Skip to main content

कविता

न्याय

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
काहिंच्या अस्तीत्वाच्या विळख्यात गुदमरायला होते सहवासाच्या वणव्यात होरपळायला होते काही जणांना पेटत्या आगपेट्या बनायला आवडत भाजलेल्या व्रणावर खोटे मलम ही बनायला आवडत उपदेशाचे कोरडे पाऊस ही बरसतात पावसात कोरडे रहायचे की ओले हे ही तेच ठरवतात. न्याय अन्यायाच्या परिभाषा बदलल्या आहेत अन्याय करणार्‍यांची लोकप्रियता वाढतच आहे आरोपीच्या पिंजर्‍यात न्याय उभा आहे अन्यायाच्या काळ्या कोटासमोर उलट तपासणी होत आहे. टाहो फोडुन सांगत आहे मी आहे हो खरा पण कोणास ठाऊक देवतरी देईल का त्याला थारा?

क्षण

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण क्षण हातातुन निसटुन जातात काही क्षण क्षणिक तर काही रुतून बसतात. सुखाची झुळुक तर दुखाची वादळ झुळुक क्षणिक तर वादळ रेंगाळतात. क्षण हातातून निसटुन जातात मागे पाहताच क्षण ओळख विसरतात काही मात्र मानगुटीवरची भूत बनतात. क्षण हातातून निसटुन जातात काही दिवाळी असतात काही होळी असतात काही सुखाची मोळी बांधतात. क्षण हातातून निसटुन जातात....

अथांग

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 18/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऋणात आहे; …. ऋण काटेरी तरी वाट ती माहेरी लाघव ओळी हळव्या लहरी अभंग संचित गाभारी ठाव न लागे अथांग सारे उचंबळे कधी मौन उरी प्रजक्तासम सण एकेरी एकांताची कास धरी स्पर्श दंवाचा चित्त थरारे ओघळ किंचित; बंड करी म्हणे सवे ये श्रावणात अन फिरव मला गत माघारी …………… अज्ञात
काव्यरस

आहे!?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/08/2013 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
आहे!? आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे? आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे! आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे? आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे! आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे? आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे! आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे? आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे! (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?) (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!) किती मोजू सांगा?

आजहि

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/08/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजहि बुलबुल तेच बोलते दुष्कर भाषा परी ही ती दूर क्षितीजावरती दिसते क्षीण तेवणारी पणती आशा नाजुक हिरवळते दरवळते प्रतिमा ओझरती अमिट स्वरांचे हे नाते गुंजारवते अवती भवती श्रावण धारा लोभस वारा भाव भावना ओघवती पागोळी हळुवार उतरते आतुरल्या काठावरती वलये वलये उठती विरती हुर हुर मनभर कातरती सांज सकाळी आठवती नयनांत रेखलेल्या भेटी …………… अज्ञात
काव्यरस

स्वकीय ?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 16/08/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली
काव्यरस

किमया

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 14/08/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा,… शब्दांची किमया अर्थबोध मानभावी माया जाण काय समजे ना कांही वय तितुके बघ गेले वाया हसणे रडणे भाव भावना अंत:कळा हृदयास कळाया कोश कठीण भिजण्यास हवे स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया ……………………अज्ञात
काव्यरस

विषय

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 14/08/2013 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांनी बघीतले दृष्यातले सुख। अंतरी वाढली कामाची भुख। डोळ्यांनी देवाचे रुप बघायचे असते हे मात्र कधी कळ्लेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥१॥ हातांनी दिला लोकांना मार। अंतरी वाढली क्रोधाची धार। हातांनी देवाला नमस्कार करायचा असतो हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥२॥ मनाचा नाही कळला हा डाव। अंतरी वाढला लोभाचा भाव। मनानेच देवाचे नामस्मरण करायचे असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥३॥ नाकाने घेतला भलताच वास। अंतरी वाढली लोभाची रास। नाकातुनच जपाअजपा चालू असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्

येथे तिरंगा विकला जातो'..........

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी बुधवार, 14/08/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो... प्रजाकसत्ताक दिनावरील एक कविता प्रस्तुत करतो..!.. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन जसा जवळ आला, डोक्यात आमच्या एक जबरदस्त प्लान चमकला ! चला, या वर्षी सगळा आळस झटकुन टाकुयात, आपल्याच अंगणात डौलाने मस्त तिरंगा फडकावुयात ! भरपूर उत्साहात २ तास सगळे मॉल पालथे घातले, शेवटी कोप-यावर छोटेसे १ दुकान नजरेस पडले, 'येथे तिरंगा विकला जातो' पाटीवर लिहिले होते ! दिसते तसे नसते हे आम्हाला नंतर उमगले होते !! दुकानदाराला म्हटले आम्ही अभिमानाने 'तिरंगा पाहिजे एक' त्याने न्याहाळुन विचारले 'ओरिजिनल की डुप्लीकेट' चवताळुन ओरडलो, 'आजादी' नंतर डुप्लीकेट कशाला फडकावणार? बसा, बसा, त्याने म्हटले, तुमच्या सारखे

लोकशाहीचा अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/08/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
काव्यरस