यावर समुद्राची लाट .... …… तू, मी अन वारा .......सगळेच दिशाहीन ...!! पेटलेली शेकोटी फुललेली आग , उजेड देणारा दिवा जाळणारी मात्र वात…. ….. तू, मी आणि धरणी .....उरात फक्त धगधगणारा ओलावा… !! समुद्राला साथ ओळखीच्या किनाऱ्याची , चंद्राला त्याच्या टिपूर चांदण्यांची …. …… तू, मी आणि वाळ्वंट .....साथीला फक्त मृगजळ ....!! सुर्य फक्त प्रकाशात दिसणारा , चंद्र अंधारातही लोभसवाणा ….. ….. तू, मी आणि स्वप्न .......

शेतकर्‍याची आत्मह्त्या (फाशी)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 03/04/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
आला सोसाट्याचा वारा गेले छ्प्पर ऊडुन। मातीच्या चार भिंती गेल्या पाण्यात बुडून॥ गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥ आली सरकारी फौज गेली पहाणी करुन। झालेले नुकसान म्हणे देऊया भरुन॥ पूर्ण झाले वर्ष एक नाही मदत पोह्चली। सावकाराच्या कर्जापाई त्याची कंबर खचली॥ झाला कर्जाचा डोंगर चिंता मनाला वाटली। खचले आत्मबळ त्याचे "फाशी" झाडाला घेतली॥