Skip to main content

कविता

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/07/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

कधीतरी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 17/07/2013 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
धुसफूस भावनांची विसरू कधीतरी जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी आणू कुठून सांगा शोधून एक मित्र जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी' मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी आम्हासही कधी, पुसतील लोक सारे आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी आकाश बंधनांचे भेदू कधीतरी आहोत तेच आपण, जाणू कधीतरी 'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी

कृष्ण तो आतला ...

लेखक आतिवास यांनी बुधवार, 17/07/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला. युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला. निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला. प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला. अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला. **
काव्यरस

शब्द शब्द

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 17/07/2013 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द शब्दातच सारे शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा वडवानळ जळ शब्द पसारे एक एकट्या एकांताचे कूस छत्र घर शब्द सहारे मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे खोल ओंजळी लाव्हा अंकित खुपणारे सल शब्द बोचरे शब्द उतारा सकल प्रार्थना आत्म संहिता शब्द खरे .....................अज्ञात
काव्यरस

सासर-पण-माहेर

लेखक Bhagwanta Wayal यांनी मंगळवार, 16/07/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आहे ग आई मी सुखी समाधानी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं प्रेमळ पती मला जपे फुलावाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर आठवेल कसे आता मला ग माहेर जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी बाहेरची कामे मला नाही ग सांगत स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात जीव लावतात मला सर्व मुलीवाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नाही म्ह्टले तरी रोज आठवण येते तेंव्हा मात्र मन माझे कासाविस होते आठवत बसते तेंव्हा जुन्या आठवणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

पाऊस

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 15/07/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे लाजत मुरकत, बरसून गेला पाउस नवथर तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर मातीवरती हलकी नक्षी, पानांवरती रंग ओलसर मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर पागोळ्यांचे पैंजण छुन छुन, टपटपणार्‍या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली मेघ अजूनही विस्कटलेले, चंद्रकोर ही ओली अजुनी अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी

राते- हिंदी रचना आणि भावानुवाद

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 15/07/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमरः जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु?
काव्यरस

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 14/07/2013 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत.
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 13/07/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुखः झेलण्या हवे मन खंबीर काव्य हे स्फुराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हवे
काव्यरस

" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी .. भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद .. तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार पेलतो विठ्ठल आमचा हा संसार .. भक्त सारे गुंग मुखात अभंग भजनात रंग कीर्तनात दंग .. जातीभेदा वारीत नाही हो थारा विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा .. उच्चनीच नाही, नाही रावरंक सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..
काव्यरस