Skip to main content

कविता

मंतरलेले दिवस ते, पुन्हा परत येतील का....

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 30/10/2013 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
येतील का मिपा चाळत असताना एका धाग्याचं नाव वाचलं आणि त्या मक्त्याला धरून विचारांना बरोबर घेत मग काव्य सुचत गेलं... aaa नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का निर्जळ झाल्या आपुलकीच्या नद्या इथे डोळ्यात प्रेमाचे ते झरे नभातून वाजत गाजत येतील का मिटेल का कधी इथली ही विषयांची वानव

शापवाणी

लेखक धन्या यांनी बुधवार, 30/10/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
झडली तुझी जीभ गेली तुझी वाचा होउ दे रे खाचा डोळ्यांचिया पडतील रे पाने कुणी लावीना शेपूट राहशील असाच राणीविना वेचशील कागद मागशील भीक मारुनिया झाडू राहशील झालं रे वाटोळं तुझा वळला संगाड टोचतील कावळे बसुनिया फळवशील रांडा महारोग होईल पडतील कीडे अंगावरी अशी शापवाणी कानाला सवय वाढले ते वय मन नाही
काव्यरस

किनारा

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 30/10/2013 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताचे पन्ख पसरुन काळपक्षी सांद्र क्षितिजे खुणावतो अन अस्वस्थ ललाटरेषा श्रांत चांदण्याचे कवडसे मोजत शोधत रहातात विसावा अन्तराळाच्या कुशीत ... तेव्हा रिकामे रस्तेही ... शोधत सरपटतात उद्याच्या प्रवासाची हरवलेली दिशा अन प्रसववेणा देणारी पहाट शोधू पहाते दिवसाच्या उजाडण्याचे कारण.. आणि आसमंताच्या नि:शब्द कूपात मी चाचपडत असतो आणि शोधत रहातो.. .....फक्त एका कुशीचा किनारा

घरे उजळती सारी

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 29/10/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने मला परवा सांगितलं की त्याच्या मुलाला (म्हणजे त्याला स्वतःलाच) शाळेने दिवाळीसाठी एक `प्रोजेक्ट' दिलंय `प्रोजेक्ट'. ज्यात दिवाळीचे `गुड इफेक्ट्स आणि बॅड इफेक्ट्स' (मुळात हे आधी मला काय ते समजलं नाही) लिहून द्यायचे होते. बॅड इफेक्ट्स म्हणाला मी गूगल वरून काढले. (:D बर... म्हटलं मी) गुड साठी काही बघ ना जमतं का लिहायला, एखादी लिस्ट, एखादं ग्राफिक किंवा एखादी कविता. तेंव्हा सहज सुचली ही कविता काम करता करता.

चीत्कला

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 28/10/2013 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
चीत्कला चपळ चमके गगनी स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी थरकापे अवनी तपोवनी डोळ्यात आंसवे विद्ध मनी काळीज तळी अवखळ पाणी जळ खळाळे विकल होवोनी अस्वस्थ मेघ धावे कोणी चातक चोचीत शुष्क रमणी वेदना सखी मिरवे अंगी श्रम दाह शमे ना एकांगी शिडकावा तनभर भावुकसा व्हावा अमृतमय शतरंगी ……………. अज्ञात
काव्यरस

सुखाच्या शोधात.....

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या शोधात..... चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 25/10/2013 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली … माझे मला वागण्याचे कोडे का पडावे , आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली … आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. माझ्याच दोन आसवांचे सामने खेळतो मी , बेधुंद यातनांच्या कैफात लोळतो मी … डोळ्यात अखेर माझ्या आसवेंच उरली …. आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …
काव्यरस

तुझे एकेक विचार.......

लेखक psajid यांनी शुक्रवार, 25/10/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे एकेक विचार जपलेत मनांत, तूच दिलेले श्वास आज पिंजऱ्यात......!! आज पिंजऱ्यात जन्मा जन्माची साथ, तन बंबाळ जखमांनी अन वाट पायात......!! वाट पायांत अन आग दही दिशात, होरफळत चाललो मी तुझ्या एका वचनात......!! तुझ्या त्या वचनात प्रेम बलिदानात, हृदय घायाळ पण हसं डोळ्यात.......!! हसं डोळ्यात वाराही शांत, थकून गेलो मी शेवटच्या सहवासात........!! तुझ्या शेवटच्या सहवासात अनोळखी क्षणात, पानगळीच जगणं .....आणि बाकी शून्यात ...........!! .....आणि बाकी शून्यात ...........!! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

तेंव्हा आणि आता ...

लेखक माशा यांनी शुक्रवार, 25/10/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर ! मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला 'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला ! तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी ! तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक ! तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची ! - माशा
काव्यरस

"बाई गेली"

लेखक अमेय६३७७ यांनी शुक्रवार, 25/10/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बाई गावापुढं गेली, बांबू-काठीची कमान. खाल्ला नाही धड घास, चूल रांधताना जिनं, तिच्या तोंडामधे सोनं. बाई अहेवपणीची, लाल माखलेली टाळू. अंगी नेसलं जुनेरं, जिणं जगताना जिनं, तिला मरताना शालू. बाई लाकडावरती, तूप-तेल ओघळलं. एका गजऱ्याची नाही, आस माळलेली जिनं, तिच्या अंगभर फुलं. बाई चंदनाची हवा, जाळ भणाणून फार. माप ओलांडलं नाही, दारावेशीतलं जिनं, पापापुण्याच्या ती पार. -- अमेय