Skip to main content

कविता

दुष्काळाच्या मरणकळा

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
आस लागली पाण्याची ती कणकण उरात भरली काही पेरलेले जाळून गेले मयत झाली जमीन सारी होरपळलेल्या मयतावरती लाल उन्हाचा कपडा भारी उघडे चोच एखादा दाणा कोरडा घास त्याच्या दारी किती हरपले किती करपले कोण कोणास ना तारी थरथरना-या काळजावरती जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी उन्मळलेले मूळ उठले हंबरडा फोडी नभाच्या कानी नभानेही मग सूर लावला मरणकळाच्या सोडून तानी

देवा आता हार मान तू

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हिरवे-भगवे वस्त्र चढवुनी इथेच ठेवले तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे माणसे माणसा खाण्याअगोदर देवा आता तू खाली धाव रे

...शब्द काही

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 11/07/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधी बोल तू नेमके शब्द काही तुझ्या मनीचे नेटके शब्द काही अजुनी मला ऐकू येतात तुझिया पत्रातले बोलके शब्द काही आता टाळतो मी तुझी भेट घेणे छळती तुझे हासरे शब्द काही आता बोलणे हे मुक्यानेच होते आता जाहले पोरके शब्द काही पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व विसरू कसे मागचे शब्द काही
काव्यरस

शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 11/07/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे कोपरे खणून बघितले. खोलीला उथळ मानून बघितले. मनाला चपळ करून बघितले. चपळतेला थोडा लगाम लावून बघितले. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले रागाला थोडे प्रांत देऊन बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा बाळगून थोडे श्रीमंत होऊन बघितले समईला वात देऊन बघितले तर देवाला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

साला एक प्याला , साला एक प्याला

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 11/07/2013 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
साला एक प्याला , साला एक प्याला वाट अशी ती गळयातुनी अन मेंदुपर्येंत 'थांबा' याचा मना-मनातुनी रुतलेल्या त्या कळे कळे हो याला खाचा हळू हळू मग सैल अंग ते … खऱ्या खऱ्या मग खोट्या बाता इकडंम-तिकडंम …. तिकडंम-इकडंम पायाच्या त्या तिरप्या वाटा साला एक प्याला , साला एक प्याला …….

जिंदगी जम चुकी है अब

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/07/2013 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: बर्‍याच वर्षांनी हिंदी मध्ये काहीतरी सुचले (असं फार क्वचितचं होतं). म्हटलं इथे प्रकाशित करावे पण मग विचार केला हे बरोबर नाही. मिपा हे मराठी भाषेला वाहिलेले जास्वंदी फुल आहे. मग याच रचनेचा मराठीत अनुवाद केला. मला स्वतःला फारसा भावला नाही पण पहिला प्रयत्न म्हणून चालु शकेल असे वाटले. खरंतर अनुवाद किंवा भावानुवाद हा माझा प्रांतच नाही. त्यातल्या त्यात इतर कोणाही कवीची रचना असेल तर काही खरं नाही. हिंदीतली रचनाही माझीच असल्याने हिंमत करतोय.

शब्दबेवडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 09/07/2013 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

आधीन

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 08/07/2013 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी एकांत सागराची पागोळते विराणी थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना ........................अज्ञात
काव्यरस

सरकारी नोकर

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/07/2013 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर येईना कधी कामाला कधी मधी पगाराला सर्वात आधी तो सरकारी नोकर॥१॥ फाईल्स टाकी ऐसपैस काम करी सावकास टेबलाखालुन घेई पैस तो सरकारी नोकर॥२॥ पैसे घेऊन काम न करी पार्टीला बोलवी घरी नेहमीच अपेक्षा धरी तो सरकारी नोकर॥३॥ जेवण करून झाकी डोळे कधी चार वाजताच पळे घरी जाऊन नुसता लोळे तो सरकारी नोकर॥४॥ वाटेल तेंव्हा घेई रजा खाऊनपिऊन करी मजा म्हणे साहेब आहे माझा तो सरकारी नोकर॥५॥ काम चुकार एक नंबर काम थोडे बोले फार टाकी दुसर्‍यावरी भार तो सरकारी नोकरी६॥ साहेबांची हाजी हाजी सह-कार्‍यांची नाराजी रोज बातमी सांगे ताजी तो सरकारी नोकर॥७॥ युनियनचा पदाअधिकारी काम कधीच नाही करी वाटेल तेंव्हा जाई घरी तो सरका