Skip to main content

कविता

नशिब!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 13/06/2013 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला? खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला... आळसाची मीच माझ्या, ढाल अन केली जरी प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले... नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'... उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे कळले,नाही ढाल ती,'मुखवटा' आहे तिथे! रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती? आज मजला वाट
काव्यरस

नभईर्षा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 12/06/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. .......... कोण चाहुली उलगडले गड अंधारातिल वेणा अवघड वारुळातले फुटले घट अन प्रकाशात पडझडली झुंबड क्षणभंगुर भिरभिर भर अंगण उडे पाकळी पर तिज आंदण नभईर्षेचे सोस सकस पण जड झाले पंखांचे जोखड बळ खळले गळले विरघळले स्वप्नखळे वाटेतच विरले सुटली जागा जाग जागली विद्ध कलेवर पाठी उरले ........................अज्ञात
काव्यरस

हुलकडूबी नाव

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 02/06/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!

मेघावळ....

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 01/06/2013 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
मेघावळ.... मेघांची प्रभावळ....... मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा. मेघ अभिलाषा. मेघ निराशाही. मेघ एक दाटलेलं सूक्त. कधि करुणायुक्त कधि दुष्काळभुक्त. ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर. वारा मेघांना फितूर. आला तर धुवाधार नाही तर पिरपिर रटाळ. मेघ जीवनाचा आधार. मेघ इंद्राचा अवतार. सृजनाचा दातार. सृष्टीचा भ्रातार. पाऊस बेभान. पाऊस निष्काम. पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम. पावसात चिखल.चिखलात कमळ. शेतात भीज. बीजांकुरांची हिरवळ. बीजात सत्व. जगण्या जगविण्याचे तत्व. समृद्ध चाहूल. तरीही छुप्या दुष्काळाची हूल. अतृप्त हा प्रवास सदाही. मनांत खोलवर साचलेलं अचानक प्रवाही. निमित्ताने;.......
काव्यरस

समाधी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 29/05/2013 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळी धुंदी इथे अन् वेगळा हा बाज आहे. वेगळे हे विश्व आणी वेगळा हा साज आहे. शांत सारे हे स्वयंभू शांत इथला नाद आहे. शांतिचे संगीत म्हणूनी कोकिळाही शांत आहे. बंद होती येथ वाटा बंदिचे संगीत आहे. आज बंदी पाहिली मी मुक्त येथे गात आहे. बंदिचेही शब्द ऐसे मानसीचा साज आहे. सुप्तता अन् शांततेचा मूळचा आवाज आहे. बोलण्यासी आतुरे तो खोल आतलाच आहे. आज या ही..कारणाने मुक्त तो ही होत आहे. शांती आणी मोक्ष सारा येथ तो मिळणार आहे. सत्य शामल नम्रतेने मी इथे झुकणार आहे. आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे...
काव्यरस

अन्नधान्य स्वस्त आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/05/2013 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

सत्तेसाठी कायपण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 26/05/2013 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन... १७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र ) शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर शपथ घेऊ द्या की र...। मला बी मंत्र

कार्या लयात असताना.... ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/05/2013 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात.
काव्यरस

जय परशुराम...जय वामन!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/05/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
काव्यरस

सासर्‍या व्यथा

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 19/05/2013 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
ते आले होते मझाकडे आज एकदम खुशित, मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले. मि त्यांला म्हनालो सासरेबुआ मि काहिहि करेन तुम्हाला हसत पाहन्यासाटि, तुम्ही फक्त एकदा हो म्हना हो" त्यांने हि हसत उत्तर दिले" हो हो जवईबापु आत मि माझ्या मुलीचा हात तुमच्याच हातात देईल तिला गरज तुमचीच आहे हो .." आनि ते माझा मिटित विरुन गेले , आता मि मि राहिलो नवतो, ते ते रहिले नवते , दोघाना हि ओड पिण्याची लगलि होति , मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, एक पेग मरल्यावर मि त्यांला मझ्या दुसर्‍या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम त्यांचि गाटलि. त्या बिचैर्‍याने दोन चार पैग मरले होते, मि पोह्च न्यापुर्विच सोफ्याव