Skip to main content

कविता

जनलोकपाल च्या निमिताने.

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 13/09/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता डोक्यावर त्याच्या कुणा संताची पालखी होती गडबडलेल्या वनराजाला शिकार हि नवखी होती सावज टप्प्यात असून सुद्धा झेप त्याची पोचत नव्हती कोल्हया लांडग्यांची नख सुद्धा गोळ्याला त्या डाचत नव्हती गुहेमध्ये जाऊन त्याने काही वर्ष चाळली काळ थोडा मागे करून युग थोडी पाहिली किडे मुंग्या हरणं ससे चिरडलेली अनेक मनं इतिहासाच्या पुस्तकातली रक्तबंबाळ किती पानं पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास
काव्यरस

बंदुक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही हसलो त्यांना ज्यांनी मला वाचवले प्रेताशिवाय सर्वांना स्मशानात पोहचवले एकटा जसा तो उठला मुर्ख म्हणोनी हिणविले संख्येच्या या निकषाने विद्वान किती बसविले प्रेतासम हे जगणे जगतो मी तिरडीवर नियतीचा कैसा घोट पडतो जसा नरडीवर मैत्री मी निभावुन मैत्र जमवले पक्के अपयशावरही माझ्या मित्रांचे होते शिक्के देताना निरोप तुजला तु अंधुन अंधुक होते वक्षात देऊनी गोळी ती आठवण बंदुक होते
काव्यरस

बाप्पा मोरया ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 12/09/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अचानक मला स्वप्न पडले नवे ... बाप्पा आले आकाशातून म्हणे पाहायचेत तुमचे देखावे ... बाप्पा म्हणाले चल जरा दिल्ली मुंबईला जाऊ मस्तपैकी कोर्टातले संसदेतले तुमचे फटाके पाहू बाप्पा...

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/09/2011 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ|| तो: थेंब नभातून खाली झरती तो: पडता त्यांना ओठांवरती ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१|| तो: कधी प्रकाशात दिसते तो: इंद्रधनू ते सात रंगांचे ती: हवेत तसले रंग धनूचे ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२|| तो: मोहरलेला श्वास श्वासात तो: हात गुंतले तुझ्या हातात ती: निसर्गात या वेडे झाले ती: दोन जीवांचे नाते जडले ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०९/२
काव्यरस

माझी म्हैस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/09/2011 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ|| कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते हाय बेबे!
काव्यरस

पुन्हा...

लेखक अभिषेक९ यांनी रविवार, 11/09/2011 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा ब्लास्ट मी हादरलो, आम्ही हादरले, सारा भारत हादरला पण 'ते' विचकट हसले... राक्षसी रावण, कंस, बकासुर, पुतना.. सुद्धा लाजले, रडवेले झाले.. 'आमचा असुरी पणा असला नव्हता हो' मिडिया गरजले रक्ताळलेले फोटो - बटबटलेला सूर मी भडकलो, आम्ही भडकलो, सारा भारत भडकला पण त्यांचा TRP वाढला नारायण-नारायण म्हणत नारद मात्र आपल्या आधुनिक रूपाने थक्क झाला सरकार सरसावले दहशतवादी हल्ला - RDX - राष्ट्र - धर्म - जेहाद मी आलो, आम्ही आलो, सारा भारत एकत्र आला पण त्यांची पोळी शेकली ब्रम्हा -विष्णू - महेशाचे आर्जव करत इंद्र मात्र या लोकशाहीत विस्कळीत झाला श्रीराम ते अण्णा... ...

सचेतन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/09/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.
काव्यरस

माहेरी जायची मला झाली आता घाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/09/2011 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
माहेरी जायची मला झाली आता घाई
डायवर दादा रं डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला आखाजी संपून आता दसरा आला की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं बा माझा कसा आसलं शेतात राबूनी थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर कधी भेटती ती मला आसं मला झालं रं माहेरी जायची मला झाली आता घाई र

मेरी चार कवितायें

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/09/2011 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
मेरी चार कवितायें मंडळी, मिपा गेले तिन दिवस बंद असण्याच्या दरम्यान आम्हाला ज्या काही कविता झाल्यात त्या येथे एकदाच देत आहे.