Skip to main content

कविता

लागले वेड मज |

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 08/10/2013 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
चौकार आणि षटकार चेंडू तो तडीपार। धावांचा डोंगर । शतक रचण्याचे । लागले वेड मज।
सचिन म्हणे || १ ||
फायलींचा डोंगर । कामाचा बट्याबोळ । लाच खोरी, भ्रष्टाचार । कितीतरी पैसे खायचे लागले वेड मज |
मंत्री म्हणे ||२||
दिंडी पताका भजन। रंगले कीर्तन । भान हरपून । वाट चाले पंढरी | भेट द्या हो माउली | लागले वेड मज |
वारकरी म्हणे ||३||
उभे पीक गेले जळून । सगळे माळ वैराण । चढे कर्ज डोक्यावर । झाकू कसे नागडेपण | करितो आत्माहत्या | लागले वेड मज |
शेतकरी म्हणे ||४||

अविचल

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 08/10/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे .................... अज्ञात
काव्यरस

आज पुन्हा उडावेसे वाटले

लेखक पल्लवी मिंड यांनी सोमवार, 07/10/2013 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा उडावेसे वाटले पंखाना जरा विहारावेसे वाटले दगदग काय रोजचीच आज उसंतीला चाखावेसे वाटले घोटभर शांततेसाठी हे मायाजाल हटवावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले आकाशात हरवावेसे वाटले धावपळीत विरघळलेल्या मला अलगद ओढावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले नभीचे तरंग वेचावेसे वाटले विस्मृतित गेलेल्या बालपनाला परत जगावेसे वाटले त्या निरगसतेत झोकून द्यावेसे वाटले उंचावरच्या जगात मला आजमावेसे वाटले अंहपणाचा जप सोडून आज पुन्हा उडावेसे वाटले फार झाली आता अस्तित्वाची लढाई त्या गोड पाखरसारखे आज जगावेसे वाटले..... जगावेसे वाटले.......

दोष

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 04/10/2013 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलो त्यांच्यात ना मी, पाडले एकटे मला पाहून संधी; काढून वेळ, दोष लावला मला ll १ ll दिवसातले डावपेच रात्री, टाकायचे ठरवले तयांनी रात्र त्यांची चोरली मी, हा दोष लावला मला ll २ ll सभ्य कृतीत चौर्य, काय लागावी झोप तयांना स्वप्ने तयांची चोरिली मी, हा दोष लावला मला ll ३ ll फेडले वागलेले त्यांनी, सोने-पैसा लुप्त झाला परीस त्यांचा चोरला मी, हा दोष लावला मला ll ४ ll सजा तयांना द्याया ईश्वरे, योजून धाडिले संकटाला कृपा ईश्वराची चोरली मी, हा दोष लावला मला ll ५ ll झाले रिक्त कर्माने ते, परी मुळी ना पीळ गेला चोरले मी पुण्य त्यांचे, हा दोष लावला मला ll ६ ll पितळ

व्यथा

लेखक psajid यांनी गुरुवार, 03/10/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
गरिबीचा आसूड दुनिया माझी न्हवं, पायात डोकं दुमडून घ्यावं .....! अछुत जीव मनास ठावं, क्षुद्र मराण भाळी ल्यावं .....! हक्काचं मागणं घोर जीवा लावं, शिक्षेच्या झाकोळात मुजून जावं .....! आक्रीत करण्यां मन वेडं धावं, चाकोरीबाहेर पाऊल मरणास भ्यावं .....! आश्रूंभिजल्या भूमीच्या गंधात न्हावं, 'कर' नभाकडं मातीत एकरूप व्हावं .....! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

(गेम)

लेखक धन्या यांनी बुधवार, 02/10/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेम गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! गेम झाली तर माणूस गेला नाही झाली तर माणूस वाचला गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एक टपकला की दुसरा दुसरा टपकला की तिसरा गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! लपायला अजिबात जंगल नाय सावली आहे ती वड पिंपळाची गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एकडे आहे मंद मोर ज्याला सापडत नाही लांडोर ! गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते!

निळारंभ

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 24/09/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे निळारंभ मुक्तसे काही मला खुणावे बोलेल जरी मजपाशी मन करीन मोकळे ll १ ll माझ्या उरात दाटे व्यथा बरे कशाची करतील दूर काय तिज मेघ सावळे ll २ ll बोलू कसा तयाला? जीव आर्त गुदमरे संकेत विहंग सांगे घे भरारी अवखळे ll ३ ll मी बोलता जरासा तोही भरून आला तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे ll ४ ll हा पाऊस आसवांचा वाहून हर्ष त्याला मी ही भिजून चिंब दु:ख सारे निमाले ll ५ ll - सार्थबोध

' अधांतरी ..'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 23/09/2013 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण कुंद कुंद दाटून येते. अनावर ठसठसते, रक्तासारखी ठिबकते. दिशांच्या कोनात विझून गेलेले हळवे पक्षी जागे होतात, उगाच चिवचिवतात, श्वासांच्या फांदीवर घट्ट रुतून बसतात. क्षितिजावर सांडलेले रंग सुटतात ; अलवार आकाशावर दिशाहीन फुटतात. तुझे भास प्राणांतून विजेसारखे लखलखतात, धारदार पात्यासारखे आरपार जाणिवेवर फिरतात. तूझ्या असण्याच्या शक्यतांच्या सीमारेषेवर जीव इंद्रधनुष्यासारखा सततच अधांतरी ..! - डॉ. सुनील अहिरराव

असले कसले जेवण केले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 22/09/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
असले कसले जेवण केले जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले घरी येतांना खुप भुक लागली लगेच आयत्या ताटावरती बसले आमटीत होते पाणीच पाणी जळक्या पोळ्यांचेही आकार कसले! ईईई आळणी भेंडी करपा भात तसेच खावून उपाशी मी उठले काय नशिबी आले माझ्या जेवण हे बेचव असले कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला तेथेच आयटीतली बाई मी फसले सांगितले कितीदातरी त्याला नको बनवूस जेवण असले कसले पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच करायचे लग्न मनी ठसले एकदाचे जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले - डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------ दिर
काव्यरस

देव नावे भिक्षा चालुच राही....

लेखक निश यांनी शुक्रवार, 20/09/2013 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
देव नावे भिक्षा चालुच राही पोटांस ह्यांच्या तडस नाही. ह्यांना झाला भस्म्या माणुसकीचा माणसांची श्रध्दा खात सुटती. देवही आता ह्यांच्या दयेचा भुकेला ह्यांच्या घरी सदा तुप आणी लोणी. देवही असा पराधीन झाला लागली नजर त्याला ह्या डोमकावळ्यांची. सत्तेचा ह्यांना अस माज आला माणसाचा ह्यांनी गुलाम हो केला. देवास नाही गरज पैशांची तो तर भक्तांच्या भक्तीचा भुकेला. भ़क्तीचा ह्यांनी बाजार मांडला देवासही ह्यांनी कैदेत डांबला. म्हणे दास निश जागे व्हा तुम्ही देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. (देवाचा बाजार मांडुन तुंबड्या भरणार्‍या भोंदु लोकांचा निषेध करावा म्हणुन ही कविता