Skip to main content

कविता

एक प्रेमपत्र लिहले होते

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेमपत्र लिहले होते,शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. संदभ्र होते तिचे नि माझे आणि ईंद्रधनुचे सप्तरंग होते त्यात सात लिहताना काने-मात्रे एकसलग येत नव्हते, हाथ थोडा थरथरत होता नि तुझे नाव कोरले कि डावा डोळा नुसता फरफरत होता..... मध्येच एखादा अश्रू ठीबकात , माझ्या नावाला पुसायचा प्रयत्न करत होता तर कोरलेला तो बाण ह्रधयाभोवती कसला तरी यज्ञ करत होता.

बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर का साचंलया आज मनी पाखरासंग फिरतया रानभरी पापनीभी फरफरतीया परापरी १ घास अडकतुया गळ्यापरी कुरणं भी खुलल्याती मळ्यापरी ठसका भी लागतुया कधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी डावी कुशी बदलतुया कधीतरी झोप उसनी द्याहो कुणीतरी जागा राहतुया एका निश्याच्यापरी भास होतुया एका पिश्याच्यापरी सरळ रस्त्यावरून जाता कधीतरी बीना दगडाची ठेच लागतीया मधीतरी बाकी काही नाही..............

रात्रीस उखाणा सुचला

लेखक प्रसाद साळवी यांनी गुरुवार, 25/07/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून
काव्यरस

तान्हुला

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 25/07/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस

स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो

लेखक वैभव कुलकर्नि यांनी बुधवार, 24/07/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागे कस जीवनाला,तेव्हा कात टाकतो आधाराची काठी म्हणून,हाती रेषा बघतो देवाला ती लाच थोडी,मोठी भीक मागतो दुसऱ्याच्या दुखावर थायथया नाचतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………१ ……… कधीतरी स्वतःशीच स्वतःवर त्रागतो देवळात उभा मी प्रसादाला सोकतो नको तिथे उगी उगी शब्द मी ओकतो ओकण्याचे फळ म्हणून प्रसंगही भोगतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ……… खोटी स्वप्ने बाळगुनी , बळे शड्डू ठोकतो गळे स्वप्न कधी जर नशिबाला टोकतो पुण्यायीच्या तराजूत पापाला मी जोकतो आयुष्य न कळे मला , जगणेच मुकतो तरी स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ………

ऐक स्त्री जन्मा तुझी कहाणी..

लेखक टक्कू यांनी बुधवार, 24/07/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
कसं असतं नाही आमचं असं जगणं, मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं. कोंदणात बसतो एकच हिरा, मात्र सांभाळाव्या लागतात नाना त-हा. मिळतात नवी नाती वयाच्या पंचविशी नंतर, जुळवून घ्यायला शिकावं हेच बेहत्तर. दोन घरांचं जरी भाग्य तिला लाभतं, मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं. तिचं मन म्हणजे जणू द्विदली वाल, आत दले दोन पण वरून एकच साल. पाहाणा-याला वाटावे वा काय झालयं एकरुप, डोकावलं कि कळतं आतलं खर बहुरुप. लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा, बदलत राहते ती स्वत:ला न करता गाजावाजा. कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय, लक्षात ठेउन सारं अंथरुण पाहून पसरते पाय. अपेक्षा असतात तिच्या ब-याच पण खास अशी एकाचकडून, त्याच्याशिव

अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत, काही कुरबुर चालू होती काळ्या अंधारात दुर्बुद्धीने, विवेकावर मात केली होती ll १ ll कापसावाणी मऊ पाऊले, तिथेच बांधून घातली होती हातांची ती कोमल पर्णे, बेडीमध्ये अडकवली होती ll २ ll चंद्रावाणी नितळ चेहरा, सशावाणी पिटुकले डोळे अंधश्रधेच्या विखारी बुरख्याने, मिटून झाले भळभळलेले ll ३ ll काहीच घडले नव्हते, काही अस्तित्वातच आले नव्हते एका गोजिऱ्या निष्पाप जीवावर,काळे सावट घेरले होते ll ४ ll कुणाची तरी गाढवी बुद्धी,गैरसमजाचे ओझे वाहत होती मायेची भक्कम गोधडीच, उबेऐवज

विरंगुळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 24/07/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात
काव्यरस

बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!

लेखक DTPS यांनी मंगळवार, 23/07/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण, चूक भूल माफ असवि. च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात, पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …। आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो, पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….