Skip to main content

कविता

संक्षीप्तानुभव

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 17/12/2012 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार.

आता तरी देवा,

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 15/12/2012 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी देवा आम्हा पावशील का? महागाईला आळा तू घालशील का? दिवसेंदिवस हि वाढतच जाई | जगामध्ये हिला कोणी रोखणारा नाही | तू तरी हिला आता रोखशील का? महागाईला आळा तू घालशील का? गरीब श्रीमंतातली दरी वाढतच जाई | पुढारी खिसे भरण्यात मग्न होई | याच्यासाठी काहीतरी करशील का? महागाईला आळा तू घालशील का? पैसेवाले रोज करतात मजा | गरिबांसाठी संसार, आहे एक सजा | गरीबांचा वाली तू होशील का? महागाईला आळा तू घालशील का? रोज होत आहे नवीन घोटाळे | गरिबांचे निघते आहे रोज दिवाळे | त्यांच्यासाठी रोज दिवाळी आणशील का? महागाईला आळा तू घालशील का? महागाईचा असा चालला आहे खेळ | खर्चाचा नि पगाराचा बसेना वो मेळ | ताळमेळ घडवू

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

मेटामॉर्फिसीस

लेखक स्पंदना यांनी रविवार, 09/12/2012 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी. माझ, मला.... असा पिळदार रेशमाचा भक्कम कोष गुंफायचा स्वत:भोवतीच अन विणायची स्वप्न लपेटदार पंखांची सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची. यांन द्याव, त्यानं करावं. शिवाजींन सदाच शेजारी जन्माव. मी मात्र माझ्या कोषात मग्न मनी मानसी पंखांची स्वप्न पण विसर मुख्य मुद्द्याचा स्वत:ला झोकून द्यायचा कुठे एक बोच नको माझ्या पुरती आंच नको कशी लाभावी देण पंखांची जर न सुटती कोषाच्या भिंती? असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला धुडकाव पहिलं आपल्याच मताला. तरच अपेक्षांना फुटतील पंख सोस क्षणिक दु:खाचा डंख मग होशील मुक्त तू घ्याया भरारी फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी सोड आस या रेशीम कोषाची जग असा क्षणभरी की
काव्यरस

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 08/12/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या
काव्यरस

रात्र चांदणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 08/12/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र चांदणी ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले? मुक्या शब्दांचे गीत कधी झाले ऐकतांना कळले नाही आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली कुठे ते कळले नाही प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले कधी कळले नाही - पाषाणभेद
काव्यरस

मित्र :)

लेखक रसायन यांनी गुरुवार, 06/12/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अकस्मितपणे त्याची तिच्याबरोबर भेट झाली पहिल्या भेटीतचं जणू ती त्याला आपली वाटू लागली वरचेवर होऊ लागल्या त्यांच्या भेटीगाठी वाटले त्याला ती, फक्त बनलीय त्याच्यासाठीचं मनातं त्याच्या आलं सालं एक्दाचं धाडसं करावं आपल्या मनातलं प्रेम तिच्यापुढं व्यक्त करावं धाडसं करूनं तो म्हणाला, "स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?" पण मित्र बनवून तिने त्याचा पुरता केला मामा ठाऊक नव्हतं बिचार्‍याला प्रेम करायचं सूत्र आयुष्यभरं बनूनं राहीला तो तिचा "मित्रं" :):):);) (कविता- स्वरचित)
काव्यरस

गाणे गात रहा

लेखक हारुन शेख यांनी मंगळवार, 04/12/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील हवे एक वचन तरी, गात तू रहाशील प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही अंती येशी किनार्याशी सुखावेल मन पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद गोंजारेल गाल वारा करुनिया नाद शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी खंत नको परतीच्या वाटेवर वेडी शेवटचे स्वप

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 01/12/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दु
काव्यरस

पंख

लेखक ज्ञानराम यांनी गुरुवार, 29/11/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
काव्यरस