Skip to main content

कविता

ओढ दर्शनाची

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/09/2013 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ मन होते कासावीस लागुनिया वेड काम करता लक्ष नाही कामामधे चूक नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक घर नाही दार नाही विसरतो संसार जीवनात सार सारे वाटू लागते असार नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . . .
काव्यरस

नवथर

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/09/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
धुके सभोवर मन काठावर गूढ प्रभात रुपेरी भास आभासे असलेलेपण भ्रामक दुनिया सारी दंव; लव तृण पानांवर पसरे अगाध नीर पथारी गंध मोकळा मातीचा असमंती घेई भरारी कोण संग तो कुणा व्यापतो अगतिक आभा चकोरी नील आकाशी पाचू रानी नवथर हिव अंबारी ………………. अज्ञात
काव्यरस

बोल बैला बोल : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 18/09/2013 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
बोल बैला बोल : नागपुरी तडका


        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस

२०१४

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 17/09/2013 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या प्राक्तनाचे लिलाव जवळ येताच भावी विधात्यांची स्वप्नांची दुकानं पॉश एरीयातल्या आर्ट गॅलरीतली कोलाज बनून सजतात गूढ, अगम्य, गुंगवणारी पण प्रेक्षणीय आणि चक्क श्रवणीयही तेव्हां.. टाळ्या पिटायला आख्खी धारावी धावते आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी - संध्या १७.९.१३
काव्यरस

शिवबाचि तलवार

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 16/09/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांची भवानी तलवार चाले - जिने हिंदुधर्माचे रक्षण केले , निराधार प्रजेला संरक्षण दिले निष्पाप प्रजेला भयमुक्त केले. बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले , अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले . मोगलाई बरखास्त झाली, स्थापला महाराष्ट्र धर्म , लोकशाहीची तुतार फुंकली , सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले , अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले . बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे , प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे , किती एक गड किल्ले काबीज केले. अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .

कल्लोळ..!!

लेखक राघव यांनी सोमवार, 16/09/2013 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
काव्यरस

झिम्माड पाउस...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 15/09/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
झिम्माड पाउस... अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्माड पावसाला झाली सुरुवात ... भेटण्यासाठी अधीर झाले समुद्रकिना-यावर धावत गेले... तुफान सरी बेभान वारा बेधुंद झाला आसमंत सारा... अंगाशी झोंबत होता लडीवाळ वारा... मस्तीत स्पर्शून जात होत्या फेसाळणा-या लाटा... बेधुंद होउन मी मजेत गात होते... लाटांच्या संगीतावरही थिरकत होते... मनाला चिंब भिजवणा-या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते...

निरोप

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 12/09/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी?

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 12/09/2013 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥ कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला । मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥ न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥ मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे । कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥ न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥ प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया । धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥ नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥ तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्

सार्थक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 10/09/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आभार… तिच्या गारस वयाचे ओळखीच्या समयाचे आतर्क्य यमनाचे आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या अरूप यौवनाचे ……. !! त्यातूनच उतारावरचं तारुण्य नात्याचं लावण्य शब्दांचा प्रसव आणि भावनांचा दुर्लभ शृंगार लाभला आहे मला … "माझा मी",… "नसूनही असलेली माझ्यातली ती " भेटलीय मला असंख्य वेळा ……. अस्तित्वाशिवाय ……!! या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच जिवंत ठेवील मला चंद्र माधवीच्या प्रदेशात तिची प्रतीक्षा करीत चिरंतन …. !! आभार पुन्हा एकदा आमच्या न भेटण्याचे, …… आजन्म ………………. !! …………………… अज्ञात
काव्यरस