Skip to main content

कविता

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

दवबिंदू..!

लेखक वेणू यांनी बुधवार, 18/07/2012 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यर्थसा दवबिंदू पानावर गोठलेला, धरणीला जो नकोसा आकाशाने त्यागलेला..! तुज रुपवान भासे, मज भासे, मी अभागी उदास घुसमटतो, थिजतो, बसल्या जागी...! क्षणभंगूर सारे काही जाणतो आपण सारे, देखणे दिसणे फक्त हे जगणे आहे का रे..? पानावर ओल्या ओल्या मी खिन्नसा बसलेला टिपेल का मज कोणी, आशेवर बेतलेला.. मज नाते ना रुचते ना जमते बिलगाया, थिजणे संपून जावे वाटे जन्म नवा घ्यावा! जिथे स्वैर मी असावे अलगद मी रुजावे, अन् माझ्या रुजण्याने जन्म नवे उमलावे.. ही इच्छा अधू आहे ही आसही कोरी कोरी, मज ठाव आहे सारे जन्म, ना कोणी उद्धारी! घे जगून संपतो आहे मी मिथ्या जगलो आहे, इच्छा लपेटून सार्‍या जागीच विरतो आहे! माझ्

संजीवक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 17/07/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे .....................अज्ञात
काव्यरस

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस

एक होती चाळ...

लेखक निश यांनी शुक्रवार, 13/07/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती. चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत. परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत. नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती. चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती. एका घरात चहा झाला तर दुसर्‍या घरात खाण व्हायच. रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच. जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत. माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती. संकट आल एखाद्या घ

घरातल्या भिंतींना...

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वेळा आपल्या घरातील लहानगे भिंती रंगवतात... त्या रंगवेल्या भिंतींचा कौतुकही कोणाला एवढ नसत किवा त्या कोणाला खराबही वाटत नाही, पण काळाच्या ओघात त्या भिंतींना नवीन रंग दिले जातात आणि त्या नक्षी रंगाच्या पडद्या आड लपल्या जातात... थोडासा प्रयत्न ह्या आठवणी चाळण्याचा... आणि मनाच्या कोपर्यात जिवंत ठेवण्याचा... घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय... त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय... समोरची हि मोठ्ठी भिंत...
काव्यरस

वारीसोबत चार पावलं....

लेखक मन यांनी रविवार, 08/07/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली. त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते. मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो. "जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ मझिया मना देइ भगवंता. तुझिया कृपेने झालो मी अमर मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर. तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता आता काय होणे सांगी पांडुरंगा ठाकलो उभा दारी तुझ्या वाजवी टाळ सजवी मृदुंगा टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा ---मनोबा---
काव्यरस

सर्सर आल्या सरीत...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/07/2012 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि! डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर ! चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची! शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही! वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून ओला श्रावण हळूच डोकावला मनातून! मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा? चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा ! त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे ! म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी! -चैतन्य दीक्षित

खंड कपारी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 05/07/2012 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात
काव्यरस