Skip to main content

कविता

एक आगळी वेगळी पाऊस कविता

लेखक जुईचे फूल यांनी सोमवार, 26/08/2013 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही लिहावंसं वाटलं. बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही करावंसं वाटलं. तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत उघडावीशी वाटली. बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही भेटावसं वाटलं. मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही जगावसं वाटलं आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

मनकवडी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 25/08/2013 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आहेस ?…… प्रश्न एसेमेस मसस्स्स….स्त !!………. उत्तर एसेमेस … लिहिलेला "मस्त" हा मुका शब्द गाभ्यातला कातर स्वर लपवू शकला नाही उत्तरकर्त्याचं आत्मभान, स्वाभिमान, उसनं अवसान ओसांडून वहात होतं त्याच्या अंतर्मनाच्या सांत्वनासाठी… मन, स्वत:शी आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या द्वैताशी प्रतारणा करू शकत नाही व्यक्त अणि अव्यक्त यांतून परिस्थितीनुरूप एकाच भावनेचे भ्रामक अथवा अर्धसत्य अविष्कार घडत असतात त्यातल्या सत्य वाहनाला "टेलीपथी" म्हणतात असे सूक्ष्म संदेश नेमके वाचू शकणारी माणसं "मनकवडी" असतात ……………………. अज्ञात
काव्यरस

तु फक्त एकदा हो म्हण...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 25/08/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
तु फक्त एकदा हो म्हण... तु फक्त एकदा हो म्हण तुझी व्हायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण सगळं जग विसरायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण, सगळं समर्पित करायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.. आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....

असणे नसणे

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 22/08/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यात उगिच सजते असणे अक्षरांत झिंगवते नसणे असणे नसणे ओसांडे मन हसण्यात सदा किण किण श्रावण आभास सदा पथदूर कुठे शोधासा कठिण पडते कोडे मेघावळ पिंजुन एकांती धड धड करते काळिज वेडे आकाश; खोल पोकळ वासा आवेग; न ठावे थांग जसा पवनासाहि ना कळलेले हे वाहतो सवे निशिगंध कसा ………………… अज्ञात
काव्यरस

शोध माझ्यातला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/08/2013 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
शोध माझ्यातला मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले समजण्या मला काय गवसले अन काय हरवले माझ्यातले मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले शुद्ध हवा घेतली का कधी? निर्मळ पाणी चाखले का कधी? खळाळता निर्झर कधी का पाहीला? घाम त्वचेतून कधी का वाहीला? लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर? निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर? मदत का कधी कुठे केली? न ठेवता आशा परतीची? घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी? धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी? पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
काव्यरस

मला झोप हवी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी सोमवार, 19/08/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणल आज जरा शांत झोपावे पण छे झोपेण नाकच मुरडले आहे आताशा. बहुतेक डोळ्यावरची बुबुळ रुसलीत माझ्यावरती ...... आतल्या बाहुल्या नुसत्याच फिरत आहेत इकडून तिकडे एखाद्या निशाचरासारख्या आणि हि रात्रही काही थांगपत्ता लागून देत नाही.. मी रात्रीला विचारल , काही चुकलं काय माझे असा हा का आसूड या डोळ्यावरती नेहमीप्रमाणे उत्तर काही मिळाले नाही ...फक्त एक करडा कटाक्ष्य आणि उजव्या काखेत माझ्या झोपेला घेऊन ती देसिनाशी झाली... मग परत मी परत काहीतरी शोधत शून्य नजरेने त्या भिंतीकडे बघत गरगरणा-या पंख्याला सोबत घेऊन ...... मग मी पापणीच्या टोकाला थोडे बाहेर ओढत डोळ्यावरती झापड टाकायचा प्रयत्न केला , पण त्या पाप

रानपाखरं...

लेखक psajid यांनी सोमवार, 19/08/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्याव, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! मला पीठ भाकरीला !! श्री. साजीद यासीन पठाण

ती...

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 19/08/2013 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll नका टाकू स्त्री उद्याची, घसे कोरडे बोलणारे हात कानावरी त्यांचे, ठार बहिरे ऐक

अबोल प्रीत बोलली...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 18/08/2013 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... नवे रंग उमटले अश्रु पुसून गेले... उगवली पहाट थांबली चंद्रकोर... विसावली सागरी झोपली गाढ कुशीत... विसरली निळ्या आभाळास अबोल प्रीत बोलली... अबोल प्रीत बोलली...