Skip to main content

कविता

अवचित

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 14/08/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके,.. वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा ..........................अज्ञात
काव्यरस

सबूर

लेखक धनंजय यांनी शनिवार, 11/08/2012 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
सबूर --- अवचित वाटेवर जुडलेले साथीदार-- काय त्यांच्या गाठोड्यांत? काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात चिघळले काळ फार? . चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ सारे उघड उघड… तरी लपलेले जणू गोंधळात गडबड! शोधू काळजीने वाट... . आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत भांबावून खूप वेळ... बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ, सबूरीची आहे बात. --- --- Slow Going --- What all is crammed in sailors' chests Of bunkmates met by chance? What wounds we bear within our breasts What abscesses to

रेशमी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 10/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुंदणे कोंदणे कोंडलेल्या स्वरांचे मुके; बोलके आज झाले कसे मिळाली दिशा बंद वार्‍यास जेणे उधाणून आले जिणे देखणे एक होता निखारा उरी कोवळा स्नेहवातीपरी जाहला मोकळा साचलेले उतू वाहिले अन तराणे झणी भंगला दाटलेला गळा रेशमी कोष अंगी तया लाभले रोमरंध्रातले क्लेश आलोचले व्यापलेल्या गळाल्या उणीवा कळा रास राशीत नाचला कृष्ण सावळा ....................अज्ञात
काव्यरस

श्रावणाच्या चिंब धारा

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही.
काव्यरस

लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 09/08/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
खोड्या करुनी दंगा करुनी गोपगड्यांना खेळवतो - लबाड कान्हा खट्याळ कान्हा यशोदामाईला पळवतो - क्षण शिक्षेचा गोळा लोण्याचा डोळ्यासमोर वितळतो ! हसणे विसरता रुसून बसता आनंद माईचा मावळतो - मुख उघडोनी विश्व दावूनी यशोदामायेला 'माया'ळतो , यशोदामाता जवळी घेता पदरामध्ये विरघळतो !

" मैत्री - "

लेखक विदेश यांनी शनिवार, 04/08/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
. संकटकाळी हात देशील अडचणीत मदत घेशील - चहाडी चुगली कानावर हात मैत्रीत नसते जातपात ! मैत्रीला लागत नाही कात्री असते मैत्रीत पक्की खात्री - मित्रात जेव्हां अतूट मैत्री विश्वासाची पक्की खात्री ! उपकार होतील खूप तुझे देवा, एकच मागणे माझे - एकच मित्र असा मिळावा कृष्ण-सुदामा आदर्श रहावा ! .
काव्यरस

धाव रे धाव देवा आता

लेखक निश यांनी शनिवार, 04/08/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
धाव रे धाव देवा आता गाढ निद्रासुख सोडुन जागा हो आता. तुझ्या न येण्याने इथे पडतो रे खुप फरक मानवानेच केला आहे उभा इथे खरा नरक. खुन, दरोडे, बलात्कार, लाचखोरीने गाठला आहे कळस आता तरी सत्वर ये सोडुन दे रे तुझा आळस. माणसापेक्षा प्राणी बरे, मुके असतील तरी ईमानी असतात खरे. माणसातले श्वापद मात्र माणसावरच धाड अहोरात्र घालतात का रे? करु नकोस उशीर, घे पापविनाशा जन्म पुन्हा, तुझी वाट पाहुन सुकला बघ ह्या धरणी मातेचा रे पान्हा. ये धाऊन सत्वरी करण्या दुष्टांस शिक्षा दे आम्हाला आता तुझ्या उपकारांची जीवन भिक्षा. धाव रे धाव देवा आता.

रद्दीवाला -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो - मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो ! एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो - "आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो ! कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव' 'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव - व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
काव्यरस

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

चंद्र-कळा

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 02/08/2012 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र फुलांचे हार गळा रात्र सजविशी अंग-कळा || धृ. || धुंद धुंद मन, बहर-बंध तन स्पर्श रेशमी, घुसमटतो घन छेड काढता, लटक्या रागे म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ || देह उमलले, मिठीत रमले श्वास केतकी, गुंफून पडले रात्री मधुनी, कळीकाळाच्या रंगला हा रास खुळा || २ || एकतनूता, एकतानता, द्वैत मिटले, दोघांकरता आसक्तीच्या मैफिलीत ह्या जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ || -पूर्वप्रकाशित