Skip to main content

कविता

गणपतीची आरती

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 01/09/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
Ganesh गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥ गंगाधर मुटे ................................................

काय गुण सांगू माझ्या सालीचे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/09/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
काय गुण सांगू माझ्या सालीचे
माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ|| ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते नटते थटते लाजत मुरडते मी जरा बोललो तर लाजून आखडते भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे? वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१|| एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का? कॉलेजच्या नाटकातला प्र

बाहुली

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 01/09/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवा सरकव कोपऱ्यात हा अगणित तहानलेला अंधार घडी घातलेले पाय पोटाशी घेऊन ह्या सर्वव्यापी काळ्या रात्रीत ती निथळत उभी आहे शब्दांनी न सांगता इवले इवले हात तिच्यापुढे धरले तिच्या हातात दहा दिशांच्या जत्रांतून आणलेल्या ह्या रंगीबेरंगी बाहुल्या त्यांच्या डोळ्यात भाव शिवले आहेत त्यांचे ओठ अजाण वेदनेच्या टाक्यांनी बहरले आहेत.

पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/09/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी चल ग राणी जोडीला ये ग गावूया गावरान गाणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| विहिर दगडी रहाट लाकडी विजमोटरीनं भरतूया पाणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| कोरस (फक्त मुलींचा आवाज) : पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| पानकळा ह्यो आला, सारं शिवार फुलवून गेला वाटाणा चवळी भुईमुंग गाजर, रताळी अन मुळा पिकं पोटरीला आली आता किटनाशक चला फवारा हातपंप देवून दांडा हातात घे ग, जवळ नाही कुणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||१|| दुभती म्हैस गाभण गाय, शेरडू

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं १ - ती आणि ते

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 31/08/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रतिसादात गणेशा यांनी एक सूचना केली होती. ती म्हणजे कवितांचं रसग्रहण करायचं असेल तर मिपावरच्याच एखाद्या नव्या कवीच्या चांगल्या कवितेचं रसग्रहण का करू नये? त्यायोगे कवीला व एकंदरीत सर्वच सदस्यांना आपलेपणा वाटेल. ही सूचना मला मनापासून आवडली. आपण कायम मराठी वाङमयात गाजलेल्या कवितांकडे लक्ष पुरवतो, त्यांचे गोडवे गातो. पण मिपावरदेखील अनेक कविता येतात. त्यातल्या काही आवडलेल्या कविता घेऊन रसग्रहण व चर्चा करायला काय हरकत आहे?

आला आला रे आला महिना भादवा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/08/2011 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला रे आला महिना भादवा
आला आला रे आला महिना भादवा वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||धृ|| श्रावणात घडले फार उपास, हड्डी नळीसाठी केले नवस खास पुर्ण जेवणाने उपास आता रे सोडवा आला आला रे आला महिना भादवा ||१|| गल्ली गल्लीत आपण आता फिरू टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू मोत्या, टिप्याला कुणीतरी राणी, डॉली भेटवा आला आला रे आला महिना भादवा ||२|| सरला आता सारा पावसाळा सुरू झालाय गुलाबी हिवाळा मस्त थंडीतच वाढतो गोडवा आला आला रे आला महिना भादवा ||३|| लाज बाळगू नका दिवसा उजेडाची सुरू व्हा रे सारे वेळ आहे रात्रीची नव्य

क्षण एक पुरे जगण्यास खरा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/08/2011 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण एक पुरे जगण्यास खरा जगणे कसले शतवर्ष नरा? क्षण एक पुरे जगण्यास खरा लपवून व्यथा रडतोय मनी दिसतोच सदा मुखडा हसरा जगणेच नको असले तसले परसात पडून जणू कचरा मरणास इथे नच घाबरतो असते जगणेच कठीण जरा श्रमतो, दमतो, शिणतो पुरता परिहार जणू जुळता नजरा दिसतात इथे जन सज्जन हे अपुलाच स्वभाव नसेल बरा रुळताच मनी भलतेसलते पुसतात कशास हवा नवरा वरदान मिळो "अभया"त जगा दररोज घरात जणू दसरा                    - गंगाधर मुटे ---------------------------------- वृत्त :तोटक

पुन्हा एकदा पाऊस ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 29/08/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... वाटले मारावी उडी त्या चिखलात अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ... मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिरकावून द्यावी ती हातातली छत्री भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ... नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... - विश्वेश
काव्यरस

ती आणि ते

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/08/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या घराघरातून ती नांदते आणि प्रत्येक माणसात उगम पावून खळाळत्या नदीसारखी गल्लीबोळातून वाहते बैलाचा बळी देऊन मांस खाणारा कंटाळून सोवळ्यात जातो तेव्हा ती थोडी बदलते कमरेला झाडू लावणारा चिडून पुस्तक हाती धरतो तेव्हा ती थोडी वळते उमटत असतात लाटा तिच्यात तिच्यावर विहार करणार्‍यांच्या क्रीडेने घुसळली जाते तिच्या तळाशी गुदमरून बुडणार्‍यांच्या आकांताने जिवंत असतो गाव रसरशीतपणे तिच्यातल्या लाटा-भोवर्‍यांमुळे नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....