Skip to main content

कविता

'दु:स्वास'

लेखक psajid यांनी बुधवार, 14/08/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
रंग उमलत्या मनकळीवर दारिद्र्याचा ठसा उमटतो, अळणी जीवन काय कामाचे सावलीकडूनही 'दु:स्वास' होतो !! मोहोरभरल्या अम्राला वाटसरुही पाईक होतो, भार ओसरता मग भूमीला पोटातील मुळ्यांचा 'त्रास' होतो !! उमंग , इर्षा , धडपड पाहता त्याचा सन्मान 'खास' होतो, थकून डोळ्यावर हात घेता आंबल्या स्वप्नांचा 'वास' येतो !! कूजट कुबट दारिद्र पाहून तापला जीव कासावीस होतो, मूडदुसलेली मान्स बघून हाती घेतला 'घास' राहतो !! कसं जागीवल आजपातुर बाप संघर्षाचा पुतळा वाटतो, वजनाच्या या दुनियेत मातुर शिकून आयुष्याचा 'नास' होतो !! काळोखात किरण दृष्टी पडता कुठेतरी अस्तित्वाचा भास होतो, झेप घेता अनंतामध्ये गुदमरतो, बंद 'श्वास' हो
काव्यरस

स्वातंत्र्य

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 14/08/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
होत वसुमती अधीन परीहारील कोण विघ्न ज्ञेयज्ञे सारी निम्न आंग्लापुढती नम्न ll १ ll जातीस्मरे काय प्रयोजन संसृती होय प्रहीण हाची मुहूर्त प्राक्चिरम् पुनरपि प्रयत्न प्रसभम् ll २ ll संभूता अन्ये प्रबोधक सङ्कीर्ण करोनि पुष्कल ताडूनि तो स्पुत्कार उदग्र हो जयकार ll ३ ll करोनि युक्ति निश्चय साधोनि कृत्य सम्भूय न होय कर्म उपक्षय दृढ होणे विनिर्जय ll ४ ll - सार्थबोध विनंती: - संस्कृत आणि रचनेबद्दल सूचना आल्यास स्वागत आहे …

वेदना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 13/08/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्त सूर्याचा पाहुनी मी किरणांसाठी झुरतो ll १ ll ती वेळ सुरु परतीची थवा घरट्यास उडतो ll २ ll सांजेचा दीप तोही एकलाच गाभारी जळतो ll ३ ll दिव्यास सोबत माझी तो वातीत काजळतो ll ४ ll भाव दाटला नयनी अलगद गाली ओघळतो ll ५ ll जणू सन्यस्त होऊनी मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll गोठली वेदना एकांती मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll झाकून दर्दभावना सारी मी मलाच रे सावरतो ll ८ ll आरशास पाहता फिरुनी तो नकळत काही सुचवतो ll ९ ll वाटे चेहराच मला माझा काय असा फसवतो ll १० ll - सार्थबोध

आव्हान

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 13/08/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मांडलेला तेव्हा त्याचे खुळखुळे झाले, ललाटीच्या भग्न रेषा पायतळी ठसे ओले, इथे तिथे व्यर्थ व्यर्थ सारे सारे क्षुद्र झाले, नाही सुटले काहीही त्याने भलतेच केले, खोळ काही काळ पुन्हा मी टाकते गहाण, आता त्याच्या पुण्याईला उरे त्याचेच आव्हान!

(गड गड गड)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 12/08/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...
काव्यरस

एक चिऊ, गोजिरवाणी..

लेखक वेणू यांनी शनिवार, 10/08/2013 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुळशीपाशी, लावता पणती एक, अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल हातात बाहुली आणि जाईचे फूल... अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला, "पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?" तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी, "अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी, अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं, तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं" ना कळते तिजला, परि हलविते मान, बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण, ही तिला भरविते काय पहा हे ध्यान, म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!" बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी, तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी.. मग पावडर खोटे, तिट टिळाही देते ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते म्ह

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती,नजरेत कुणा विरक्ती, नजरेत कुणा मोका,नजरेत कुणा धोका , नजरेत कुणा वासना ,नजरेत कुणा कामना , नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती, नजरेत कुणा संस्कार ,नजरेत कुणा दुत्कार , नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत दिसे व्यथा ,नजरेत दिसे कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान
काव्यरस

शिमगा

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 10/08/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे आवेग भावनांचा माया उतून वाहे अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा वारा थके जरासा अंगी उलाल लाही श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला आतंक सोसलेला शिमगा सुभान देही ………………अज्ञात
काव्यरस

घाबरगुंडी

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 08/08/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला?
काव्यरस

शत'शब्द शोधिताना...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 07/08/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्द कथा हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे?