Skip to main content

कविता

पर्णोपर्णी

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 23/07/2013 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
घुमता वात वनावनातून कुजबूज ये पानसळीतून जाता वारा जरा विरून स्तब्ध शांतता वृक्षलतातून ll १ ll धूळ उडे स्थलांतरातून हर पर्ण ये मातीत लिंपून येई जे नभ जलभारून नवसंजीवन कणाकणातून ll २ ll पर्णे गुंतती कळ्याफुलातून काही झुलती फांदी-फांदीतून कोणी सांडती गळती वाळून जीर्ण अमोलिक पुस्तकातून ll ३ ll नव्या कुणास दव गोंजारून ये नवजीवन अंकुरातून कोणी पडला देठ मोडून हेळसांड तयाची पाचोळ्यातून ll ४ ll - सार्थबोध

नार्सिससचा स्वप्नदोष

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 20/07/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन् आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या श
काव्यरस

हायकू -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/07/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
१) लहरी वारा पानांची सळसळ सशाचा छळ २) ढगांची हूल पावसाची चाहूल भुई निष्प्राण ३) वाऱ्याची गती निसर्गाची संगती मन बेभान ४ ) पाऊस गाणी धरतीची कहाणी ऐकते बीज ५) कावळा पाही चिमणीचं सदन खुनशी मन .
काव्यरस

अवनी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 19/07/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे पवनासवे वराती मेघात सकल पाणी सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी ........................अज्ञात
काव्यरस

पंढरीचा राया : अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 19/07/2013 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीचा राया : अभंग-१ पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले?

" धन्य आज दर्शनाने तुझ्या -"

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 19/07/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या || आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया || चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या || तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया शेवटी मला पावला देवा तूच विठू राया || व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया || धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया || .
काव्यरस

१ प्रश्न

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 19/07/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?. उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास . मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे? पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे. १ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत? वेड्या....

~देवा आता हार मान तू~

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 18/07/2013 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे

झालंया सगळ येगळ आता ..

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 18/07/2013 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया ..

" हे असे चालायचेच!! "

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/07/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे! गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे ! काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे ! तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते मग तोच म्हणाला , जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !! बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
काव्यरस