Skip to main content

कविता

स्त्रीस श्रद्धांजली

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 16/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..
काव्यरस

मी नव्याने कोवळा झालो...

लेखक धन्या यांनी सोमवार, 14/01/2013 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच.
काव्यरस

मनातलं जनात आणलंय

लेखक तळेकर यांनी सोमवार, 14/01/2013 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता "महामानव" आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला. खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला. व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला. त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो.

नि:शब्द .... मी !

लेखक विदेश यांनी सोमवार, 14/01/2013 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला भेटल्यावर मी एकही शब्द बोललो नाही ! अगदी स्वाभाविक आहे तुझा नंतरचा रुसवा फुगवा ; सांगू का खरेच सखे , तुला पाहताक्षणीच - नुसतेच पहावेसे वाटत राहिले...शब्दांनाही ! . . .

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 08:24 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

खोल खोल मनामध्ये...

लेखक वेणू यांनी रविवार, 13/01/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल गळालेले रितेपण मुठी भरून घेईल तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल - बागेश्री ब्लॉगवरही प्र

पुरुषार्थ

लेखक विदेश यांनी रविवार, 13/01/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती जणांचा धावा केला कुणी न तेव्हां धावत आला किती दमले मी टाहो फोडुन रडले कुढत अपुल्याच मनातुन जपण्याचा मी प्रयत्न केला शीलाच्या माझ्या ठेव्याला दुर्दैवाचा घाला पडला नशिबी दुर्योधन धडपडला जगास फुटला नाही पान्हा धावत नाही आला कान्हा सुन्न-खिन्न टाकून मी मान पुरुषार्थाचा बघत अपमान ! . . .

आता तरी मानवा सावध होशील का ?

लेखक शिवप्रसाद यांनी गुरुवार, 10/01/2013 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी मानवा सावध होशील का? मानवतेच्या धर्माला जागशील का? चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले । तुझ्या रूप-गुणांसी भुललास का? आता तरी मानवा सावध होशील का? विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी । म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी । परी चाले तुझीच मनमानी । तुझ्या निर्मात्यास तूच न मानी । जन्मदात्यास तरी तू मानशील का? आता तरी मानवा सावध होशील का?

प्रांतिक किंवा भाषीय वाद

लेखक पंकज रुगे यांनी गुरुवार, 10/01/2013 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारींना होतोय बिहारचा भास सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ... आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई बाबांनी लढली धर्माची लढाई आपण लढतोय प्रांताची लढाई मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई... शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना महागाईचा फुगा आटोक्यात येईना अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना... दहशतीचा काळ काही केल्या थांबेना सीमाही आता सुरक्षित वाटेना विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना... सगळ आता कळतया पण मन मात्र वळेना विचार आपला बदलतोया पण कृत