Skip to main content

कविता

ADD AS FRIEND ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 09/09/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपे असते ना ADD AS FRIEND ...!! .. करणे नुसते क्लिक केले की मित्र होणे कुठला कोण मी ..? पण पटकन तुमचा मित्र होऊन जाईल तुमच्या मनाच्या खिडकीतून हळूच मी डोकावेन छानसे चांदणे होऊन छानसा प्रकाश फुलवीन तुमच्या हसण्यात मित्र होईन तुमच्या दु:खात मी धीर देईन किती सोपे आहे ना ADD AS FRIEND ...!! ..
काव्यरस

अस्तित्व दान केले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 06/09/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व दान केले


असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी

कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 06/09/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे. कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती. कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात.

कविता रसग्रहन २ - 'आलेख' (कवयत्री : अपर्णा)

लेखक गणेशा यांनी सोमवार, 05/09/2011 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुळे कविता : 'आलेख' नोट : राजेश जीं नी कविता रसग्रहन केलेले आवडले..म्हणुन येथे त्यापुढेच २ क्रमांक लिहुन पुढे चालु केले. माझे मिपावर बहुतेक हे पहिलेच रसग्रहन आहे..आवडले तर ते कवितेचे यश समजावे..आनि पहिलेच रसग्रहन असल्याने सोप्पी परंतु छान कविता मी निवडली आहे, आणि एक वाचक म्हनुन येथे लिहित आहे. ------------------------------------------------------ जीवन -आयुष्य कसे गमतीदार असते नाही... ? या जीवनामध्ये आपण कीती चढउतार पाहिलेले असतात, नाही ?...

त्याच्यातला नास्तिक माणूस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/09/2011 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगा असतो परदेशात नि ती दोघे एकटीच असतात संध्याकाळची वेळ असते ती देवाजवळ नेहमी प्रमाणेच हात जोडून प्रार्थना करीत असते देवाजवळची समई तिचा प्रसन्न प्रकाश फोटोतील देवाच्या चित्रावरून परावर्तीत होऊन मंद मंद पसरत असतो सगळीकडे ...सर्वत्र ..! तिच्या चेहर्यावर .... कोठे कोठे फुलत जातो तो देवाकडे नुसताच बघत बसतो त्याने त्याच्या ओंजळीत काय काय टाकले ते शोधत बसतो .....! ती भाबडेपणे काही काही मागत बसते देवाजवळ मुलांचे सुख ...! त्यांच्या साठी आरोग्य...!!
काव्यरस

गोड गुन्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/09/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.

सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ|| समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१|| काल क्लासला का ग नाही आलीस? लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते; नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२|| कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून बरे द

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

पुणेरी हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 02/09/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते डांबरी जाहिरात सामोरी... ...

वाळू

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 02/09/2011 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
वाळू
समुद्रकाठावरची वाळू अन वाळवंटातली वाळू. दोन्ही वाळूचेच प्रकार पण दोन्हीतले स्वभाव किती भिन्न... एक थंड तर एक उष्ण एक पाण्याशी जवळीक साधणारी तर दुसरी पाण्याशिवाय राहणारी एकीवर थंडवारे वाहतात तर दुसरीवर उष्ण एकीवर सुंदर सुंदर दृष्य असणारी झाडे, वने, निसर्ग तर दुसरी रुक्ष, तापलेली, वैराण जागा . . . . कधी कधी वाटते की, तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय? - पाषाणभेद (दगडफोड्या) ०२/०९/२०११