Skip to main content

कविता

आस

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 02/05/2013 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मन नाही नाही म्हणते पण हृदयात आस घन कळवळते दरवळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते गोकुळ स्वप्नांची सलगी जिरवून कथानक वावरते तापल्या काहिली तृप्त माळभर धुंधुर माया हिरवळते ओठात शब्द स्वर कंठातिल भावना लास्यमय ओघवते आशेस किनारा वाळूचा दर्पणी कामना विरघळते ....................अज्ञात
काव्यरस

प्रवास वेगळाच घडला…

लेखक मनिष यांनी बुधवार, 01/05/2013 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा हात सोडला अन् प्रवास वेगळाच घडला मी मृगजळाचा नाद सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. तुझीच शक्ती, तुझीच भक्ती; हिच इथली वहिवाट मी हा शिरस्ता मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट, मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. माझे प्राक्तन, माझीच दृष्टी अन् माझेच हे दोन हात मी अट्टहास फळाचा सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. फाटलेले शीड, वादळाची साथ अन् संकटांची लाट पण हा कणा नाही मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. मुक्कामही विसरलो, अशी सापडली

समृद्ध भारत

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते
काव्यरस

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

दृष्टी दोष

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
काव्यरस

ट्रेफिक सेन्स

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 29/04/2013 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
सखे पाहून तुज साडीत लाल, थांबलो,जाहलो मी बेहाल, पाहून तनास हळद पिवळी, सावरलो नजर झाली बावळी , पाहून हातात चुडा हिरवा, भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा, चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

तू

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 29/04/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या थेंबासारखी तू . पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या पाण्यासारखी तू . पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या प्राजक्तासारखी तू . कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या दवथेंबासारखी तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू . सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू . मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या सोनगुपितासारखी तू .... तू, तू आणि तू ... सांग गं सखे, हो तूच तू कुठे नाहीस? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०४/२०१३)

जीवनाचे कोडे

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 28/04/2013 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे
काव्यरस

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 27/04/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे ये
काव्यरस

राशी चक्रम

लेखक राजा सोव्नी यांनी शुक्रवार, 26/04/2013 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला , वृश्चिक पाहुनी कन्या पळती , कर्क,मीन,कुंभात दडती , धनु पाहुनी मकर विचलित होतो, मिथुन जना आनंद
काव्यरस