Skip to main content

कविता

मूक आक्रोश

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 07/09/2013 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे.
काव्यरस

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या.

पुन्हा अनोळखी होऊ .....!!

लेखक psajid यांनी गुरुवार, 05/09/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….

ध्यासबावळी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 04/09/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती …………………. अज्ञात
काव्यरस

" दु:खा "

लेखक कैलास गायकवाड यांनी रविवार, 01/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा ---डॉ.कैलास गायकवाड

प्रेम म्हणजे...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 01/09/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गजल नेहमी गुणगुणत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गिटार आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे... प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा तुझ्या आसपास दरवळतच रहावे... प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती आपल्या जवळच असल्यासारखे वाटत रहावे... प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे..

उरेल काही उणे उणे

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, भोगाच्याही पदरी उरते, वेदनेचे गाणे मखमलीच्या दाव्याला, जीवा बांधणे. उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, कुणी गावे उद्याच्या, आशेचे गाणे उगवतीच्या पोटी लपले, अंधाराचे लेणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, बेधुंद होऊन छेडावे, उगीच का तराणे भैरवीचे सूर घेते, अखेरीचे गाणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, -- सागरलहरी

"स्वामी तिन्ही जगाचा"

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
गोंडस रुप तुझे, घेतले डोळ्यात भरुन। बोबडे तेझे बोल, ठेवले हृदयी कोरुन॥ दुडू दुडू चाल तुझी, पायी खणकतो वाळा। दॄष्ट लागेल म्हणोन, लावला काजळाचा टिळा॥ चिऊ काऊचा करुन, भरविला दुध-भात। पोट भरताच तुझे, धरीसी तू माझा हात॥ काम करता करता, हाती पाळण्याची दोरी। झोप लागावी म्हणुन, ओवी होती ओठावरी॥ लागलास चालायला, आंगण झाले थोडे। होई काळ्जाचे पाणी, जेंव्हा दॄष्टीस न पडे॥ जमविले सवंगडी, खेळ मांडला दारात। जेवायला किती वेळा, बोलाविले मी घरात॥ तहाण भूक विसरुन, खेळ खेळ्ण्यात रंगला। लागला मित्रांचा संग, आईलाच विसरला॥ आईविन नाही माया, असो रंक अथवा राव। ठेच लागताच येते, मुखी आईचेच नाव॥ सर्व मिळेल विक

भ्रांत....?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुना एकांत मनांत भ्रांत, कसे जगावे तुझ्यासवे ? तू गुणांची 'माया' मनाची, ओंजळ फुलांची सुगंधित ! प्रेम मनांत मन बंधनात, विरह आघात पिढ्यानपिढ्या ! मन पारवा ओला गारवा, तरी हा आघात वारंवार ! खंबीर होई विरुद्ध लढाई, तन बंबाळ जखमांनी !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी (सान्गली)
काव्यरस

वेगळी आहे

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पारदर्शक वागण्याची आंधळी स्थित्यंतरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे खोल गर्तेतील जाणिव उन्मळावी सारखी संपल्यावरती पुन्हा इच्छा बळावे आणखी सूर्य,तारे,चंद्र सारे टांगलेली झुंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे सुप्त इच्छा गुप्त होता लुप्त झाली वादळे लाट येते लाट जाते की किनारी आदळे वेदना,दु:खे ,निराशा माजली अवडंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे ओलसर अंतर्मनातिल पापणी तर कोरडी धडधडत शिरते उरी संवेदना माजोरडी पोट भरल्यावर कशाने वासरागत हंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे वादळाने वादळागत वादळावे वादळा मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा जीव गेला ,जावु दे त्याची कुणाला खंत रे वेगळी आहे धरित्र