Skip to main content

कविता

प्रवास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 25/04/2013 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास चालू आहे माझा शून्याकडून क्षितिजाकडे . . अथक, अविरत . . थांबता नाही येणार मला खूप थकलोय, पण थांबलो तर मन रागावेल आणि पाय तर चालायला नकार देतायत जाऊन जाऊन कुठे पोहोचणार? क्षितीज तर एक रेघ.. आणि शून्य? ते काय? सुरवात केलेल्या बिंदुला गोल फिरून पोहचणारी एक वळसे घेणारी रेघच ना? . . मग का चालावे? पण मन, ते का ऐकत नाही? मनालाच ठाऊक विचारले जरी सांगता थोडीच येणार आहे त्याला? आणि सांगितलेच तरी कळणार कोणाला इथे? जाऊ दे त्यापेक्षा हा प्रवास काय वाईट आहे? चालू ठेऊया शून्याकडून क्षितिजाकडे . अथक, अविरत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०५/२०११) (हो, साधारण दोन वर्षांपूर्वी लिहीलेली हि कविता आहे.)
काव्यरस

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

नट्यांचे रहस्य

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 24/04/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या , मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या, एकमेका करती सेलफोन, आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण? देवांना घातली त्यांनी आण , स्वर्गात नाही अप्सरांचे वाण , नका आणू स्वर्गात एकाही नटीला, पोचल्या असल्या जरी साठीला ,
काव्यरस

भेटलाच कधी.....

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 24/04/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......। "भक्ती" म्हणजे काय असते ? देवाचे स्वरुप हे चरचरात असते कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥ भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......। "ज्ञान" म्हणजे काय असते ? सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥ भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......। "वैराग्य" म्हणजे काय असते ? सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥ भेटलाच कधी शिवाजी तर विचारा त्याला....। "सामर्थ्य" म्हणजे काय असते ? प्रजेच्या दुखःची जाणीव अंतरी झाली यवनांशी युध्द करून स्वराज्याची स्थापना केली ॥ भेटलीच कधी अन

शोध

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 24/04/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.

खरा चित्रपट

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 23/04/2013 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
यमास आवडती हिंदी चित्रपट ,हिरोंना न्यायची करेना खटपट , यमाने सनीचा गदर पाहिला ,भेटण्या सनीला उभा राहिला, वाटले ,सनी हा आहे कोण?,त्याने केला सनीला फोन, सनीला विचारले यमाने एवढी माणसे कशी मारतो एकट्याने?, सनी म्हणे हे सर्व आहे खोटे ,तुला एवढे आश्चर्य का वाटे?, आमच्या पेक्षा तुझा चित्रपट मोठा ,अचानक येतात कशा त्सुनामी लाटा , लाखावर माणसे मारतो क्षणात ,आम्हीही मारत नाही रणात , तुझे मात्र सर्व असते खरे,तुझ्या पेक्षा आमचे
काव्यरस

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस

॥स्तवन धरणीमातेचे ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 22/04/2013 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली । शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला । एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी । सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला । सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते । स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला । गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा । भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला । उत्तम बीजे सुपिक माती । अन्न धान्य ही विपुल होती । जीवन देते सकळ विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला । कितेक धातु लहान मोठे । तेलाचेही अनंत साठे

आषाढी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/04/2013 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही ..............................अज्ञात
काव्यरस

वसंत ऋतू आला -

लेखक विदेश यांनी सोमवार, 22/04/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी तू ओले केस फटकारत असताना आरसाच दिमाखात असतो पुडीतून हळूच डोकावणारा मोगरा प्रसन्न हसत असतो स्वत:शीच मान डोलावत खिडकीतून डोकावणारी अबोली काहीतरी पुटपुटत असते मनातल्या मनांत छानसे मिठी मारल्यागत लाजाळू तुझी पाठ पहात खुदकन लाजलेले असते आरशासमोर दोन गुलाब उमलत चाललेले मला दुरूनही दिसतात ओठावरचे निसर्गदत्त डाळिंबाचे दाणे पिळवटून ओठावर पसरायला पहातात दोन भुवयांच्या कमानीत जास्वन्दीचा लालभडक ठिपका विराजमान होत असतो पावडरच्या कणाकणात जाईजुईचा मंद सुगंध अहाहा, चेहऱ्यावर पसरतो हिरव्या साडीचोळीतले अनोखे रूप मनाची घालमेल वाढवते माझ्या कवितेतला वसंत बहरलेला असतो उन
काव्यरस